आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्राने चार राज्यांसाठी उच्च स्तरीय पथकांची नियुक्ती केली; इतर राज्यांसाठी देखील विचार सुरु


मोठ्या प्रमाणातील चाचण्यांमुळे सक्रीय रुग्णांच्या दरात निरंतर घट

एकूण रुग्णांच्या तुलनेत सक्रीय रुग्णांचा दर 5 टक्यांहून कमी

Posted On: 20 NOV 2020 2:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  20 नोव्हेंबर 2020

केंद्र सरकारने हरयाणा, राजस्थान, गुजरात आणि मणिपूर या राज्यांसाठी चार उच्चस्तरीय पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके मोठ्या संख्येने कोविड रुग्ण असणाऱ्या जिल्ह्यांचा दौरा करतील आणि नियंत्रण, निरीक्षण करणे, चाचणी, संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण उपाय तसेच सक्रीय रुग्णांच्या  कार्यक्षम नैदानिक व्यवस्थापनात  राज्य सरकारच्या प्रयत्नांना सहाय्य करतील. वेळेवर निदान आणि पाठपुरावा यासंबंधित आव्हानांना प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी केंद्रीय पथके मार्गदर्शन करतील. कोविड -19 च्या सक्रीय रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदविणार्‍या इतर राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये देखील उच्चस्तरीय बहु-अनुशासित पथक पाठविण्यावरही केंद्र सरकार विचार करीत आहे.

कोविड-19 ची तपासणी न झालेल्या सक्रीय रुग्णांची वेळेवर तातडीने ओळख पटावी आणि त्यांच्यावर वेळेवर उपचार व्हावे यासाठी केंद्र सरकारने राज्य/केंद्रशासित प्रदेशांना आग्रही आणि व्यापक स्तरावर चाचणी घेण्याचा सल्ला दिला आहे.

आतापर्यंत भारताने एकूण 12,95,91,786 नमुन्यांची चाचणी केली आहे. गेल्या 24 तासांत 10 लाखांपेक्षा जास्त चाचण्या (10,83,397) घेण्यात आल्या.  व्यापक स्तरावरील चाचणीने  एकत्रित सक्रीय रुग्णांचा दर निम्न स्तरावर कायम ठेवला असून त्यात निरंतर घट होत आहे. आज एकत्रित राष्ट्रीय सक्रीय रुग्णांचा दर 7 टक्यांहून कमी अर्थात 6.95% आहे. व्यापक स्तरावरील चाचणी मुळे सक्रीय रुग्णांचा दर कमी झाला आहे.

34 राज्ये / केंद्रशासित प्रदेश दशलक्ष लोकसंख्येमागे प्रती दिन 140 पेक्षा जास्त चाचण्या करत आहेत, डब्ल्यूएचओने संशयित रुग्णांच्या व्यापक देखरेखीसाठी कोविड -19 च्या संदर्भात सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाययोजना समायोजित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य निकष या विषयावरील मार्गदर्शक उपाययोजनेत हा सल्ला दिला आहे.

20 राज्ये / केंद्र शासित प्रदेशात राष्ट्रीय सरासरी (6.95%) पेक्षा कमी  एकत्रित सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत 45,882 लोकांना कोविडचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. भारतात एकूण 4,43,882 सक्रीय रुग्ण असून भारताच्या एकूण कोरोना बाधित रुग्णांच्या तुलनेत हा आकडा 5 टक्क्यांहून कमी अर्थात 4.93% इतका आहे. 

एकूण सक्रीय रुग्णांपैकी 78.2% रुग्ण हे 10 राज्य/केंद्र शासित प्रदेशात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 18.19 टक्के सक्रीय रुग्ण आहेत.

28 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत 20,000 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत.

गेल्या 24 तासात भारतात 44,807 नवीन रुग्ण बरे झाले असून आता एकूण बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 84,28,409 इतका झाला आहे. रुग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा झाली असून आज हा दर 93.60% इतका आहे.  बरे होणारे रुग्ण आणि सक्रीय रुग्णांमधील अंतर सातत्याने वाढत असून सध्या हा आकडा 79,84,615 इतका आहे.

नव्याने बरे झालेल्या रुग्णांपैकी  78.02% रुग्ण हे दहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

केरळमध्ये सर्वाधिक 6,860 रुग्ण बरे झाले असून त्या पाठोपाठ दिल्लीमध्ये  6,685 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात 5,860 नवीन रुग्ण बरे झाले आहेत. 

10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 77.20% नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत दिल्लीत 7,546 रुग्णांची नोंद झाली आहे. केरळमध्ये काल 5,722 तर महाराष्ट्रात 5,535 नवीन रुग्ण आढळले आहेत.

गेल्या 24 तासात नोंदवलेल्या मृत्युच्या 584 प्रकरणांपैकी 81.85% प्रकरण ही  दहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

महाराष्ट्रात 26.32% नवीन मृत्यू झाले असून यात 154 मृत्यूंची नोंद झाली आहे. दिल्लीत 93 तर पश्चिम बंगालमध्ये 53 नवीन मृत्यूंच्या प्रकरणांची नोंद झाली आहे.

 

U.Ujgare/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1674344) Visitor Counter : 200