उपराष्ट्रपती कार्यालय

‘मिलाद-उन-नबी’च्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सर्वांना  दिल्या शुभेच्छा

Posted On: 29 OCT 2020 4:05PM by PIB Mumbai

 

मिलाद-उन-नबीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. कोविड- 19 महामारीचा उद्रेक लक्षात घेवून मिलाद-उन-नबी सण साजरा करताना सर्वांनी आरोग्य आणि स्वच्छता राखण्यासाठी सामाजिक अंतराच्या आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले आहे.

उपराष्ट्रपतींच्या शुभेच्छा संदेशाचा तपशील पुढील प्रमाणे आहे -

‘‘पैगंबर मोहम्मद यांचा जन्मदिन म्हणून मिलाद-उन-नबीसाजरा केला जातो. या पवित्र प्रसंगानिमित्त मी आपल्या देशातल्या जनतेचे हार्दिक अभिवादन करतो आणि शुभेच्छा देतो.

पैगंबर मोहम्मद यांनी मानवता, करूणा आणि वैश्विक बंधुत्वाचा नीतिमार्ग दाखवला आहे. मिलाद-उन-नबीनिमित्त परिवार आणि स्नेहींनी एकत्र येवून प्रार्थना करण्यात येते. परंतु यावर्षी कोविड-19 महामारीमुळे, माझे सर्व नागरिकांना आणि सहका-यांना आवाहन आहे की, सर्वांनी आरोग्य आणि स्वच्छता यांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत मिलाद-उन-नबी सण साजरा करावा.

त्यांनी दिलेला शाश्वत संदेश समाजामध्ये शांतता आणि एकोपा निर्माण करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करेल.’’

****

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1668409) Visitor Counter : 151