मंत्रिमंडळ
भारत आणि कंबोडिया दरम्यान आरोग्य- औषध क्षेत्रातील सहकार्य सामंजस्य करारांना मंत्रिमंडळाची मान्यता
प्रविष्टि तिथि:
29 OCT 2020 4:46PM by PIB Mumbai
पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रिय मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज भारत आणि कंबोडिया यांच्यातील आरोग्य आणि औषध क्षेत्रातील सहकार्याबद्दलच्या सामंजस्य करारांना मान्यता देण्यात आली.
हा द्विपक्षीय सामंजस्य करार, आरोग्य क्षेत्रातील संयुक्त उपक्रम आणि तंत्रज्ञान विकासाच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील सहकार्याला प्रोत्साहित करेल. भारत आणि कंबोडिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना यामुळे अधिक बळकटी मिळेल. हा सामंजस्य करार त्याच्या स्वाक्षरीच्या तारखेपासून लागू होईल आणि तो पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहील.
दोन्ही सरकारांमध्ये खालील क्षेत्रात सहकार्य करार करण्यात आला :
1 माता आणि बाल आरोग्य;
2 कुटुंब नियोजन;
3 एचआयव्ही / एड्स आणि क्षयरोग;
4 औषधे आणि फार्मास्युटिकल्स;
5 तंत्रज्ञान हस्तांतरण;
6 सार्वजनिक आरोग्य आणि रोगशास्त्र;
7 रोग नियंत्रण (संप्रेषणक्षम आणि संप्रेषणरहित) ;
8 वैद्यकीय संशोधन आणि विकास, कंबोडियाच्या राष्ट्रीय नैतिक समितीच्या मान्यतेच्या अधीन आणि भारतातील संबंधित विभाग / मंत्रालयाच्या मंजुरीच्या अधीन;
9 वैद्यकीय शिक्षण;
10 सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात आरोग्य सेवकांचा विकास;
11 क्लिनिकल, पॅरा-क्लिनिकल आणि व्यवस्थापन कौशल्यांचे प्रशिक्षण; आणि
12 परस्परांच्या सामंजस्यातून सहकार्य करण्याचे अन्य कोणतेही क्षेत्र
****
B.Gokhale/S.Sheikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1668434)
आगंतुक पटल : 214
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam