माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते, “द रिपब्लिकन एथिक खंड तीन” आणि ‘लोकतंत्र के स्वर’ या ई-पुस्तकांचे प्रकाशन

Posted On: 19 NOV 2020 7:32PM by PIB Mumbai

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपती म्हणून तिसऱ्या वर्षीच्या कारकिर्दीतील, निवडक भाषणांचे संकलन असलेल्या  द रिपब्लिकन एथिक-खंड तीनआणि लोकतंत्र के स्वरया ई-पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलतांना जावडेकर यांनी सांगितले की, “राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विविध विषयांवर अनेक प्रेरणादायी भाषणे केली आहेत. या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व भाषणांमधून देशाविषयी त्यांना असलेला आत्मविश्वास प्रतीत होतो. या पुस्तकात, कोविड-19 शी लढा देतांना देशाने घेतलेले परिश्रम, इतर देशांच्या तुलनेत भारताने मिळवलेले लक्षणीय यश आणि देशाच्या सीमांचे रक्षण करतांना गाजवलेले शौर्य, या सर्व विषयांना स्पर्श करणाऱ्या भाषणांचा समावेश आहे. हे पुस्तक अनेक गोष्टींसाठी संदर्भ ग्रंथ म्हणूनही उपयुक्त ठरेल, असेही जावडेकर म्हणाले.

या पुस्तकांच्या छापील आवृतींचे प्रकाशन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली भाषणे म्हणजे राष्ट्रपती कोविंद यांच्या हृदयाच्या तळापासून व्यक्त झालेल्या भावना आहेत’, असे, या पुस्तकाविषयी बोलतांना राजनाथ सिंह म्हणाले

हे पुस्तक सर्व प्रमुख ई-कॉमर्स मंचावर उपलब्ध आहे.

 

पुस्तकाविषयी माहिती:

द रिपब्लिकन एथिक, खंड-3’ या पुस्तकात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपती म्हणून तिसऱ्या वर्षीच्या कारकिर्दीतील, निवडक भाषणांचे संकलन करण्यात आले आहे.

आठ भागात विभागलेल्या या पुस्तकात, 57 भाषणे समाविष्ट करण्यात आली आहेत, ज्यात नव्या भारताच्या निर्मितीसाठी, राष्ट्रपती कोविंद यांचे विचार आणि दूरदृष्टीचे आपल्याला दर्शन होते. पुरोगामी, प्रगती करणारा आणि आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक मूल्यांच्या वारशाची पाळेमुळे घट्ट रुजलेल्या वाटेने वाटचाल करणाऱ्या देशाची कल्पना त्यांनी यातून मांडली आहे.

न्याय, समता, बंधुभाव, अहिंसा, वैश्विक बंधुभाव, सर्वसमावेशक विकास आणि समाजातील दुर्बल घटकांविषयीची कणव हे त्यांच्या भाषणांमधील महत्वाचे मुद्दे आहेत. एकविसाव्या शतकातील गतिमान, प्रगत भारतासाठीची त्यांची दूरदृष्टी, आणि विश्वाच्या सुरक्षित आणि हरित भवितव्यासाठीचे मार्गदर्शन या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते.

कोविड-19 च्या काळात संपूर्ण जगाचे व्यवहार जणू थांबल्यासारखे झाले होते, अशावेळी राष्ट्रपतींच्याही सार्वजनिक कार्यक्रमांना मर्यादा आल्या होत्या. मात्र, अशा संकटकाळात, राष्ट्रपतींनी एक आदर्श समाजापुढे ठेवला. या काळात, त्यांनी राष्ट्रपती भवनाच्या परिसरातच वास्तव्य करुन नव्या सामान्यपरिस्थितीत निसर्गाच्या सानिध्यात एकांतात वेळ घालवून, आपण नव्या जगाच्या रचनेत कसे योगदाना देऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिले.

या पुस्तकात एक विशेष विभाग आहे, ज्यात राष्ट्रपती कोविंद यांनी गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी या दोन महान व्यक्तिमत्वांविषयी आपले विचार व्यक्त केले आहेत. त्यांची शिकवणीचे आजच्या युगातील महत्व काय, याविषयी त्यांनी लिहिले आहे. गांधीवादी विचारांवर कट्टर विश्वास असलेल्या रामनाथ कोविंद यांनी या लेखात महात्मा गांधी यांनी मानवतेला दिलेल्या मार्गदर्शक विचारांचा उहापोह केला आहे. 2019-20 या वर्षात  जगभर गांधीजींची 150 वी जयंती साजरी होत  असतांना राष्ट्रपतींचा हा लेख अधिकच औचित्यपूर्ण ठरला आहे.

या भाषणांमधून राष्ट्रपतींच्या वैश्विक विचारांचे आणि त्यांच्या मूल्यांवरील श्रद्धेचे दर्शन आपल्याला घडते.

 

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1674130) Visitor Counter : 236