गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

हरदीप एस. पुरी 13 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स 2020 चे उद्घाटन करणार


प्रख्यात डॅनिश आर्किटेक्ट, अर्बनिस्ट, प्राध्यापक आणि आधुनिक शहरी नियोजनाचे संस्थापक प्रा. जान गेहल परिषदेला संबोधित करणार

परिषदेची संकल्पना -“शहरी गतिशीलतेतील उदयोन्मुख कल” लोकांना सुलभ आणि सोयीस्कर वाहतुक पुरवण्यासंदर्भात कोविड -19 मुळे उद्भवलेल्‍या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उपाययोजना

Posted On: 03 NOV 2020 5:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 नोव्‍हेंबर 2020


गृहनिर्माण आणि  शहरी कामकाज मंत्रालयाने  9  नोव्हेंबर 2020 रोजी  13 व्या  अर्बन मोबिलिटी इंडिया (यूएमआय) परिषदेचे आयोजन केले आहे.दिवसभर चालणारी ही परिषद  व्हिडीओ कॉन्फरन्स / वेबीनरद्वारे ऑनलाईन आयोजित केली जाईल. या वर्षीच्या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना आहे-  “शहरी गतिशीलतेतील उदयोन्मुख कल” असून लोकांना सुलभ आणि सोयीस्कर वाहतुक पुरवण्यासंदर्भात कोविड -19 मुळे उद्भवलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या नाविन्यपूर्ण उपायांवर भर असेल. गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदीप एस. पुरी उद्घाटनपर  भाषण देतील तर मे  गेहल आर्किटेक्टचे  संस्थापक व ज्येष्ठ सल्लागार प्रा. जान गेहल यांचे प्रमुख भाषण होईल.   गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा “शहरी गतिशीलतेतील उदयोन्मुख कल ” वरील पूर्ण सत्राचे अध्यक्ष असतील. 

आतापर्यंत पुढील संकल्पनांवर 12  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदांमधील सहभागामुळे  राज्य सरकारे, शहर प्रशासन आणि इतर हित धारकांना मोठा लाभ झाला आहे

अनु क्र

वर्ष

संकल्पना

 ठिकाण

1.

2008

शहरी गतिशीलता

प्रगती मैदान, नवी दिल्ली

2.

2009

शाश्वत नागरी वाहतूक

इंडिया हैबिटेट सेंटर, नवी दिल्ली

3.

2010

शाश्वत शहरे

हॉटेल ग्रँड, नवी दिल्ली

4.

2011

शाश्वत गतिशीलता

मानेकशा सेंटर, नवी दिल्ली

5.

2012

स्मार्ट शहरे

मानेकशा सेंटर, नवी दिल्ली

6.

2013

वाहतुकीद्वारे शहरांचे परिवर्तन

मानेकशा सेंटर, नवी दिल्ली

7.

2014

शाश्वत शहरांसाठी शाश्वत वाहतूक

मानेकशा सेंटर, नवी दिल्ली

8.

2015

जीवनक्षमतेसाठी गतिशीलता परिवर्तन

मानेकशा सेंटर, नवी दिल्ली

9.

2016

शाश्वत शहरासाठी गतिशीलता नियोजन

महात्मा मंदिर गांधीनगर , गुजरात

10.

2017

हुशार, सर्वसमावेशक आणि शाश्वत गतिशीलता

हैदराबाद आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र , तेलंगण

11

2018

हरित शहरी गतिशीलता

चिटणवीस केंद्र, नागपूर, महाराष्ट्र

12

2019

सुगम्य आणि राहण्यायोग्य शहरे

इंदिरा गांधी प्रतिष्ठान लखनौ

 

12 वी यूएमआय परिषद 2019

इंदिरा गांधी प्रतिष्ठान, लखनौ इथे 15 ते 17 नोव्हेंबर 2019 दरम्यान  12 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया (यूएमआय) परिषदेचे  आयोजन करण्यात आले होते. सुगम्य आणि राहण्यायोग्य शहरे ही परिषदेची संकल्पना होती.   गृहनिर्माण व शहरी कामकाज राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार ) हरदीपसिंग पुरी यांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते परिषदेचे आणि प्रदर्शनाचे उद्घाटनझाले. या परिषदेत 10 देशांचे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी   विद्यार्थी,  शहरी वाहतूक तज्ञ, अभ्यासक,  संशोधक, विद्वान आणि 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.

भारतातील शहरीकरण ही 21व्या शतकाची वास्तविकता आहे, ज्याने जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताच्या विकासाला सुरुवात केली. परिवहन विभाग हा शहरी अर्थव्यवस्थेचा  एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र  वेगाने वाढणारी गतिशीलता, गरजा आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता यामुळे वाहनांच्या मालकीपासून ते वाहन सामायिकरण आणि सार्वजनिक वाहतुकीकडे ओघ  अपेक्षित आहे, त्यामध्ये मल्टीमोडल वेगवान  संपर्क व्यवस्था आणि स्वच्छ गतिशीलता यावर जास्त भर  देण्यात आला आहे. हे उदयोन्मुख कल  प्रवाशांच्या अपेक्षेत एक आमूलाग्र  बदल घडवण्याची  शक्यता आहे आणि आपल्या शहरांना वेगाने बदलणार्या गतिशीलता गरजेनुसार बदल करण्याची  गरज आहे. या समस्या सोडवण्यासाठी  गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने राष्ट्रीय शहरी परिवहन धोरण, 2006 (एनयूटीपी) प्रसिद्ध केले.

एनयूटीपीचा एक भाग म्हणून, यूएमआय म्हणून प्रसिद्ध असलेल्या अर्बन मोबिलिटी इंडिया वर वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद-सह-प्रदर्शन आयोजित करण्यासाठी मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. शहरांना  माहिती प्रसारित करणे हे या परिषदेचे मुख्य उद्दीष्ट आहे, या  परिषदेला उपस्थित अधिकाऱ्यांना जागतिक स्तरावरील अद्ययावत व सर्वोत्तम नागरी वाहतुकीच्या पद्धतींची माहिती दिली जाते. . देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय  व्यावसायिकांशी, तंत्रज्ञान आणि सेवा प्रदात्यांशी संवाद साधण्याची संधी या परिषदेत उपलब्ध आहे . या कार्यक्रमाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञ, तंत्रज्ञान आणि सेवा पुरवठादार ,  धोरणकर्ते, व्यावसायिक आणि नागरी वाहतूक क्षेत्रातील अधिकारी याना एकाच छताखाली एकत्र आणले आहे. 

 

* * *

M.Iyengar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1669786) Visitor Counter : 211