सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या तंत्रज्ञानावर आधारीत उपक्रम आणि मध्यस्थीमुळे कोविड-19च्या  समस्येवर उपाय शोधण्याच्या आव्हानातून मिळाला पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक ईन इंडियाच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद


हात धुण्यासाठीची जंतुनाशके (हँन्ड सँनिटायझर) यासह इतर वैद्यकीय वस्तूंच्या किमती कमी करणे झाले साध्य

आयात कमी होण्याबरोबरच कोविड संबंधित अनेक वैद्यकीय साधने आणि इतर सहाय्यक वस्तूची  निर्यात करणे झाले शक्य

Posted On: 19 NOV 2020 7:19PM by PIB Mumbai

 

केंद्रीय सूक्ष्म ,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने तंत्रज्ञानावर आधारीत राबवलेल्या उपक्रमांमुळे आणि मध्यस्थीमुळे कोविड-19 च्या  समस्येच्या आव्हानावर उपाय शोधणे शक्य झाले. यामुळे  पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक ईन इंडिया या अभियानांच्या हाकेला उत्तम प्रतिसाद देत आपण पुढे नेऊ शकलो.या उपक्रमांमुळे आणि मध्यस्थी मुळे देशात अतिशय वेगाने वाढणाऱ्या हँड सँनिटायझरच्या (पंप/दाबून उघडणारी बाटली)  उत्पादनाची मागणी संपूर्णपणे पूर्ण करू शकलो इतकेच नव्हे, तर आता आपण तिच्या  निर्यातिसाठीदेखील सज्ज झालो आहोत. हात धुण्याच्या जंतूनाशक बाटलीचे डिस्पेंन्सर (हँन्ड सँनिटायझर बाँटल डिस्पेन्सर) (द्रव स्वरुप/जेल स्वरूप) बनविण्याने देशाला आत्मनिर्भर बनविण्यात मदत केली असून त्यासह आपण इतर साधने, मास्क्, फेस शिल्ड्स, पीपीई किट, सँनिटायझरच्या पेट्या, आणि चाचणी सुविधा देखील विकसित/उत्पादित करण्यात सहभागी झालो आहोत.

एमएसएमई मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी या उपक्रमाबद्दल आणि त्याच्या सफलतेबद्दल  एमएसएमईच्या समूहाची प्रशंसा केली आहे.

 

हँन्ड सँनिटायझर बाटली डिस्पेंन्सर(पंप/फ्लीप):

कोविड-19 च्या काळात हँन्ड सँनिटायझर आणि त्याच्या बाटल्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. त्याचप्रमाणे त्याच्या डिस्पेंन्सरची मागणी देखील अनेक पटीने ( प्रतिदिन 50 लाख) वाढली. कोविड पूर्व काळात या बाटल्यांच्या डिस्पेंन्सरचे देशातील उत्पादन प्रतिदिन 5 लाख  एवढे होते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक प्रमाणात चीनमधून डिस्पेंन्सर आयात करण्यासाठी प्रयत्न केले गेले. तथापि परदेशातून आयात होणाऱ्या वस्तूंची पुरवठा साखळी पूर्णपणे या काळात विस्कळीत झाली होती,त्यामुळे देशातील अशा डिस्पेंन्सरच्या किंमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली (एका डिस्पेंन्सरला 30 रुपये). परीणामतः भारतीय बाजारपेठेतील सँनिटायझरच्या किमतीत वाढ झाली.

एमएसएमई मंत्रालयाची  मध्यस्थी:

ही समस्या लक्षात घेऊन एमएसएसई मंत्रालयाने मे 2020च्या सुरूवातीला एमएसएमईच्या सचिवांनी, हितसंबंधितांच्या, एमएसएमईच्या अधिकाऱ्यांच्या  आणि टूलरुम्स, तंत्रज्ञान केंद्रे यांच्यासमवेत  अनेक बैठका  घेतल्या. उद्योग आणि आँल इंडिया प्लॅस्टिक मँन्युफँक्चर्स असोसिएशन (AIPMA), आँल इंडिया मेडिकल डीव्हायसेस असोसिएशन   यांच्यातही  आपल्या स्थानिक  उत्पादनांचे स्थान कसे उंचावता येईल यावर विचार विनिमय करण्यासाठी अनेक बैठका घेतल्या गेल्या. खाजगी क्षेत्राला देखील आपली क्षमता वाढवण्यासाठी उत्तेजन देण्यात आले. उत्पादनात अचानक वाढ करणे शक्य होत नाही असे यावेळी निदर्शनास आले. कारण देशात त्यावेळी  त्यासाठी लागणारे साचे उपलब्ध नव्हते. तोपर्यंत उद्योग साचेही आयात करत असत.

 

एमएसएमई मंत्रालयाने आपली तंत्रज्ञान केंद्र प्रेरीत केली:

तंत्रज्ञान केंद्रांना (TCs) हे आव्हान स्विकारण्यासाठी आणि त्यांच्या कार्यासाठी प्रेरीत केले गेले. डिस्पेंन्सरचे घटक बनविण्यासाठी सात साच्यांची आवश्यकता होती.

मंत्रालयाने टीसीजना विविध उत्पादने तयार करण्याच्या यंत्रणेच्या खरेदीसाठी 26 कोटी रुपयांचे अनुदान दिले.

साचे बनवण्यातही लागणारा अवधी कमी करण्यासाठी सात साच्याची निर्मिती सात ठिकाणी एकाचवेळी करण्यात आली. (अहमदाबाद, लुधियाना, औरंगाबाद, जमशेदपूर, हैदराबाद, मुंबई)

 

परीणाम:

सँनिटायझरच्या पंपाचे दोन संच आपल्या टीसीजनी उत्पादन बनविण्यासाठी उद्योगांना दिले.

 

राष्ट्रीय प्रभाव:

वरील कारणांमुळे आज आपण डिस्पेंन्सरचे उत्पादन करण्यात स्वयंपूर्ण झालो आहोत.

याचे सध्याचे अंदाजित उत्पादन   सध्या प्रतिदिन सुमारे 40 लाख आहे.

किंमत, एप्रिल- मे महिन्यात असलेल्या 30 रुपयांवरून 5.50 रुपये इतकी खाली आली आहे.

अनेक भारतीय कंपन्या याचे उत्पादन करत असून त्यांच्याकडे अतिरिक्त साठा असण्याची शक्यता आहे .

 

एआयपीएमशी झालेल्या चर्चेनुसार सध्याचा वापर प्रतिदिन 50 लाख इतका आहे. (लोक रिफीलही खरेदी करत आहेत).

 

निर्यातीसाठीदेखील सज्ज :

पूर्वी पंप असलेल्या सँनिटायझरवर बंदी होती,ती आता उठविण्यात आली आहे, याचा अर्थ  आता आपण ते निर्यात करण्याच्या स्थितीत आहोत.

हँन्ड सँनिटायझरच्या निर्मितीसाठी  लागणाऱ्या कच्च्या मालाच्या बाबतीत  आपण स्वयंपूर्ण झालो आहोत:

आपल्या उपक्रमांचा भाग म्हणून एमएसएमईने हँन्ड सँनिटायझरचे उत्पादन (द्रव/जेल) करण्यात, त्याविषयी  स्वयंपूर्ण होण्यात आपले योगदान दिले आहे. तसेच त्यांनी सँनिटायझरची  चाचणी करण्याची सुविधा निर्माण केली आहे आणि नैसर्गिक सुगंधाचा वापर  करून आयुर्वेदिक/सौंदर्य प्रसाधन सँनिटायझरचे उत्पादन देखील सुरू केले आहे.

 

या संदर्भातील तपशील खालील प्रमाणे:

कनोज येथील एमएसएमईच्या एका सुवास आणि सुगंध विकास  तंत्रज्ञान (FFDC)  केंद्राकडे  सँनिटायझरच्या उत्पादनासाठी सँनिटायझर आणि अल्कोहोलचा परवाना घेण्यास सांगितले होते. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडांनुसार सँनिटायझर बनविला आणि कनोज आणि आजुबाजूच्या इतर भागात त्याचा पुरवठा केला. 

एफएफडीसीला त्याचे पॅकिंग ची व्यवस्था तयार करण्याच्या आणि इतर सामुग्री खरेदी करण्यासाठी एमएसएमईने निधी प्रदान केला. एफएफडीसीने त्या सँनिटायझरची किंमत ठरविण्यासाठी राष्ट्रीय औषधे  मूल्य निर्धारण प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन  केले.

सँनिटायझरच्या चाचणीची सुविधा निर्माण करण्यात आली आणि चाचण्यांना आरंभ झाला.

सध्या देशात सँनिटायझरच्या उत्पादनासाठी  पुरेशी सामग्री देशात  आहे.

 

इतर उत्पादने:

I. यु.व्ही. सॅनिटायझर्स बॅग किंवा बॉक्सचे डिझाईन  तयार करून ती देखील बनविली गेली. 

II.एमएसएमईच्या तंत्रज्ञान केंद्रांनी आता फेस शिल्ड्स आणि मास्कची ज्यावेळी देशात कमतरता होती तेव्हा  खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या सहाय्यानें  (KVIC) उत्पादन देखील सुरू केले आहे ,आज देश मास्कच्या  बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे.

III. त्याचप्रमाणे चेन्नईतील टीसीने गरम टेपसीलींग मशीनच्या सहाय्याने पूर्ण  शरीर झाकणारे पीपीई तयार केले.

IV. मेरठमधील टीसीने पीपीई च्या चाचणीसाठी रक्त प्रवेश चाचणी उपकरणे (blood penetration testing equipment) तयार केली. तसेच अशा प्रकारे हातमोजे आणि पूर्ण झाकणार्या  पीपीई  साधनांसाठी ओखला येथील टीसीने चाचणी केंद्र स्थापन केली आहेत.

 

Jaydevi PS/S.Patgoankar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1674125) Visitor Counter : 256