PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 18 SEP 2020 8:20PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

दिल्ली-मुंबई, 18 सप्टेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऐतिहासिक कोसी रेल महासेतू आज राष्ट्राप्रती समर्पित करण्यात आला आणि नवीन रेल्वे लाईन आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी बिहारमधील विद्युतीकरण प्रकल्पांचे आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन करण्यात आले.

 

देशातील कृषी व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणारे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणारे दोन विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. लोकसभेत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी 5 जून 2020 रोजी काढलेल्या अध्यादेशाची जागा घेण्यासाठी 14 सप्टेंबर 2020 रोजी शेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) विधेयक, 2020 आणि शेतकरी (सबलीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा विधेयक, 2020 सादर केले होते.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

भारतात पुन्हा एकदा रुग्ण बरे होण्याच्या संख्येत विक्रम नोंदवला आहे. गेल्या 24 तासात 87,472 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या 11 दिवसांपासून भारतात सातत्याने रोज 70,000 पेक्षा जास्त रुग्ण बरे होत आहेत.

रुग्ण बरे होण्याच्या दरात आणखी सुधारणा होऊन तो 78.86 टक्के इतका झाला आहे. आतापर्यंत एकूण 41,12,551 इतके रुग्ण बरे झाले आहेत.

सक्रिय रुग्णांच्या तुलनेत बरे झाले रुग्ण 4.04 पटीने जास्त आहेत. जास्त सक्रिय रुग्ण असणाऱ्या पहिल्या पाच राज्यात रुग्ण बरे होण्याची संख्याही जास्त आहे.

महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश राज्यात 59.8% सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. 16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 90 टक्के नवीन रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 22.31 टक्के महाराष्ट्र (19,522) राज्यातील आहेत तर आंध्रप्रदेश (12.24%), कर्नाटक (8.3%), तामिळनाडू (6.31%) आणि छत्तीसगड (6.0%) राज्यातून एकूण बरे झालेल्या रुग्णांपैकी 32.8 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. एकूण बरे झालेल्या रुग्णांपैकी 55.1 टक्के रुग्ण या राज्यांमधून बरे झाले आहेत.

केंद्र सरकारचे सक्षम वैद्यकीय व्यवस्थापन आणि सातत्याने अद्ययावत होणारे उपचारसंबंधित नियम यामुळे भारतातील रुग्ण बरे होण्याच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय एम्स च्या सक्रिय सहकार्याने राबवत असलेल्या ‘नॅशनल ई-आयसीयू ऑन कोविड-19’ या व्यवस्थापकीय योजनेमुळे भारतामधल्या कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सुधारले आहे. तसेच कोरोनाबाधितांच्या मृत्यूदरात घट आली आहे.

या राष्ट्रीय स्तरावरील ई-व्यवस्थापनाचे आयोजन आठवड्यातून दोनवेळा- म्हणजे दर मंगळवारी आणि शुक्रवारी करण्यात येत आहे. यामध्ये सर्व राज्यांतल्या कोविड रूग्णालयांमधल्या अतिदक्षता विभागातल्या वैद्यकीय पथकाला समाविष्ट करून घेण्यात येते. तसेच कोविड उपचाराविषयी सर्वांना पडत असलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली जातात. आरोग्य मंत्रालयामार्फत आत्तापर्यंत अशा प्रकारे 19 राष्ट्रीय ई-आयसीयू व्यवस्थापन केले आहे ज्यामध्ये 28 राज्य/केंद्रशासित प्रदेशांमधील 249 रुग्णालये समाविष्ट झाली आहेत.

रेमडेसिविर, कॉन्व्हलेझेंट प्लाझ्मा आणि टोकलिझुमब सारख्या ‘इन्व्हेस्टिगेशनल थेरपी’ वापरण्यासही भारताने परवानगी दिली आहे आणि कोविडचे रूग्ण बरे होण्यासाठी मदत म्हणून उच्च प्रवाह ऑक्सिजन, नॉन-इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन, स्टिरॉइड्स आणि अँटी-कोगुलेंट्सचा वापर अशा प्रकारच्या उपायांचा अवलंब केला जात आहे.

गृह विलगीकरणावर निरीक्षण, रुग्णांना तटावर आणि वेळेवर मिळणारी रुग्णवाहिका सेवा यामुळे सुलभ आणि सक्षम वैद्यकीय व्यवस्थापनाला मदत झाली आहे.

राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा आणि सहाय्य करण्यासाठी केंद्राने केंद्रीय बहु-तज्ञ गट नियुक्त केले आहेत.

नियमित आढावा घेतल्यामुळे आरोग्य सुविधांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित झाली आहे.

या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून रुग्ण बरे होण्याच्या संख्येत भारताचा उच्चांक आणि कमी मृत्यू दर यामध्ये भारताने महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. सध्या भारताचा कोविड मृत्यू दर 1.62% आहे.

 

इतर अपडेट्स:

 

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) अधिकाऱ्यांनी आजपासून मुंबई-पुणे आणि इतर ठिकाणी इंटरसिटी वातानुकूलित (एसी) आणि नॉन-एसी बसच्या प्रवासावर लादण्यात आलेले निर्बंध हटवले आहेत. संपूर्ण राज्यात एसटी बसेस पूर्ण आसन क्षमतेने चालवण्यात येणार आहेत. यापूर्वी एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी घेऊन एसटी बसेस चालवल्या जात होत्या. दरम्यान, महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची कोविड चाचणी पॉसिटीव्ह आली आहे.राज्य मंत्रिमंडळातील ते नववे मंत्री आहेत ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

FACTCHECK

* * *

M.Chopade/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1656417) Visitor Counter : 222