PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 19 NOV 2020 8:19PM by PIB Mumbai

 

दिल्ली-मुंबई, 19 नोव्हेंबर 2020

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

 

उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज देशव्यापी पाणीबचत मोहिमेचे आवाहन केले आणि प्रत्येक नागरिकाला पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवत जलयोद्धा बनण्याचा आग्रह केला. या सध्याच्या काळात या समस्येचे गांभीर्य आता प्रत्येकालाच उमगले पाहिजे त्यानुसार त्वरीत पाणी वाचवण्यासाठी शक्य ते प्रत्येकानेच अवलंबणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. अन्यथा भविष्यात जगाला गंभीर पाणी तुटवड्याला सामोरे जावे लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बंगळुरू येथे  आयोजित टेक समिटचे उद्घाटन केलेमाहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि स्टार्टअप वरील कर्नाटक इनोव्हेशन ॲण्ड टेक्नॉलॉजी सोसायटी (केआयटीएस) हा कर्नाटक सरकारचा उपक्रम तसेच सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ  इंडिया (एसटीपीआय) आणि एमएम ऍक्टिव्ह साय-टेक कम्युनिकेशन्स यांच्या सहकार्याने ही  तंत्रज्ञान शिखर परिषद आयोजित केली आहे.

जागतिक शौचालय दिनी  'सर्वांसाठी शौचालय' संकल्प आणखी दृढ करण्याचा भारताचा निश्चय - पंतप्रधान : आज जागतिक शौचालय दिनाच्या दिवशी आपला देश, सर्वांसाठी शौचालय या संकल्पाला आणखी मजबूत करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 26 नोव्हेंबर 2020 रोजी, तिसऱ्या जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषद आणि प्रदर्शन-री-इन्व्हेस्ट -2020(RE-INVEST 2020), चे उघाटन होणार आहे. ब्रिटनचे व्यापार, ऊर्जा आणि औद्योगिक धोरण राज्यमंत्री आणि डेन्मार्कचे ऊर्जा, सार्वजनिक सुविधा आणि हवामान विभागाचे मंत्री देखील या परिषदेच्या उद्घाटन सत्रात आपले विचार मांडतील.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

देशात गेल्या 24 तासात  45,576 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 48,493 रुग्ण बरे झाले.  यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत 2917 इतकी घट झाली आहे.

गेले सलग 47 दिवस बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येपेक्षा अधिक नोंदली जात आहे.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या आज एकूण बाधित रुग्णांच्या संख्येच्या 5% पेक्षा खाली घसरली.

नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची दैनंदिन संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत कायम घट होताना दिसत आहे.

देशात सध्या उपचाराधीन  रुग्णसंख्या 4,43,303 इतकी असून ती एकूण कोविड-19 रुग्णसंख्येच्या केवळ 4.95 टक्के इतकी आहे.

नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची दैनंदिन संख्या दर 24 तासांनी वाढत असल्यामुळे रुग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा होऊन तो 93.58 टक्के इतका झाला आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 83,83,602 इतकी झाली आहे. बरे झालेले रुग्ण आणि उपचाराधीन रुग्ण यातील अंतर झपाट्याने वाढत असून ते 79,40,299 इतके आहे.

बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 77.27  टक्के रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

केरळमध्ये सर्वाधिक 7,066 रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत काल 6,901 रुग्ण बरे झाले तर महाराष्ट्रात 6,608 रुग्ण बरे झाले आहेत.

नवीन नोंद झालेल्या रुग्णांपैकी 77.28 टक्के रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

गेल्या 24 तासात दिल्लीत 7,486, केरळमध्ये 6,419 तर महाराष्ट्रात 5,011 नवीन रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात नोंद झालेल्या 585 मृत्यूंपैकी 79.49 टक्के मृत्यू 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

 

गेल्या 24 तासात झालेल्या मृत्यूंपैकी 22.39 टक्के म्हणजे 131 मृत्यू दिल्लीत झाले आहेत. महाराष्ट्रात 100 आणि पश्चिम बंगालमध्ये 54  मृत्यूंची नोंद झाली.

 

इतर अपडेट्स:

 

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 33 व्या स्टॉप टीबी भागीदारी मंडळाच्या बैठकीला संबोधित केले. कोविड-19 ने संसर्गजन्य रोगांविरूद्धच्या लढाईला अनेक वर्षांसाठी मागे नेऊन ठेवले आहे याची कबुली देत  डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, “या प्राणघातक विषाणूने कित्येक दशकांतील आमचे  प्रयत्न मोडून काढले आहेत आणि टीबीसारख्या अनेक संसर्गजन्य प्राणघातक रोगांकडे वैज्ञानिकांचे लक्ष वेधले आहे.

गृहनिर्माण आणि शहरी कामकाज राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) हरदीपसिंग पुरी यांनी आज नमूद केले की सार्वजनिक स्वच्छतेच्या हितासाठी अपरिहार्य कारणाव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीने मलनिःस्सारण वाहिन्या  किंवा सेप्टिक टँकमध्ये प्रवेश करण्याची आवश्यकता नसल्याचे सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. नवी दिल्लीत वेबिनारमध्ये सफाईमित्र सुरक्षा आव्हान सुरू करताना ते पुढे म्हणाले की, या संदर्भात आपण सफाईमित्र सुरक्षा आव्हान सुरू करून  आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत आहोत ज्याचे उद्दिष्ट मलनिःस्सारण वाहिन्या  किंवा सेप्टिक टँकची  धोकादायक साफसफाई करताना कुणालाही प्राण गमवावे लागू नयेत हे आहे.

पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आज सुवर्ण चतुष्कोन आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर 50 एलएनजी इंधन केंद्रांचा पायाभरणी सोहळा पार पडला. भारताला वायू आधारीत अर्थव्यवस्था करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्पना साकार करण्याच्या दृष्टीने पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने हाती घेतलेल्या उपक्रमांतर्गत या केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.

 

 

महाराष्ट्र अपडेट्स:

कोविड 19 च्या संभाव्य प्रसाराचा माग घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आठवड्याभरापासून गर्दी असलेल्या बाजारपेठांमधील फेरीवाले, दुकान मालक, मदतनीस आणि वाहतूकदार, बेस्ट आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहनचालकांची कोविड -19 चाचणी सुरू केली आहे. दिवाळीचा सण संपल्यानंतर, गर्दी असलेल्या बाजारपेठा आणि सार्वजनिक वाहतूक यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता महानगरपालिकेने वर्तवली आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी माहिती दिली की महानगरपालिकेने शहरातील 24 प्रभागात प्रत्येकी 10 मोफत चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. बुधवारी महाराष्ट्रात 5,011 नवीन रुग्णांची नोंद झाली, यामुळे राज्यात एकूण रुग्णसंख्या 17,57,520 इतकी झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या काही दिवसांत रुग्णांची दैनंदिन संख्या 3,000 च्या आसपास स्थिर राहिली आहे.

 

FACT CHECK

 

 

Image

***

S.Thakur/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1674155) Visitor Counter : 168