PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
03 NOV 2020 8:05PM by PIB Mumbai

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)

#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona


दिल्ली-मुंबई, 3 नोव्हेंबर 2020
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी व्हिएन्नामधील भयानक दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केला आहे. पंतप्रधान म्हणाले, “व्हिएन्नामधील भयानक दहशतवादी हल्ल्यांमुळे तीव्र धक्का बसला आहे आणि याबद्दल मी दुःख व्यक्त करतो. या दुःखद काळात भारत ऑस्ट्रियाच्या मागे खंबीर उभा आहे. माझ्या सहवेदना पीडित आणि त्यांच्या कुटुंब समवेत आहेत.”
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
कोविड विरुद्ध लढ्यात भारताने अनेक महत्वपूर्ण मैलाचे दगड पार केले आहेत. गेल्या २४ तासात ४० हजारांहून कमी नव्या रुग्णांची नोंद झाली. 15 आठवड्यानंतर (105 दिवस) एका दिवसातील रुग्णांची संख्या 38310 इतकी नोंदली गेली. 22 जुलै 2020 रोजी 37,724 नवे रुग्ण आढळले होते.
दररोज मोठ्या संख्येने कोविड रूग्ण बरे होत आहेत आणि मृत्यु दरात सातत्याने घसरण होत आहे, त्यामुळे भारताची सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे.
भारताने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून सक्रिय रुग्णांची संख्या 5.5 लाखांच्या खाली घसरली आहे. देशातील उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 5,41,405 आहे आणि आता ती एकूण बाधित रुग्णांच्या केवळ 6.55% आहे.
गेल्या 24 तासात देशभरात 58,323 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दरही वाढून 91.96%.झाला आहे.
बरे झालेल्या रुग्णांपैकी 80%10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातले आहेत.
एका दिवसात 10,000 हून अधिक रुग्ण बरे झालेल्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे, त्यापाठोपाठ कर्नाटकमध्ये 8,000 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत.
नवीन रुग्ण संख्येपैकी 74% 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
केरळ, दिल्ली आणि महाराष्ट्रात 4,000 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. पश्चिम बंगालमध्ये 3,000 पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत.
गेल्या 24 तासांत 490 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी जवळपास 80% प्रामुख्याने दहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशातले आहेत. महाराष्ट्रात एकाच दिवसात सर्वाधिक मृत्यू (104 मृत्यू) झाले आहेत.
भारताचा मृत्यू दर 1.49%. आहे.
इतर अपडेट्स:
महाराष्ट्र अपडेट्स:
महाराष्ट्रात सोमवारी 4,008 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली. पण त्याचबरोबर 10,225 रुग्ण बरे झाले आहेत त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 1.18 लाखांवर आली आहे. मुंबईत 706 नवीन रुग्ण आढळून आले असून हा गेल्या 69 दिवसातील नीचांक आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 90% पर्यंत पोहोचला असून शहरातील संसर्ग पसरण्याचा दर 1.06 टक्क्यांवरून 0.49 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. कोविडची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असून, कोणत्याही परिस्थितीसाठी राज्य सक्षम असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नमूद केले आहे.
FACT CHECK


* * *
B.Gokhale/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1669850)
Visitor Counter : 219