PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 20 NOV 2020 8:30PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 20 नोव्हेंबर 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैश-ए-मोहम्मद जम्मू आणि काश्मीरमधील तळागाळातील लोकशाही प्रक्रियेवर लक्ष्य साधून केलेला दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावल्याबद्दल सुरक्षादलाचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लक्झेम्बर्गचे पंतप्रधान झेव्हिअर बिटल यांच्यात आभासी स्वरूपात द्विपक्षीय शिखर परिषद झाली. कोविड-19 मुळे लक्झेम्बर्ग येथे झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच, या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी बिटल यांच्या नेतृत्वाखाली लक्झेम्बर्गने केलेल्या उपाययोजनांचे त्यांनी कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमधील विंध्याचल प्रदेशातील मिर्झापूर आणि सोनभद्र जिल्ह्यातील ग्रामीण पेयजल पुरवठा प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान गाव पाणी व स्वच्छता समिती / पाणी समिती सदस्यांशी संवाद साधतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील यावेळी उपस्थित राहतील.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी सेंट्रल पूल एमबीबीएस जागांअंतर्गत उमेदवारांच्या निवड आणि नामनिर्देशनच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ‘कोविड वॉरियर्सची मुले’ नावाची एक नवी श्रेणी सुरू करण्याची घोषणा केली. हे पाऊल म्हणजे कोविड योध्यांनी कोविड रुग्णांच्या उपचार व व्यवस्थापनात केलेल्या महान योगदानाचा सन्मान करणे आहे, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले. वेळेवर निदान आणि पाठपुरावा यासंबंधित आव्हानांना प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी केंद्रीय पथके मार्गदर्शन करतील.

कोविड-19 च्या सक्रीय रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदविणाऱ्या इतर राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये देखील उच्चस्तरीय बहु-अनुशासित पथक पाठविण्यावरही केंद्र सरकार विचार करीत आहे.

आतापर्यंत भारताने एकूण 12,95,91,786 नमुन्यांची चाचणी केली आहे. गेल्या 24 तासांत 10 लाखांपेक्षा जास्त चाचण्या (10,83,397) घेण्यात आल्या. व्यापक स्तरावरील चाचणीने एकत्रित सक्रीय रुग्णांचा दर निम्न स्तरावर कायम ठेवला असून त्यात निरंतर घट होत आहे. आज एकत्रित राष्ट्रीय सक्रीय रुग्णांचा दर 7 टक्यांहून कमी अर्थात 6.95% आहे. व्यापक स्तरावरील चाचणी मुळे सक्रीय रुग्णांचा दर कमी झाला आहे.

इतर अपडेट्स:

महाराष्ट्र अपडेट्स:

कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व शाळा 31 डिसेंबर, 2020 पर्यंत बंद राहतील. दरम्यान, 23 नोव्हेंबरपासून 9वी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू करनण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे असे महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी सांगितले आहे. दिवाळीच्या काळात चाचण्यांची संख्या कमी झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुन्हा चाचणी संख्या वाढविली आहे. कोविड -19 ची दुसरी लाट येण्याची शक्यता विचारात घेऊन महानगरपालिकेने 244 नवीन चाचणी केंद्र सुरू केले आहेत. सध्या राज्यात जवळजवळ 80,000 सक्रिय रुग्ण आहेत.

 

MC/ST/PM

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1674529) Visitor Counter : 116