आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात कोविड चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ
गेल्या नऊ दिवसात एक कोटी नमुन्यांची चाचणी
गेल्या सहा आठवड्यांदरम्यान दररोज सरासरी सुमारे 11 लाख नमुन्यांची चाचणी
कोविड चाचण्यांमध्ये वाढ झाल्यामुळे एकूण बाधित रुग्ण संख्येच्या दरात सातत्याने घट
Posted On:
29 OCT 2020 6:58PM by PIB Mumbai
जानेवारी 2020 पासून भारताने कोविड-19 चाचण्यांच्या व्यवस्थापनासंदर्भात चांगली प्रगती केल्यामुळे देशात कोविड-19 चाचण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ दिसून येत आहे. आता दररोज 15 लाख नमुन्यांची चाचणी केली जाऊ शकते.
गेल्या चोवीस तासात 10,75,760 नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून एकूण चाचण्यांच्या संख्येने 10.65 कोटींचा टप्पा पार केला आहे.
गेल्या सहा आठवड्यांदरम्यान दररोज सरासरी सुमारे 11 लाख नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे.

सर्वसमावेशक आणि व्यापक स्तरावर कोविड चाचण्या करण्यात येत असल्यामुळे पॉझिटिव्हिटी दरात घट दिसून येत आहे. राष्ट्रीय पातळीवर एकूण पॉझिटिव्हिटी दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे कोविडच्या प्रसाराला आळा बसत आहे. एकूण पॉझिटिव्हिटी दरात सातत्याने घट होत असून हा दर आज 7.54 टक्के इतका आहे.

देशातील कोविड चाचण्यांच्या सुविधांमध्ये व्यापक प्रमाणात वाढ झाल्याचा परिणाम म्हणून गेल्या तीन आठवड्यांमध्ये एकूण पॉझिटिव्हिटी दरात घट झाली आहे.

गेल्या नऊ दिवसात एक कोटी नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.64 टक्के आहे.

भारताने सक्रिय रुग्ण संख्येच्या प्रमाणातील घटही कायम राखली आहे. देशात आज सक्रीय रुग्णसंख्या 6,03,687 इतकी आहे. ही संख्या देशातील एकूण बाधित रुग्णांच्या 7.51 टक्के इतकी आहे.
सक्रीय रूग्ण संख्येत घट होत असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 73 लाखांच्याही (73,15,989) पुढे गेली आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यांच्यातील तफावत 67 लाखांहूनही (67,12,302) जास्त आहे.
बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ही तफावत आणखी वाढत आहे. गेल्या चोवीस तासात 56,480 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, तथापि 49,881 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
79 टक्के नवीन बरे झालेले रुग्ण दहा राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्रात एक दिवसात सर्वाधिक आठ हजार रुग्ण बरे झाले आहेत, तर त्याखालोखाल केरळमध्ये सात हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासात 49,881नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
79 टक्के नवीन रुग्ण दहा राज्य केंद्रशासित प्रदेशातील आहे. केरळ मध्ये सर्वाधिक आठ हजाराहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर त्याखालोखाल महाराष्ट्रात सहा हजाराहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या चोवीस तासात 517 रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी 81 टक्के मृत्यू दहा राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक 91 मृत्यूची नोंद झाली.

B.Gokhale/S.Tupe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1668555)
Visitor Counter : 236
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada