रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
परिवहन सचिवांनी एससीओ देशांशी भारताच्या दळणवळण प्राधान्याबाबत दिली माहिती; कोविड 19 साथीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत शाश्वत परिवहन संचालन सुनिश्चित करण्याची गरज
Posted On:
28 OCT 2020 11:01PM by PIB Mumbai
रशियाच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फेरन्सिंगद्वारे आज एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या मंत्र्यांच्या झालेल्या 8 व्या बैठकीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिव गिरीधर अरामने सहभागी झाले होते.
समाजामधील परस्पर विश्वास आणि सहकार्य यासाठी एससीओ देशांसोबत दळणवळणाला भारताचे प्राधान्य याबाबत अरामने यांनी माहिती सांगितली. कुशल परिवहन प्रणालीतील भारताचा अनुभवही सांगितला. कोविड 19 सारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाश्वत परिवहन संचालनासाठी आणि सीमा क्षेत्रात आपत्कालीन स्थितीच्या प्रसाराला पायबंद घालण्यासाठी सदस्य देशांच्या परिवहन मंत्रालय/ विभाग स्तरावर समन्वित कृतीची गरज त्यांनी व्यक्त केली.
***
B.Gokhale/S.Kakde/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1668328)
Visitor Counter : 141