आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील 70% सक्रीय रुग्ण महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढ़मधील

Posted On: 27 NOV 2020 12:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2020
 

भारताची सक्रीय रुग्णसंख्या आज4,55,555 झाली. भारतातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या तुलनेत सक्रीय रुग्णसंख्या 4.89%.आहे.

सक्रीय रुग्णसंख्येपैकी 70% (69.59%) रुग्णसंख्या ही 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहे. ही राज्ये म्हणजे महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढ़.

आज महाराष्ट्रातील एकूण सक्रीय कोविड रुग्णसंख्या सर्वाधिक म्हणजे 87,014 आहे, त्या खालोखाल केरळातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या 64,615  तर दिल्लीतील एकूण सक्रीय रुग्णसंख्या 38,734 आहे.

​​​​

गेल्या 24 तासात राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सक्रीय रुग्णसंख्येतील बदल खालील आकृतीत दाखवला आहे.

महाराष्ट्रात वरच्या दिशेने सर्वाधिक बदल नोंदवला आहे, म्हणजे 1,526  रुग्ण वाढले आहेत.  तर छत्तीसगढ़मध्ये खालच्या दिशेने सर्वाधिक बदल दिसतो म्हणजे सक्रीय रूग्णसंख्येत 719 ने घट झाली आहे.

गेल्या 24 तासात भारतात 43,082 नवीन कोविड रुग्ण नोंदवले गेले. यापैकी 76.93% हे 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

गेल्या 24 तासात, महाराष्ट्रात सर्वाधिक  6,406 नवीन कोविड रुग्ण नोंदवले गेले. त्या खालोखाल दिल्लीत5,475, तर केरळात 5,378 नवीन कोविड रुग्ण नोंदवले गेले.

भारतातील एकूण बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने 87लाखांचा आकडा (87,18,517) ओलांडला. रोगमुक्तांच्या संख्येचा राष्ट्रीय दर आज93.65% राहिला.

देशात गेल्या 24 तासात  39,379 जण बरे झाल्याचे नोंदवले गेले.

या बरे झालेल्यांच्या संख्येपैकी  78.15% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहे.

एका दिवसातील नव्याने बरे झालेल्यांची संख्या केरळात सर्वाधिक म्हणजे 5,970, तर दिल्लीत 4,937 आणि महाराष्ट्रात त्याखालोखाल 4,815 आहे.

एकूण कोविड मृत्यूंपैकी 83.80% हे, दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील  आहेत. ती राज्ये म्हणजे  महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात आणि मध्य प्रदेश ही होय.

गेल्या 24 तासात झालेल्या 492 कोविड मृत्यूंपैकी 75.20% हे दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

दिल्लीत सर्वाधिक म्हणजे 91 नवीन मृत्यूसंख्येची नोंद झाली, तर महाराष्ट्रात 65 नवीन मृत्यूसंख्येची नोंद आणि त्या खालोखाल पश्चिम बंगालमध्ये 52 मृत्यू नोंदवले गेले.

 

 

* * *

U.Ujgare/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1676397) Visitor Counter : 211