संरक्षण मंत्रालय

मलबार-20

पहिला टप्पा:- 3 ते 6 नोव्हेंबर 2020

Posted On: 02 NOV 2020 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2020

बार नौसेना कवायतीच्या 24 व्या आवृत्तीचे आयोजन नोव्हेंबर, 2020 मध्ये दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिला टप्प्याचे आयोजन दि. 3 ते 6 नोव्हेंबर 2020 मध्ये होणार  आहे. विशाखापट्टणम येथे बंगालच्या खाडीत ही संयुक्त कवायत होणार आहे. यामध्ये  भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या नौसेनांची पथके सहभागी होणार आहेत.

नौसेना कवायत मबार मालिकेला 1992 मध्ये भारत आणि अमेरिका यांच्या व्दिपक्षीय कवायतींनी प्रारंभ झाला होता. त्यांनतर 2015 पासून जपानच्या नौसेनेचे दल यामध्ये सहभागी झाले. आणि यंदापासून ऑस्ट्रेलियाचे नौसेना दलही सहभागी होणार आहे.

मलबार-20 च्या पहिल्या टप्प्यात भारतीय नौसेना, अमेरिकेची क्षेपणास्त्र विनाशिका, ऑस्ट्रेलियाचे एमएच-60 हेलिकॉप्टरसहित लांब पल्ल्याची युद्ध नौका आणि जपान नौसेनेच्या ओनामी विनाशिकेबरोबर एसएच-60 हेलिकॉप्टर सहभागी होणार आहे.

या संयुक्त कवायतीमध्ये पहिल्या टप्प्यात भारतीय नौसेना दलाचे नेतृत्व फ्लॅग फिसर कमांडिंग ईस्टर्न फ्लीट, रियर डमिरल संजय वात्सायन करणार आहेत. या कवायतीमध्ये भारतीय नौसेनेच्या वतीने विनाशक रणविजय, युद्ध नौका शिवालिक, तैनाती जहाज सुकन्या, पुरक जहाज शक्ती आणि पाणबुडी सिंधुराज यांचा सहभाग असणार आहे. याच्याच जोडीला अत्याधुनिक जेट  ट्रेनर हॉक, लांब पल्ल्याचे तैनाती पी-81, डॉर्नियर, आणि हेलिकॉप्टर्स यांचाही सहभाग संयुक्त कवायतीमध्ये असणार आहे.

संपूर्ण विश्वभर कोविड-19 महामारीचा झालेला उद्रेक लक्षात घेवून या कवायती कोणत्याही संपर्काविना केवळ सागरी स्तरावर आयोजित करण्यात आल्या आहेत. या कवायतीमंध्ये सहभागी होत असलेल्या देशांमधले मैत्रीपूर्ण संबंध आणि सेनांमध्ये उच्चस्तरावर साधले जाणारे समन्वय आणि संतुलन यांचे प्रदर्शन होणार आहे. इंडो-पॅसिफिकमधील सहकार्य, समान मूल्ये आणि कटिबद्धता यांच्यासह आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारित या कवायती करण्यात येणार आहेत.

मलबार 20 च्या पहिल्या टप्प्यामध्ये उच्चस्तरीय नौसैन्याच्या कवायती पहायला मिळणार आहेत. यामध्ये पाणबुडी विरोधात आणि हवाई हल्ल्याच्या विरोधात युद्ध संचालन, नौसैनिक विकास आणि शस्त्रास्त्रे चालविण्याचा सरावही करण्यात येणार आहे.

मलबार 20 च्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन नोव्हेंबर 2020 च्या मध्यात अरबी सागरात करण्यात येणार आहे.

 

M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1669580) Visitor Counter : 115