माहिती आणि प्रसारण मंत्रालय

माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते संविधानदिनी ई-संकलन पुस्तिकेचे अनावरण

Posted On: 26 NOV 2020 9:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  26 नोव्हेंबर 2020

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज संविधान, मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य यावरील लेखांच्या ई-संकलन पुस्तिकेचे अनावरण केले.

या समारंभ प्रसंगी बोलताना मंत्री म्हणाले, आज प्रसिद्ध केलेला हा संकलन ग्रंथ म्हणजे दस्तऐवजाचा अतिशय महत्त्वाचा एक भाग आहे आणि या उपक्रमासाठी पत्र सूचना कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे मला अभिनंदन करायला आवडेल. त्यांनी नमूद केले की, पत्र सूचना कार्यालय (पीआयबी) यांच्याकडून संकलन करण्यात आलेले लेख हे प्रख्यात व्यक्तींनी लिहिलेले आहेत आणि ही संबंधित सामग्री संदर्भ ग्रंथ म्हणून कार्य करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशाचा मंत्र्यांनी यावेळी पुनरुच्चार केला की, राज्यघटना ही देशाचा सर्वांत मोठा धार्मिक ग्रंथ आहे. त्यांनी नमूद केले की, संविधान दिवस साजरा करण्याची कल्पना पंतप्रधानांची होती.

संविधानाचे महत्त्व अखोरेखित करत जावडेकर म्हणाले, या अतुलनीय दस्तऐवजाने सर्व नागरिकांचे हक्क समान केले आहेत आणि समाजातील सर्व घटकांना समान न्याय मिळण्यासाठी तो तयार करण्यात आला आहे.

पुढील लिंकवर पुस्तक उपलब्ध होऊ शकेल –

https://static.pib.gov.in/WriteReadData/ebooklat/Flip-Book/constfiles/index.html

ई – संकलन पुस्तिकेबाबत –

ई – पुस्तिकेमध्ये न्याय, उद्योजक आणि कलाकार अशा विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे बत्तीस लेख आहेत. प्रमुख सहयोगींमध्ये आनंद महिंद्रा, महाधिवक्ता (अटर्नी जनरल) के के वेणूगोपाल आणि सोनल मानसिंग यांचा समावेश आहे. मूलतः कॉफी टेबल बुक या प्रकारामध्ये नियोजित असलेले हे पुस्तक मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी ई-संकलन पुस्तिका स्वरूपात प्रकाशित करण्यात आले आहे. या संकलनामध्ये घटनेअंतर्गत विहित मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्ये आणि तसेच राष्ट्रीय अखंडता टिकवून ठेवण्यासाठी आणि लोकांच्या उत्कर्षामध्ये राज्यघटनेची महत्त्वाची भूमिका यावर भर देण्यात आला आहे.

 

M.Chopade/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1676232) Visitor Counter : 193