विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन उपायांची आवश्यकता- डॉ हर्ष वर्धन

Posted On: 28 OCT 2020 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2020


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भूविज्ञान खात्याचे मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन उपायांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले आहे. यामुळे संक्रमण परिस्थितीत आरोग्य आणि पर्यावरणावरील ताण कमी होण्यास मदत होईल. नुकत्याच झालेल्या वेबिनारमध्ये त्यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले.  

Webinar on liquid waste management1

जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनाची आवश्यकता आज खूप महत्त्वाची आहे, जैववैद्यकीय कचर्‍याच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी अगोदरच असलेले नियम आणि कायद्यांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. त्यांनी इंडिया वॉटर फांऊडेशन (IWF) आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यांनी भारतासह अनेक सदस्य देशांमध्ये पर्यावरणीय नीतीच्या माध्यमातून जनसंरक्षण केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.  

कोविड-19 दरम्यान द्रव कचरा व्यवस्थापन: भविष्यात आणखी काय? या विषयावरील इंडिया वॉटर फांऊडेशन आणि युनईपीने आयोजन केलेल्या वेबिनारला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय यांचे सहाय्य होते. द्रव कचरा व्यवस्थापन आणि जैववैद्यकीय कचर्‍याचे प्रभावी व्यवस्थापन या विषयावर वेबिनार केंद्रीत होता.  

वेबिनारचा मुख्य उद्देश म्हणजे कोविड-19 परिस्थितीतील कचरा व्यवस्थापनासंबंधीचे विविध पैलू आणि त्याचे सामाजिक-पर्यावरणीय परिणाम हा होता. जैववैद्यकीय कचऱ्यात द्रव कचरा मानवी आरोग्य आणि पर्यावरणासाठी हानीकारक आहे कारण द्रवरुप कचरा चुकीच्या पद्धतीने हाताळल्यास आणि योग्य विल्हेवाट नाही लावल्यास पिण्याच्या पाण्यातून पसरतो. 

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रो. आशुतोष शर्मा यांनी गेल्या 4-5 महिन्यांत विकसित करण्यात आलेल्या अभिनव उपक्रमाची माहिती दिली. श्री चित्र तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, त्रिवेंद्रम यासारख्या संस्थांची माहिती दिली. या संस्था आता व्यावसायिक उत्पादन घेत आहेत.   

प्रो. शर्मा यांनी विविध क्षेत्रांमध्ये होणारा पाण्याचा वापर याविषयी माहिती दिली. 75% पाणी कृषीसाठी वापरले जाते, तसेच आरोग्य आणि पाणी यांच्यात संबंध आहे, विशेषतः कोविड-19 सारख्या परिस्थितीत. जरी कोविड 19 चे जगातून उच्चाटन झाले तरी पाण्याची समस्या राहणार आहे. 

सहभागी वक्त्यांनी सांडपाणी निर्मिती, सांडपाण्यावर प्रक्रिया आणि विद्यमान सांडपाणी प्रक्रिया मूलभूत सुविधांचा क्षमता वापर याविषयी विश्वसनीय माहितीचा असलेला अभाव यावर प्रकाश टाकला.   

Webinar on liquid waste management   Webinar on liquid waste management2

* * *

M.Chopade/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1668213) Visitor Counter : 1146