रसायन आणि खते मंत्रालय

‘एनएफएल’च्या एस.एस.फॉस्फेट आणि बेंटोनाइट सल्फरच्या विक्रीमध्ये वाढ


देशामध्ये खतांच्या संतुलित वापराला प्रोत्साहन

Posted On: 03 NOV 2020 3:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 नोव्‍हेंबर 2020

 

देशामध्ये खतांचा वापर संतुलित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. यासाठी एनएलएफ म्हणजेच राष्ट्रीय खते लिमिटेडच्या वतीने शेतकरी बांधवांना यूरिया नसलेल्या डीएपी, एमओपी, एनपीके आणि सल्फर आधारित खतांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. एनएफएलच्या या प्रयत्नांना चांगले यश आले असून यंदाच्या आर्थिक वर्षात पहिल्या सात महिन्यांमध्ये सर्व प्रकारच्या गैर-यूरिया खतांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/IMG-20201102-WA0053GENI.jpg

कंपनीने सल्फर आधारित खतांच्या विक्रीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत याच काळामध्ये बेंटोनाइट सल्फरची 237 टक्के आणि एसएसपीमध्ये 133 टक्के विक्री जास्त झाली आहे. एनएफएलच्या पानीपत प्रकल्पामध्ये उत्पादित करण्यात आलेल्या बेंटोनाइट सल्फरची एप्रिल-ऑक्टोबर 2020 या काळामध्ये 11,730 मेट्रिक टन विक्री झाल्याची नोंद आहे. गेल्यावर्षी याच काळामध्ये 3,478 मेट्रिक बेंटोनाइट सल्फरची विक्री झाली होती. त्याचबरोबर एसएसपीची विक्रीही 14,726 मेट्रिक टन झाली आहे. गेल्यावर्षी या काळात 6,323 मेट्रिक टन एसएसपीची विक्री झाली होती. 

शेतामधील जमिनीला, मातीला संतुलित पोषण देण्यासाठी सर्व प्रकारच्या खतांचा वापर करण्यासाठी शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय खत कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्ही.एन.दत्त यांनी सांगितले. 

शेतातले पिक जोमाने वाढण्यासाठी आणि अशा सुदृढ पिकांतून जास्त अन्नधान्य मिळविण्यासाठी शेतात पिकांसाठी सल्फरचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच सल्फर नायट्रोजनमधून पिकांचे चांगले पोषण होते. राष्ट्रीय खते कंपनीमार्फत यूरिया, डीएपी, एमओपी, एनपीके, एपीएस, सेंद्रिय खत, एसएसपी आणि बेंटोनाइट सल्फर यांच्याशिवाय इतरही विविध प्रकारच्या जैविक खतांचे विपणन केले जाते. यामुळे शेतकरी बांधवांना एकाच खते कंपनीच्या दुकानामध्ये गेले की, सर्व प्रकारची खते उपलब्ध होतात. 

नायट्रोजन, फाॅस्फरस आणि पोटॅश यांच्यानंतर सल्फरयुक्त खतांमुळे पिकांचे चांगले पोषण होते. शेतातल्या मातीच्या आवश्यकतेप्रमाणे सल्फरची कमतरता पूर्ण करावी लागते. भारतामध्ये बहुतांश भागातल्या कृषी जमिनीमध्ये सल्फरचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे त्याची पूर्तता सल्फरयुक्त खते देवून करावी लागते. असे सल्फरयुक्त खत तेलबिया, डाळी, ऊस, भाजीपाला, भात, फळबागा यांच्यासाठी आवश्यक असते.

शेतकरी बेंटोनाइट सल्फर आणि एसएसपी यांचा वापर करून मातीमध्ये कमी असलेल्या सल्फरची भरपाई करतात. बेंटोनाइट सल्फरमध्ये 90 टक्के सल्फर असते. तर एसएसपीमध्ये 11 टक्के सल्फर, 16 टक्के पीटूओफाइव्ह आणि 21 टक्के कॅल्शियम असते. 


* * *

M.Iyengar/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1669765) Visitor Counter : 188