अर्थ मंत्रालय
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी युके -भारत आर्थिक आणि वित्तीय मंत्रिस्तरीय संवादाच्या 10 व्या फेरीत भारतीय प्रतिनिधिमंडळाचे केले नेतृत्व
Posted On:
28 OCT 2020 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2020
केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या युके -भारत आर्थिक आणि वित्तीय मंत्रिस्तरीय संवादाच्या (ईएफडी) 10 व्या फेरीत भारतीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व केले.
भारतीय प्रतिनिधीमंडळात अर्थ मंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक आणि सेबीच्या प्रतिनिधींचा समावेश होता. युकेच्या शिष्टमंडळाचे युकेचे वित्तमंत्री ऋषी सुनक यांनी केले.
भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यात विविध क्षेत्रात घनिष्ट द्विपक्षीय संबंध आहेत. जगातील पहिल्या सात अर्थव्यवस्थांमध्ये भारत आणि युकेची अर्थव्यवस्था असून त्यांचा एकत्रित जीडीपी 5 ट्रिलियन डॉलर्सहून अधिक आहे त्यामुळे भारत आणि युके यांच्यातले आर्थिक संबंध महत्त्वपूर्ण आहेत 2007 मध्ये पहिली ईएफडी झाल्यापासून भारत-युके व्यापार दुप्पटीहून अधिक झाला आहे. द्विपक्षीय गुंतवणुकीमुळे पाच लाखांहून रोजगारांना चालना मिळाली आहे.
कोविड-19 संबधी एकमेकांच्या अनुभवांचे आदानप्रदान, जी-20 आराखड्यातील कार्यकारी गटाच्या आणि डेबिट सर्व्हिस सस्पेंशन इनिशिएटिव्ह (डीएसएसआय) यासह वित्तीय बाबींवर जी-20 मधील सहकार्य यावर संवादात चर्चा झाली.डिजिटल अर्थव्यवस्थेच्या कर आकारणीवरील सर्वसमावेशक आधारित तोडग्याच्या प्रगतीसह आंतरराष्ट्रीय कराशी संबंधित मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. . फिन -टेक आणि जीआयएफटी सिटीवर विशेष भर देऊन वित्तीय सेवा सहकार्य पुढे नेण्याबाबत, वार्षिक भारत-यूके वित्तीय बाजार संवादाचा प्रारंभ आणि वित्तीय बाजारांच्या सुधारणेसाठी सुरू असलेले उपाय यावर चर्चा करण्यात आली. ग्रीन फायनान्सवर भर देऊन पायाभूत विकास आणि शाश्वत वित्त यासाठी चालना यावर चर्चा केली गेली. तसेच द्विपक्षीय भारत-यूके शाश्वत वित्त मंच स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत -यूके वित्तीय भागीदारी (आययूकेएफपी) आणि भारत -यूके शाश्वत वित्त कार्यकारी गट या अंतर्गत खासगी क्षेत्रातील उपक्रमांचे स्वागत करण्यात आले. शाश्वत वित्तपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भारताच्या एनआयपी आणि लंडन शहर यांच्यातर्फे होत असलेल्या कामांवर वित्तमंत्र्यांनी प्रकाश टाकला.
संवादाचा समारोप वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि युकेचे वित्तमंत्री ऋषी सुनक यांच्या संयुक्त निवेदनावरील औपचारिक स्वाक्षरीने झाला.
10 व्या यूके-भारत आर्थिक आणि वित्तीय संवादाच्या संयुक्त निवेदनासाठी येथे क्लिक करा.
* * *
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1668261)
Visitor Counter : 206