वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भविष्यातील नाविन्यपूर्ण आणि कमी-खर्चिक आरोग्य उपाययोजना सुनिश्चित करण्यात भारत महत्वाची भूमिका बजावणार : पियुष गोयल
पीयुष गोयल यांनी सी. आय .आय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या आशिया आरोग्य 2020 शिखर परिषदेला संबोधित केले
Posted On:
20 NOV 2020 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 20 नोव्हेंबर 2020
वाणिज्य व उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी रूग्णालय, डॉक्टर आणि कोरोना योद्धा यांचे कौतुक करताना म्हटले आहे की, तुम्ही सर्वोच्च प्रशंसेस पात्र आहात आणि एक राष्ट्र म्हणून आम्ही तुमची प्रशंसा करतो. भारतीय उद्योग परिसंघाच्या आशिया आरोग्य 2020 शिखर परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.
देश लस संशोधनाच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे परंतु पंतप्रधान म्हणल्याप्रमाणे, “जोवर लस येत नाही तोपर्यंत या साथीच्या रोगाबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.” असे गोयल म्हणाले. साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईतील भारताचे योगदान इतिहासात नेहमीच लक्षात राहील असे ते म्हणाले. देशातील लॉकडाऊन पूर्णपणे योग्य असल्याचे सांगत ते म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेने वारंवार हे नमूद केले आहे की भारतातील लॉकडाऊनमुळे देशाला साथीच्या आजाराविरुद्ध तयार राहण्यास खऱ्या अर्थाने मदत झाली आणि इतर विकसित देशांच्या तुलनेत भारतीय लोक या साथीच्या आजाराच्या कचाट्यातून लवकर बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताने कठोरपणे अंमलात आणलेल्या लॉकडाऊनला जागतिक स्तरावर एक आदर्श म्हणून स्वीकारले गेले आहे ज्यामुळे देशातील रुग्ण बरे होण्याचा उच्च दर कायम राखण्यात मदत झाली.
भारतीय उद्योग महासंघाच्या प्रयत्नांचे कौतुक करताना गोयल म्हणाले की, आशिया आरोग्य 2020 सारख्या उपक्रमांमुळे देशातील बऱ्याच समस्यांवर नवीन उपाय शोधून त्यानुसार नवीन कल्पना लागू करण्यास मदत होईल आणि जेव्हा लस उपलब्ध होईल तेव्हा ती देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत वितरीत करण्यास मदत होईल. 1.3 अब्जहून अधिक भारतीयांना योग्य कोविडआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही सार्वजनिक-खासगी भागीदारीत काम करू आणि त्यामुळे पुढील लढाईत आपल्याला निश्चितच यश प्राप्त होईल असे ते म्हणाले. गोयल यांनी कमी विकसित देश आणि गरीब या सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत लस उपलब्ध करून देण्यावर जोर देत सांगितले की, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. भविष्यातील नाविन्यपूर्ण आणि कमी-खर्चिक आरोग्य उपाययोजना सुनिश्चित करण्यात भारत महत्वाची भूमिका बजावेल असेही ते पुढे म्हणाले.
लस शोधण्याच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आपण खऱ्या अर्थाने एकत्र आलो आहोत असे पियुष गोयल म्हणाले. संपूर्ण जग सामना करत असलेल्या साथीच्या आजारामुळे आपल्याला जगण्याची, परिस्थितीशी जुळवून घेण्यास आणि सक्षम बनविण्यात मदत होईल. कोविडने जग आणि मानवतेला एकत्र आणले आहे. आज संपूर्ण जग एका सामायिक कारणासाठी संघर्ष करण्यासाठी एकत्र आले आहे.
Jaydevi P.S./S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1674461)
Visitor Counter : 197