आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

संकटाचे संधीमध्ये रुपांतर : कोविड-19ची देशभर पसरलेली साथ नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या सज्जतेचा, भारत 2025 पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कशाप्रकारे वापर करू शकतो याचा डॉ. हर्षवर्धन यांनी केला खुलासा


“क्षयरोग निर्मूलनासाठी, विचारी नेतृत्व, सामर्थ्यशाली सामाजिक व राजकीय बांधिलकी आणि सामाजिक उद्योजकता यांच्या माध्यमातून जनआंदोलन उभारून धोरणात्मक समर्थन निर्माण करणे आवश्यक

Posted On: 18 NOV 2020 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 नोव्‍हेंबर 2020


केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 33 व्या स्टॉप टीबी भागीदारी मंडळाच्या बैठकीला संबोधित केले.

कोविड-19 ने संसर्गजन्य रोगांविरूद्धच्या लढाईला अनेक वर्षांसाठी मागे नेऊन ठेवले आहे याची कबुली देत  डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, “या प्राणघातक विषाणूने कित्येक दशकांतील आमचे  प्रयत्न मोडून काढले आहेत आणि टीबीसारख्या अनेक संसर्गजन्य प्राणघातक रोगांकडे वैज्ञानिकांचे लक्ष वेधले आहे. लॉकडाऊनमुळे रुग्णांसमोर अनेक अडथळे निर्माण झाले आहेत आणि अजूनही लोकं कोरोना विषाणूच्या भीतीच्या सावटाखाली जगत आहेत.  मागील दहा महिन्यांत आपण सर्वांनी उपचारांमधील व्यत्यय, औषधांच्या तुटवडा, वैद्यकीय चाचण्यांचा पुरवठा कमी होणे, निदानास उशीर, पुरवठा साखळीतील अडथळा, उत्पादन क्षमतेत घट आणि औषध घेण्यासाठी रूग्णांना सर्व अडथळे पार करत दूरदूरच्या दवाखान्यांमध्ये जावे लागणे या सर्व बाबी पाहिल्या आहेत.”

साथीच्या रोगाच्या काळातही  क्षय रोग नियंत्रण  कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसंदर्भात अनेक देशांशी  संपर्क साधण्याबद्दल स्टॉप टीबी भागीदारीचे अभिनंदन करताना मंत्री म्हणाले, 2030 च्या जागतिक लक्ष्याच्या पाच वर्ष आधी अर्थात 2025 पर्यंत क्षय रोग नियंत्रणाशी संबंधित शाश्वत विकास लक्ष्य साध्य करण्याचे उद्दिष्ट असलेल्या "टीबी हरेगा, देश जीतेगा" मोहिमेचे उद्दीष्ट यावेळी मंत्र्यांनी अधोरेखित केले; टीबी बाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी  भारताने अथक प्रयत्न केले आणि 'मिसिंग मिलियन टीबी केसेस’ मधील दरी कमी करण्यात यश मिळविले’.

कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी नमूद केले की, “जानेवारी ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत केवळ 14.5 लाख टीबी प्रकरणांची माहिती नमूद करण्यात आली आहे, जी वर्ष 2019 मधील याच कालावधीपेक्षा 29 टक्क्यांनी कमी आहे, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मणिपूर आणि गोवा यासारख्या काही राज्यांमध्ये ही घट  35 ते 40 टक्क्यांहून अधिक आहे.” याच अनुषंगाने त्यांनी सिक्कीम, तेलंगणा, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, केरळ, हिमाचल प्रदेश आणि ओडिशा या राज्यांतील परिस्थितीवर प्रकाश टाकला ज्यात लॉकडाऊन कालावधीतही 20 टक्क्यांहून कमी परिणाम झाला. “या राज्यांनी क्षयरोग रुग्ण शोध मोहीम कोविड प्रतिबंधक उपायांसह एकत्रित करण्याचे धोरण आखले,” असे ते पुढे म्हणाले.

कोविड-19 साथीच्या आजारामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवरील उपाययोजनांच्या संदर्भात बोलताना  डॉ. हर्षवर्धन यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने द्वि-दिशात्मक टीबी-कोविड चाचणी, आयएलआय आणि सारी रुग्णांची तपासणी, खासगी क्षेत्रातील सहभाग वृद्धिंगत करणे, नूतनीकृत एचआर आणि सीबीएनएएटी आणि ट्रूनाट मशीन पुन्हा टीबी व्यवस्थापनासाठी वापरण्यासंदर्भात  केलेल्या शिफारशीचा उल्लेख केला.  

सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे क्षय रोग नियंत्रणाशी संबंधित सेवा हळूहळू कशा  सुधारत आहेत याचा त्यांनी अहवाल सादर  केला, “आरोग्य सुविधा केंद्र अन्य  आजाराच्या  उपचारासाठी सुरू होत आहेत आणि जास्तीत जास्त लोक चाचणी करून घेण्यासाठी स्वतःहून सरकारी आणि खासगी  केंद्रात जात आहेत. आउटरिच कार्यक्रमाच्या माध्यमातून रुग्ण शोध सुरु आहे. कोविड व्यवस्थापनासाठी वळविण्यात आलेले कर्मचारी हळूहळू जुन्या कामावर रुजू होत असल्याने  समुपदेशन, संपर्क ट्रेसिंग आणि पौष्टिक आधाराच्या वितरणासारख्या सार्वजनिक आरोग्याच्या कृतीही जोर धरत आहेत.”

संकटाला संधीमध्ये रुपांतर करण्याच्या भारताच्या धोरणाबद्दल बोलताना डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, “कोविड-19 ने आरोग्य यंत्रणा बळकट आणि संक्रमक रोग नियंत्रणाद्वारे टीबी निर्मूलन कार्यात वाढ करण्याची संधी दिली आहे.” विशेषत: त्यांनी खालील बाबींवर  प्रकाश टाकला:

  1. साथीच्या आजाराच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून अनेक समर्पित संसर्गजन्य रोग रुग्णालये स्थापन झाली आहेत ज्यामुळे टीबीची देखभाल व व्यवस्थापनासाठी मोठा हातभार लागेल.
  2. देशातील रेण्विय निदान क्षमता अनेक पटींनी वाढली आहे. कार्ट्रिजेस आणि चिप-आधारित तंत्रज्ञानावर आधारित ही बहु-मंचीय उपकरणे टीबी निदानाचे विकेंद्रीकरण करू शकतात.
  3. खोकला असताना घ्यायची काळजी, मास्क वापरणे, शारीरिक अंतर यासारख्या साथीच्या सर्व आजारांदरम्यान घेण्यात आलेल्या वर्तन बदलांमुळे क्षयरोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होते.
  4. साथीच्या आजाराच्या कालावधीत सुरु झालेल्या टेलीमेडिसिन आणि दूरस्थ सल्लामसलत यापुढे शृंखला क्षयरोग व्यवस्थापनात देखील प्रदान केली जाईल.

सरकारी धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी जगातील आरोग्य नेतृत्वाला प्रोत्साहन दिले पाहिजे, आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक वाढविणे तसेच टीबीसारख्या अनियंत्रित संसर्गजन्य आजारांमुळे होणाऱ्या मौल्यवान जीवित हानीबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे असे सांगत डॉ. हर्ष वर्धन यांनी शेवटी सांगितले की, “जर आपण या आजाराच्या विरोधात जनआंदोलन निर्माण करू शकलो तर क्षयरोग निर्मूलन करणे इतके कठीण नाही. यासाठी  धोरणात्मक समर्थन, विचारी नेतृत्व, विदारी सामाजिक उद्योजकता आवश्यक आहे. आणि मुख्य म्हणजे, त्यासाठी सामर्थ्यशाली सामाजिक आणि राजकीय बांधिलकी आवश्यक आहे. ”

आरोग्य  विभागाचे सह सचिव श्री. विकास शील आणि  अन्य वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

* * *

Jaydevi PS/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1673881) Visitor Counter : 284