PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
29 OCT 2020 9:12PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 29 ऑक्टोबर 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)

#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona

‘मिलाद-उन-नबी’च्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. कोविड- 19 महामारीचा उद्रेक लक्षात घेवून मिलाद-उन-नबी सण साजरा करताना सर्वांनी आरोग्य आणि स्वच्छता राखण्यासाठी सामाजिक अंतराच्या आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.
भारत आणि कंबोडिया दरम्यान आरोग्य- औषध क्षेत्रातील सहकार्य सामंजस्य करारांना मंत्रिमंडळाची मान्यता
भारत आणि जपान यांच्यामधील माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सहकार्य करण्याच्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल प्रोग्राम अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांद्वारे इथेनॉल खरेदी करण्याच्या यंत्रणेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी-इथेनॉल पुरवठा वर्ष 2020-21 साठी सार्वजनिक क्षेत्रातील ओएमसींना पुरवठा करण्यासाठी इथेनॉल किंमतीत सुधारणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक बाबींवरील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने जागतिक बँक (डब्ल्यूबी) आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) च्या आर्थिक सहाय्याने बाह्य सहाय्यित धरण पुनर्वसन व सुधारणा प्रकल्पाच्या (डीआरआयपी), दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली. संपूर्ण देशभरात निवडलेल्या धरणांची सुरक्षा व कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी तसेच प्रणाली व्यवस्थापन पध्दतीसह संस्थागत मजबुतीकरणासाठी ही मान्यता देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधल्या केवडिया येथे सरदार पटेल यांची 145 वी जयंती 31 ऑक्टोबर 2020 रोजी एकता दिवसाच्या रुपाने साजरी करण्यासाठीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी यावेळी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला म्हणजेच सरदार वल्लभभाई यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करणार आहेत. सर्वजण एकता प्रतिज्ञा करणार असून पंतप्रधान यावेळी एकता दिन संचलनाची पाहणी करणार आहेत.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
जानेवारी 2020 पासून भारताने कोविड-19 चाचण्यांच्या व्यवस्थापनासंदर्भात चांगली प्रगती केल्यामुळे देशात कोविड-19 चाचण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ दिसून येत आहे. आता दररोज 15 लाख नमुन्यांची चाचणी केली जाऊ शकते.
गेल्या चोवीस तासात 10,75,760 नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून एकूण चाचण्यांच्या संख्येने 10.65 कोटींचा टप्पा पार केला आहे.
गेल्या सहा आठवड्यांदरम्यान दररोज सरासरी सुमारे 11 लाख नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे.
एकूण पॉझिटिव्हिटी दरात सातत्याने घट होत असून हा दर आज 7.54 टक्के इतका आहे.
देशातील कोविड चाचण्यांच्या सुविधांमध्ये व्यापक प्रमाणात वाढ झाल्याचा परिणाम म्हणून गेल्या तीन आठवड्यांमध्ये एकूण पॉझिटिव्हिटी दरात घट झाली आहे.
गेल्या नऊ दिवसात एक कोटी नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.64 टक्के आहे.
भारताने सक्रिय रुग्ण संख्येच्या प्रमाणातील घटही कायम राखली आहे. देशात आज सक्रीय रुग्णसंख्या 6,03,687 इतकी आहे. ही संख्या देशातील एकूण बाधित रुग्णांच्या 7.51 टक्के इतकी आहे.
सक्रीय रूग्ण संख्येत घट होत असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 73 लाखांच्याही (73,15,989) पुढे गेली आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यांच्यातील तफावत 67 लाखांहूनही (67,12,302) जास्त आहे.
बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ही तफावत आणखी वाढत आहे. गेल्या चोवीस तासात 56,480 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, तथापि 49,881 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
79 टक्के नवीन बरे झालेले रुग्ण दहा राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्रात एक दिवसात सर्वाधिक आठ हजार रुग्ण बरे झाले आहेत, तर त्याखालोखाल केरळमध्ये सात हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासात 49,881नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
79 टक्के नवीन रुग्ण दहा राज्य केंद्रशासित प्रदेशातील आहे. केरळ मध्ये सर्वाधिक आठ हजाराहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर त्याखालोखाल महाराष्ट्रात सहा हजाराहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या चोवीस तासात 517 रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी 81 टक्के मृत्यू दहा राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक 91 मृत्यूची नोंद झाली.
इतर अपडेट्स:
आरोग्यसेतू अॅपच्या संदर्भात माहिती अधिकार चौकशीच्या संदर्भात केंद्रीय माहिती आयोगाने दिलेल्या आदेशांविषयी माध्यमांच्या वृत्तांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. आदेशानुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, एनईजीडी आणि एनआयसीचे सीआयसी, सीपीआयओ यांना 24 नोव्हेंबर 2020 रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आदेशाचे पालन करण्यासंदर्भात आवश्यक ती पावले उचलत आहे.
केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या युके -भारत आर्थिक आणि वित्तीय मंत्रिस्तरीय संवादाच्या (ईएफडी) 10 व्या फेरीत भारतीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व केले. भारतीय प्रतिनिधीमंडळात अर्थ मंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक आणि सेबीच्या प्रतिनिधींचा समावेश होता. युकेच्या शिष्टमंडळाचे युकेचे वित्तमंत्री ऋषी सुनक यांनी केले.
रशियाच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फेरन्सिंगद्वारे एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या मंत्र्यांच्या झालेल्या 8 व्या बैठकीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिव गिरीधर अरामने सहभागी झाले होते. समाजामधील परस्पर विश्वास आणि सहकार्य यासाठी एससीओ देशांसोबत दळणवळणाला भारताचे प्राधान्य याबाबत अरामने यांनी माहिती सांगितली. कोविड 19 सारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाश्वत परिवहन संचालनासाठी आणि सीमा क्षेत्रात आपत्कालीन स्थितीच्या प्रसाराला पायबंद घालण्यासाठी सदस्य देशांच्या परिवहन मंत्रालय/ विभाग स्तरावर समन्वित कृतीची गरज त्यांनी व्यक्त केली.
शांघाय सहकार्य संघटनेच्या विदेश व्यापार आणि अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या मंत्र्यांची भारताच्या यजमानपदाखाली 19 वी बैठक झाली. कोविड-19 मुळे निर्माण झालेली संकटाची स्थिती म्हणजे आर्थिक बळ एकवटून या भागात व्यापार आणि गुंतवणुक वृद्धिंगत करणाऱ्या भागीदारी शोधण्यासाठीची हाक असल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी उद्घाटनप्रसंगी बोलतांना सांगितले.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भूविज्ञान खात्याचे मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन उपायांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले आहे. यामुळे संक्रमण परिस्थितीत आरोग्य आणि पर्यावरणावरील ताण कमी होण्यास मदत होईल. नुकत्याच झालेल्या वेबिनारमध्ये त्यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले.
महाराष्ट्र अपडेट्स
महाराष्ट्र सरकारने रेल्वे प्रशासनाला एक पत्र लिहल्यानंतर सर्वसामान्यांना मुंबई-लोकल रेल्वे गाड्यांद्वारे गर्दी नसलेल्या वेळेत प्रवास करण्याची परवानगी मिळाल्यानंतर पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने बुधवारी सांगितले की ते सामाजिक अंतराचे निकष पाळून उपनगरी सेवा वाढविण्यास तयार आहेत. बुधवारी मुंबईत 1,354 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 19,357 इतकी झाली आहे.
FACT CHECK



***
S.Thakur/S.Tupe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1668650)
Visitor Counter : 192