मंत्रिमंडळ

भारत आणि जपान यांच्यामधील माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सहकार्य करण्याच्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 29 OCT 2020 4:41PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भारत आणि जपान यांच्यामधील माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये व्दिपक्षीय सहकार्य करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास मान्यता देण्यात आली.

या व्दिपक्षीय सहकार्य करारामुळे उभय देशांमध्ये समन्वय चांगले होण्यास मदत मिळणार आहे. भारताच्या दृष्‍टीने  रणनिती आखतांना पुढाकार घेताना, जपान हा विशेष सामरिक आणि जागतिक भागीदार म्हणून महत्वाचा देश आहे, त्याचा लाभ भारताला मिळू शकणार आहे.

या सामंजस्य करारामुळे 5 जी नेटवर्क, दूरसंचार सुरक्षा, सबमरीन केबल, दूरसंचार क्षेत्रामध्ये वापरण्यात येणा-या उपकरणांचे प्रमाणीकरण आणि प्रमाणपत्र, अत्याधुनिक बिनतारी संदेश तंत्रज्ञान, आयसीटी क्षमता निर्माण करणे, सार्वजनिक संरक्षण, आपत्ती निवारण, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रामध्ये देशाला जपानकडून सहकार्य मिळू शकणार आहे.

जपानबरोबरच्या या सामंजस्य सहकार्य करारामुळे भारताला जागतिक स्तरावरच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी  अनेक संधी मिळू शकणार आहेत. आयसीटी तंत्रज्ञान सहकार्यामुळे देशामध्ये आयसीटी पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत मिळणार आहे. तसेच नेटवर्क आणि तंत्रज्ञानाच्या सहकार्यामुळे देशातल्या दुर्गम भागाशी संपर्क साधणे शक्य होणार आहे. आयसीटी क्षेत्रामध्ये मनुष्य बळ क्षमता निर्माणासाठी आणि स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देताना आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करणेही शक्य होणार आहे.

*****

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1668430) Visitor Counter : 198