माहिती आणि प्रसारण मंत्रालय

गुजरातमधील केवडिया इथे संविधान दिनी भरवलेल्या विशेष मल्टीमीडिया प्रदर्शनाची खासदार आणि आमदारांकडून प्रशंसा

Posted On: 27 NOV 2020 3:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 नोव्‍हेंबर 2020


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात संविधान उद्देशिकेच्या वाचनाने भारताचा 71वा संविधान दिवस उत्साहाने पार पडला. या संविधान दिवसाच्या निमित्ताने गुजरातमधील केवडिया येथे भरवलेल्या विशेष मल्टिमिडीया प्रदर्शनाचे खासदार आणि आमदारांनी प्रशंसा केली.

गुजरातमधील स्ट्यॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याच्या परिसरात  भरलेल्या 80 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेचा एक भाग म्हणून विभागीय लोक संपर्क  ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि  संसदीय वस्तुसंग्रहालय आणि अभिलेखागार यांनी संयुक्तपणे परिषदेच्या ठिकाणी हे खास प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनाचे उद्धाटन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते काल झाले.  वैदिक काळ,लिच्छावि प्रजासत्ताक ते विद्यमान लोकशाही देश, या भारताच्या  लोकशाही परंपरेचा प्रवास ते आधुनिक भारत घडवणारी आजची लोकशाही  याचा आढावा या प्रदर्शनात घेतला आहे.

Image        Image

सोळाशे चौरस फुट जागेत भरवलेल्या या मल्टीमिडीया प्रदर्शनात 50 चित्रफलक याशिवाय प्लाजमा डिस्प्ले, इंटरॅक्टिव्ह डिजिटल फ्लिप बुक, RFID कार्ड रिडर, परस्परसंवादी स्क्रीन, डिजीटल टचवॉल अशा विविध तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता.

अध्यक्ष ओम बिर्ला यांनी  प्रदर्शनातील मल्टिमिडीयाच्या वापराबद्दल प्रशंसा केली आणि ते म्हणाले की परस्परसंवादी प्रदर्शने  मनोरंजक पद्धतीने माहितीचा प्रसार करतात. हे प्रदर्शन संविधान घडणीची  प्रक्रिया  कालानुक्रमे परिणामकारक पद्धतीने कथन करते. आपल्या लोकशाही परंपरेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी अशी प्रदर्शने देशाच्या कानाकोपऱ्यात नेली पाहिजेत, असे ते म्हणाले.  अभिलेख सामुग्रीच्या मदतीने भारताच्या संविधानाची रचना प्रक्रिया सविस्तर दाखवली आहे.  संविधान तयार होताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंन्द्रप्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, शामाप्रसाद मुखर्जी अश्या अनेक  घटना समितीच्या महत्वाच्या  सदस्यांनी  केलेल्या भाषणांची दुर्मिळ ध्वनीचित्र फूटेज हे  फिल्म्स डिविजन ऑफ इंडिया, मुंबई येथून मिळवून येथे प्रदर्शित केली आहेत.

एका प्लाझमा डिस्प्लेवर, प्रदर्शन बघणाऱ्याला, स्वतःच्या निवडीप्रमाणे संविधानाची उद्देशिका विविध भारतीय भाषांमध्ये वाचता येईल. डिजीटल फ्लिप बुकमध्ये संविधानासंबधी विविध रेखाटने आहेत. डिजीटल टच वॉल ही विविध राष्ट्रीय चिन्हांची माहिती देते तर  डिजीटल पडदा संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेचा कालक्रम दाखवतो. एक डिस्प्ले वॉल  भारताचे संविधान तयार करताना त्यावर जगातील इतर संविधानांचा पडलेला प्रभाव दर्शवते.

प्रदर्शनात आरएफआयडी कार्ड रीडर - हे परस्परसंवादी प्रदर्शन विशेष आकर्षण ठरले. यामध्ये भारताचे संविधान तयार करण्यात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या नावाचे असलेले कार्ड ठेवले असता त्याच्याविषयीची माहिती आणि त्यांनी केलेले काम याची माहिती स्क्रीनवर वाचता येते. तीन प्रकारची कार्ड या प्रदर्शनात होती - मसुदा समितीचे सदस्य, मसुदा समितीच्या महिला  सदस्य आणि हंसा मेहता आणि कन्हैयालाल मुन्शी या प्रमुख  व्यक्तींसह गुजरातमधील संविधान सभा सदस्य.

Image        Image

“हे कला प्रदर्शन दालन, शेकडो दूरदर्शी नेत्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची माहिती देते", अशी प्रतिक्रिया  गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी  प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर अभ्यागतांच्या पुस्तकात लिहिली. या संग्रहात भूतकाळातील कलाकृती सुंदरपणे दर्शविल्या आहेत आणि त्यासाठीशक्य त्या सर्व डिजिटल प्रयत्नांचा उपयोग केला आहे असे ते म्हणाले. केंद्रीय संसदीय कार्य, कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी आणि संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल आणि विविध राज्य विधानसभांचे अध्यक्ष आदींनी  प्रदर्शनाला  भेट दिली.

या प्रदर्शनात मान्यवरांच्या स्वाक्षऱ्याचें एक दालन होते ज्यात संविधान मसुदा समितीतील सदस्य, संसद आणि सरकारमधील प्रमुख नेते तसेच विधिमंडळाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष यांच्या स्वाक्षरी असलेले पॅनल्स या दालनात आकर्षकपणे मांडले होते.

प्रदर्शनाचे आणखी एक मुख्य आकर्षण म्हणजे राज्य विधानसभांवरील विभाग, जेथे अभ्यागत, देशातील विविध राज्य विधानसभा वास्तूंचे सौंदर्य आणि विविधता पाहू शकतील.

यावेळी सर्व कोविड योग्य वर्तन नियमांचे पालन करण्यात आले आणि विशेषत: टच स्क्रीन प्रदर्शनाच्या संदर्भात स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी विशेष काळजी घेतली गेली.

लोकशाही संस्था मजबूत करण्याच्या आणि भारतीय संविधान आणि लोकशाही परंपरेविषयी जनजागृती करण्याच्या संकल्पाने  केवडिया येथे पीठासीन अधिकाऱ्यांची दोन दिवसीय अखिल भारतीय परिषदेचा समारोप झाला.

 

 
* * *

Jaydevi PS/V.Sahajrao/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1676448) Visitor Counter : 221