पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावल्याबद्दल सुरक्षा दलाचे आभार मानले
Posted On:
20 NOV 2020 5:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 20 नोव्हेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैश-ए-मोहम्मद जम्मू आणि काश्मीरमधील तळागाळातील लोकशाही प्रक्रियेवर लक्ष्य साधून केलेला दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावल्याबद्दल सुरक्षादलाचे आभार मानले आहेत.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले, “पाकिस्तानस्थित दहशतावादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांना ठार केले, दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटके होते यातून त्यांची घातपाताची मोठी कारवाई करण्याचा उद्देश होता, त्यांचे प्रयत्न उधळून लावले”.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले
“आपल्या सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा शौर्य आणि व्यावसायिकतेचे प्रदर्शन केले आहे. त्यांच्या सतर्कतेबद्दल धन्यवाद, जम्मू-काश्मीरमधील तळागाळातील लोकशाही प्रक्रियेला लक्ष्य करण्याच्या अतिशय वाईट कटाला त्यांनी पराभूत केले.”
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1674422)
Visitor Counter : 193
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam