आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
वर्ष 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी सेंट्रल पूल एमबीबीएस / बीडीएस जागांअंतर्गत ‘वॉर्डस ऑफ कोविड वॉरियर्स’ उमेदवारांच्या निवड आणि नामांकनासाठीच्या नवीन श्रेणीला आरोग्य मंत्रालयाची मान्यता
यामुळे कर्तव्य आणि मानवतेसाठी नि: स्वार्थ सेवा देणाऱ्या सर्व कोविड योध्यांच्या महान बलिदानाचा सन्मान होईल : केंद्रीय मंत्री डॉ हर्ष वर्धन
प्रविष्टि तिथि:
19 NOV 2020 2:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 19 नोव्हेंबर 2020
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी सेंट्रल पूल एमबीबीएस जागांअंतर्गत उमेदवारांच्या निवड आणि नामनिर्देशनच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ‘कोविड वॉरियर्सची मुले’ नावाची एक नवी श्रेणी सुरू करण्याची घोषणा केली.
हे पाऊल म्हणजे कोविड योध्यांनी कोविड रुग्णांच्या उपचार व व्यवस्थापनात केलेल्या महान योगदानाचा सन्मान करणे आहे, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले. “कर्तव्य आणि मानवतेसाठी नि: स्वार्थ भावनेने सेवा केलेल्या सर्व कोविड वॉरियर्सच्या महान योगदानाचा यामुळे सन्मान होईल.” असे ते म्हणाले.
कोविड -19 मुळे आपला जीव गमावलेल्या किंवा कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या “कोविड वॉरियर्स” च्या मुलांमधून उमेदवारांच्या निवडीसाठी आणि उमेदवारीसाठी सेंट्रल पूल एमबीबीएस जागा वाटप केल्या जाऊ शकतात.
सरकारने कोविड योध्यांसाठी 50 लाख रुपयांचे विमा पॅकेज जाहीर करत कोविड योध्यांची व्याख्या निश्चित केली आहे, असे केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सन 2920-21 मध्ये पाच (05) सेंट्रल पूल एमबीबीएस जागा या श्रेणीमध्ये राखीव ठेवल्या आहेत. वैद्यकीय परिषद समिती (एमसीसी) ऑनलाइन अर्जाद्वारे उमेदवारांची निवड करेल. ही निवड नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे आयोजित एनईईटी -2020 परीक्षेत मिळवलेल्या गुणांवर आधारित असेल.
U.Ujgare/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1674338)
आगंतुक पटल : 255