आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 विरोधातल्या लढ्यात भारताने ऐतिहासिक उच्चांक गाठला
पहिल्यांदाच एका दिवसात सुमारे 15 लाख कोविड चाचण्या
चाचण्यांच्या एकूण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ; आकडा सात कोटींच्या जवळ पोहोचला
Posted On:
25 SEP 2020 1:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2020
कोविड-19 विरोधातल्या लढ्यात भारताने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. पहिल्यांदाच एका दिवसात सर्वाधिक म्हणजे सुमारे 15 लाख कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात 14,92,409 चाचण्या करण्यात आल्या असून एकूण चाचण्यांची संख्या सुमारे 7 कोटी (6,89,28,440) झाली आहे.
दररोज चाचण्या क्षमतेत वेगाने होणारी ही वाढ, चाचण्यांसाठीची देशातील पायाभूत संरचना विस्तारण्याच्या दृढतेचे द्योतक आहे.
शेवटच्या एक कोटी चाचण्या केवळ 9 दिवसात करण्यात आल्या आहेत.
दहा लाख लोकसंख्येमागे होणाऱ्या चाचण्यांची संख्या आज 49,948 होती.
चाचण्यांच्या संख्येत वाढ केल्यास त्यानंतर पॉझिटीव्हीटी दर कमी होतो असे आढळून आले आहे. जी राज्ये जास्तीत जास्त चाचण्या करत आहेत तिथे पॉझिटीव्हीटी दर हळूहळू कमी होत आहे.
राष्ट्रीय पॉझिटीव्हीटी दर आज 8.44% आहे.
सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या 7 राज्यांच्या तयारीचा आढावा घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कोविड-19 व्यवस्थापनात चाचण्या हा महत्वाचा स्तंभ असल्याचा पुनरुच्चार केला होता. चाचण्या, रुग्णाच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध आणि उपचार या केंद्र सरकारच्या त्रिसूत्रीची सुरवात चाचण्यापासून होते. ‘चेस द व्हायरस’ या दृष्टीकोनामागे एखादा रुग्ण चाचणीअभावी राहिला असल्यास चाचण्यांच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचून संक्रमणाला आळा घालणे हा उद्देश आहे. देशभरात चाचण्यांचे जाळे विस्तारण्यासाठी आणि अधिक, तसेच सुलभपणे चाचण्या सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने श्रेणीबद्ध रीतीने अनेक पावले उचलली आहेत. जास्तीत जास्त चाचण्या करण्यासाठी राज्ये/ केंद्र शासित प्रदेशांना अधिक लवचिकता प्रदान करण्यात आली आहे.
निदानात्मक प्रयोग शाळांच्या जाळ्याचा विस्तार झाल्याने चाचण्यांच्या संख्येत वाढ होण्याला मोठी चालना मिळाली आहे.
निदान प्रयोगशाळाचे जाळे आज 1818 प्रयोगशाळापर्यंत विस्तारले आहे. यामध्ये 1084 सरकारी क्षेत्रातल्या तर 734 खाजगी प्रयोग शाळांचा समावेश आहे. यामध्ये यांचा समावेश आहे-
- रिअल-टाईम RT PCR प्रयोगशाळा: 923 (शासकीय: 478 + खासगी 445)
- TrueNat आधारीत प्रयोगशाळा: 769 (शासकीय: 572 + खासगी:197)
- CBNAAT आधारीत प्रयोगशाळा: 126 (शासकीय: 34 + खासगी: 92)
* * *
U.Ujgare/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1658955)
Visitor Counter : 224
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam