आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा भारताचा आलेख चढता, 47.5 लाखाहून अधिक कोरानामुक्त
बरे झालेल्यांपैकी 73 टक्के नागरिक 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातले
Posted On:
25 SEP 2020 5:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2020
भारताने एका दिवसात सुमारे 15 लाख कोरोना चाचण्या करत एका दिवसात सर्वाधिक चाचण्या करत असतानाच कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा देशाचा आलेखही चढता ठेवला आहे.
आतापर्यंत 47.5 लाखाहून अधिक रुग्ण कोरोनातून बरे झालेअसून गेल्या 24 तासात 81,177 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा (9,70,116) बरे झालेल्या रुग्णांची संख्या आज 38 लाखांनी (37,86,048) जास्त आहे.
इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने रुग्ण बरे होण्याच्या राष्ट्रीय दरातही सातत्याने वाढ होत आहे. आज हा दर 81.74% आहे.
बरे झालेल्यांपैकी 73% महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, ओडिशा, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल आणि आसाम या दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशातले आहेत.
रुग्ण बरे होण्याची संख्या महाराष्ट्रात आजही सर्वाधिक राहिली, महाराष्ट्रात 17,000 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले तर आंध्रप्रदेशातही एका दिवसात 8,000 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले.
गेल्या 24 तासात देशात 86,052 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. नव्या रुग्णांपैकी 75% रुग्ण 10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात असून महाराष्ट्रात 19,000 पेक्षा जास्त नवे रुग्ण तर आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात मिळून 7,000 पेक्षा जास्त रुग्ण आढळले.
गेल्या 24 तासात 1,141 मृत्यूंची नोंद झाली, त्यापैकी 83 % मृत्यू 10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात झाले आहेत.
काल नोंद झालेल्या मृत्यूपैकी 40 % मृत्यू महाराष्ट्रात झाले असून इथे 459 मृत्यूंची नोंद झाली, पंजाब मध्ये 76 आणि उत्तर प्रदेशात 67 मृत्यूंची नोंद झाली आहे.
* * *
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1659064)
Visitor Counter : 204