उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी केले देशव्यापी जलसंधारण मोहिमेचे आवाहन
Posted On:
19 NOV 2020 5:14PM by PIB Mumbai
भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज देशव्यापी पाणीबचत मोहिमेचे आवाहन केले आणि प्रत्येक नागरीकाला पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवत जलयोद्धा बनण्याचा आग्रह केला. या सध्याच्या काळात या समस्येचे गांभीर्य आता प्रत्येकालाच उमगले पाहिजे त्यानुसार त्वरीत पाणी वाचवण्यासाठी शक्य ते प्रत्येकानेच अवलंबणे आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात जगाला गंभीर पाणी तुटवड्याला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले.
न्यूज 18 व हार्पिकतर्फे आयोजित केलेल्या मिशन पाणीच्या ‘जल प्रतिज्ञा दिवस’ कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीने बोलताना उपराष्ट्रपतींनी मुख्य जलसमस्येवर एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. न्यूज 18 व हार्पिकने योग्य दिशेने पाउल उचलल्याचे सांगत उपराष्ट्रपतींनी त्यांची पाठ थोपटली. ‘जल प्रतिज्ञा दिवस’ याच्या आयोजनाबद्दलही उपराष्ट्रपतींनी त्यांचे कौतुक केले.
“पृथ्वीवर फक्त 3% गोडे पाणी उपलब्ध आहे त्यापैकी 0.5% पेयजल आहे. भारताची लोकसंख्या ही जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 18% एवढी आहे मात्र जगातील पाणीसाठ्यांपैकी फक्त 4% पाणीसाठे भारतात आहेत”, असे उपराष्ट्रपतींनी नमूद केले.
सध्या साधारण 2.2 अब्ज लोकांना सुरक्षित राखलेले पेयजल मिळत नाही तर साधारण 4.2 अब्ज किंवा जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 55% लोकसंख्या सध्याच्या काळात शौचालयाविना जीवन जगते, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालाचा उल्लेख करत उपराष्ट्रपतींनी सांगितले.
जलतुटवड्याचा स्त्रिया व मुलांवर विपरीत परिणाम होतो याकडे उपराष्ट्रपतीं लक्ष वेधले. “दररोज लांबून पाणी आणणाऱ्या स्त्रिया दैनंदिन 200 दशलक्ष तास खर्च करतात. आपल्या मातांबरोबर हे ओझे अंगावर वागवत जगभरातील बालकेही प्रत्येक दिवसाचे 200 दशलक्ष तास वाया घालवतात.”
“भारतातील पाणीसमस्याही चिंताकारक आहे आणि आपण त्यावर ‘चलता है’ अशी आत्ममग्न भूमिका घेउन चालणार नाही.”, असे मत उपराष्ट्रपतींनी भारतातील पाणीटंचाईवर चिंता व्यक्त करताना मांडले. ही परिस्थिती पालटून टाकण्यासाठी आपल्याला अनेक प्रतिज्ञा पाळाव्या लागतील असे नायडू म्हणाले. प्रत्येक तळे, प्रत्येक नदी, प्रत्येक झरा आणि निर्झर यांना प्लॅस्टीक बॅगा, डिटर्जंट्स, मानवी मलमूत्र, कचरा आणि औद्योगिक टाकावू पाणी यापासून वाचवण्यासाठी प्रतिज्ञा करण्याचे आवाहन नायडूंनी केले.
जलप्रदुषण, भूजल दूषित होणे टाळण्यासाठी तसेच घरगुती व औद्योगिक सांडपाण्यावर योग्य त्या प्रक्रिया करण्यासाठी, शाश्वत उपाययोजना करण्याचा सल्ला त्यांनी दिला. “पाण्याचा शेतीसाठी सुयोग्य वापर करण्यासाठी ठिबक सिंचन वा स्प्रिंकलर्स व्यवस्था यांना मोठया प्रमाणावर प्रोत्साहन दिले पाहिजे” असेही त्यांनी सांगितले.
नुकतेच आपण पाणीबचतीसाठी जनआंदोलन उभे करण्याचे आवाहन केले असे सांगत उपराष्ट्रपतींनी सरकार पाणीबचतीसाठी योग्य ती पावले उचलत आहे असे सांगितले. “नमामि गंगे, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, अटल भूजल योजना, जल जीवन मिशन आणि जलशक्ती अभियान यासारख्या योजना कौतुकास्पद आहेत” असे ते म्हणाले.
जलसाठ्यांच्या एकात्मिक नियोजनाला प्रेरणा मिळावी म्हणून तसेच जलसंधारणाला चालना, पाणी रिचार्ज करणे, पाण्याचा पुनर्वापर आणि पाणीसुरक्षेची हमी देण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना झाल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.
पाणी धोरणाबद्दल त्यांनी मेघालयाची तर ‘हर घर जल’ चे उद्दीष्ट साध्य केल्याबद्दल गोवा राज्याची प्रशंसा केली.
‘पानी अँथेम (गान)’ च्या संगीताबदद्ल त्यांनी ए आर रेहमान तर त्या गानाच्या रचनेबद्दल गीतकार प्रसून जोशी यांची प्रशंसा केली.
M.Chopade/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1674046)
Visitor Counter : 223