PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
25 SEP 2020 7:48PM by PIB Mumbai
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
दिल्ली-मुंबई, 25 सप्टेंबर 2020
सारे जग लष्करी वर्चस्वासाठी अवकाशाचा वापर करत होते तेव्हा, "भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतासंपन्न देशाच्या जलद विकासाकरिता अवकाश विज्ञान हे सुयोग्य व्यासपीठ ठरेल", असा विचार डॉ.साराभाई यांनीच केला’- असे प्रतिपादन राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांनी केले. ते आज (25 सप्टेंबर 2020) अवकाश विभाग आणि अणू ऊर्जा विभागाद्वारे आयोजित, डॉ.विक्रम साराभाई जन्मशताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभाला व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित करत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान माननीय सुगा योशिहिदे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. कोविड-19 सह जगासमोरील सर्व आव्हानांचा विचार करता, भारत-जपान भागीदारी आता अधिक महत्त्वपूर्ण आणि औचित्यपूर्ण झाल्याविषयी उभय नेत्यांचे एकमत झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फिट इंडिया मुव्हमेंटच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त वयानुकूल फिटनेस प्रोटोकॉलचा व्हर्च्युअल कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुभारंभ करण्यात आला. नरेंद्र मोदी यांनी विविध क्रीडापटू, फिटनेस तज्ज्ञ आणि इतर व्यक्तींशी फिट इंडिया डायलॉग कार्यक्रमात संवाद साधला.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
भारताने एका दिवसात सुमारे 15 लाख कोरोना चाचण्या करत एका दिवसात सर्वाधिक चाचण्या करत असतानाच कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा देशाचा आलेखही चढता ठेवला आहे.
आतापर्यंत 47.5 लाखाहून अधिक रुग्ण कोरोनातून बरे झालेअसून गेल्या 24 तासात 81,177 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा (9,70,116) बरे झालेल्या रुग्णांची संख्या आज 38 लाखांनी (37,86,048) जास्त आहे.
इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने रुग्ण बरे होण्याच्या राष्ट्रीय दरातही सातत्याने वाढ होत आहे. आज हा दर 81.74% आहे.
बरे झालेल्यांपैकी 73% महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, ओडिशा, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल आणि आसाम या दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशातले आहेत.
रुग्ण बरे होण्याची संख्या महाराष्ट्रात आजही सर्वाधिक राहिली, महाराष्ट्रात 17,000 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले तर आंध्रप्रदेशातही एका दिवसात 8,000 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले.
गेल्या 24 तासात देशात 86,052 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. नव्या रुग्णांपैकी 75% रुग्ण 10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात असून महाराष्ट्रात 19,000 पेक्षा जास्त नवे रुग्ण तर आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात मिळून 7,000 पेक्षा जास्त रुग्ण आढळले.
गेल्या 24 तासात 1,141 मृत्यूंची नोंद झाली, त्यापैकी 83 % मृत्यू 10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात झाले आहेत.
काल नोंद झालेल्या मृत्यूपैकी 40 % मृत्यू महाराष्ट्रात झाले असून इथे 459 मृत्यूंची नोंद झाली, पंजाब मध्ये 76 आणि उत्तर प्रदेशात 67 मृत्यूंची नोंद झाली आहे.
कोविड-19 विरोधातल्या लढ्यात भारताने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. पहिल्यांदाच एका दिवसात सर्वाधिक म्हणजे सुमारे 15 लाख कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात 14,92,409 चाचण्या करण्यात आल्या असून एकूण चाचण्यांची संख्या सुमारे 7 कोटी (6,89,28,440) झाली आहे.
दररोज चाचण्या क्षमतेत वेगाने होणारी ही वाढ, चाचण्यांसाठीची देशातील पायाभूत संरचना विस्तारण्याच्या दृढतेचे द्योतक आहे.
शेवटच्या एक कोटी चाचण्या केवळ 9 दिवसात करण्यात आल्या आहेत.
दहा लाख लोकसंख्येमागे होणाऱ्या चाचण्यांची संख्या आज 49,948 होती.
चाचण्यांच्या संख्येत वाढ केल्यास त्यानंतर पॉझिटीव्हीटी दर कमी होतो असे आढळून आले आहे. जी राज्ये जास्तीत जास्त चाचण्या करत आहेत तिथे पॉझिटीव्हीटी दर हळूहळू कमी होत आहे.
राष्ट्रीय पॉझिटीव्हीटी दर आज 8.44% आहे.
सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या 7 राज्यांच्या तयारीचा आढावा घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कोविड-19 व्यवस्थापनात चाचण्या हा महत्वाचा स्तंभ असल्याचा पुनरुच्चार केला होता. चाचण्या, रुग्णाच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध आणि उपचार या केंद्र सरकारच्या त्रिसूत्रीची सुरवात चाचण्यापासून होते. ‘चेस द व्हायरस’ या दृष्टीकोनामागे एखादा रुग्ण चाचणीअभावी राहिला असल्यास चाचण्यांच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचून संक्रमणाला आळा घालणे हा उद्देश आहे. देशभरात चाचण्यांचे जाळे विस्तारण्यासाठी आणि अधिक, तसेच सुलभपणे चाचण्या सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने श्रेणीबद्ध रीतीने अनेक पावले उचलली आहेत. जास्तीत जास्त चाचण्या करण्यासाठी राज्ये/ केंद्र शासित प्रदेशांना अधिक लवचिकता प्रदान करण्यात आली आहे.
निदानात्मक प्रयोग शाळांच्या जाळ्याचा विस्तार झाल्याने चाचण्यांच्या संख्येत वाढ होण्याला मोठी चालना मिळाली आहे.
निदान प्रयोगशाळाचे जाळे आज 1818 प्रयोगशाळापर्यंत विस्तारले आहे. यामध्ये 1084 सरकारी क्षेत्रातल्या तर 734 खाजगी प्रयोग शाळांचा समावेश आहे. यामध्ये यांचा समावेश आहे-
- रिअल-टाईम RT PCR प्रयोगशाळा: 923 (शासकीय: 478 + खासगी 445)
- TrueNat आधारीत प्रयोगशाळा: 769 (शासकीय: 572 + खासगी:197)
- CBNAAT आधारीत प्रयोगशाळा: 126 (शासकीय: 34 + खासगी: 92)
इतर अपडेट्स:
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्रात गुरुवारी 19,164 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली. राज्यात कोविडमुळे 32,284 मृत्यू झाले आहेत. तथापि, आकडेवारीच्या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 92.91 टक्के किंवा 11.92 लाख प्रकरणे आणि 94 टक्के किंवा 32,244 मृत्यू 20 जिल्ह्यात नोंदले गेले आहेत. मुंबई पुणे आणि ठाणे व्यतिरिक्त; कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली, चंद्रपूर आणि नागपूर हे सर्वात प्रभावित जिल्हे असून तिथे अधिक कोविड व्यवस्थापन आवश्यक आहे. पंतप्रधानांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर लवकरात लवकर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी समर्पित अधिकारी नेमले जात आहेत. जिल्ह्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की पुरेशा प्रमाणात बेड्स, ऑक्सिजन पुरवठा व व्हेंटिलेटर असणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध कराव्यात आणि त्याच वेळी मोठ्या प्रमाणात रुग्णांचा शोध घेतला जावा.
FACT CHECK
* * *
M.Chopade/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1659121)
Visitor Counter : 243