दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

“ब्रिक्स देशांनी आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ  (आयटीयू) मंचावर दूरसंचार  / आयसीटी कार्यात सहकार्य सुरू ठेवले आहे”: संजय धोत्रे


ब्रिक्स दळणवळण  मंत्र्यांची व्हर्चुअल बैठक संपन्न

Posted On: 17 SEP 2020 10:31PM by PIB Mumbai

 

कोविड -19 विरुद्ध लढ्यात आयसीटीची भूमिका, आयसीटीच्या वापरामध्ये विश्वास व सुरक्षा निर्माण करणे, मुलांचे ऑनलाइन संरक्षण , ग्रामीण भागात राहणा-या लोकांना प्रवेश आणि संपर्क प्रदान करणे यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर ब्रिक्स देशांदरम्यान सहकार्य सुरू ठेवण्यासाठी व्यापक सहमती

दळणवळण , इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे,यांनी 17 सप्टेंबर 2020 रोजी सहाव्या ब्रिक्स दळणवळण  मंत्र्यांच्या बैठकीत व्हर्च्युअल सहभाग घेतला. या बैठकीचे आयोजन रशियाचे डिजिटल विकास, दळणवळण आणि मास मीडिया मंत्री  मॅक्सिम पारशीन यांनी केले होते. ब्राझील , चीन आणि  दक्षिण आफ्रिकेचे  प्रतिनिधि यात सहभागी झाले होते.

बैठकीत कोविड -19 विरोधातील लढाईत माहिती आणि  दळणवळण तंत्रज्ञानाची भूमिका, आयसीटी वापरात विश्वास आणि सुरक्षा, मुलांना ऑनलाइन संरक्षण, ग्रामीण भागात राहणार्‍या लोकांना  तसेच अपंग व्यक्तींच्या गटांना प्रवेश आणि सम्पर्क उपलब्ध करून देणे  तसेच शाश्वत  विकास  उद्दिष्टे साध्य करण्यासाठी डिजिटल अर्थव्यवस्थेची भूमिका यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य सुरू ठेवण्यासाठी व्यापक सहमती तयार करण्यात आली.

संजय धोत्रे, यांनी कोविड -19 योद्धा म्हणून काम करणाऱ्या दूरसंचार  नेटवर्कचे कर्मचारी आणि व्यवस्थापकांचे  कौतुक केले. कोविड व्यवस्थापनासाठी केंद्र  सरकारने हाती घेतलेल्या आरोग्यसेतू ऍप्प , कोविड क्वारंटाईन सतर्कता प्रणाली (सीक्यूएएस),कोविड सावधान, स्थलांतरित कामगारांना घराकडे परत जाण्यासाठी आयसीटी उपाय, आदी उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.

धोत्रे यांनी डिजिटल इंडियाअंतर्गत टेलिकॉम आणि आयसीटीच्या वाढीला  चालना देण्यासाठी केंद्र सरकारने उचललेल्या पावलांबाबत माहिती दिली.  त्यांनी अभिनव  पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून स्थानिक लोकांचा समावेश असलेल्या 250,000 ग्रामपंचायती आणि अंदमान व निकोबार बेटांच्या दुर्गम बेटांना जोडण्यासाठी इतर प्रकल्पांना जोडणारा  भारतनेटप्रकल्प त्यांनी अधोरेखित केला. वैयक्तिक डेटाच्या संरक्षणाबाबत केंद्र  सरकारच्या उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला.

****

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1655915) Visitor Counter : 172