आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. हर्ष वर्धन यांनी जी -20 वित्त आणि आरोग्य मंत्र्यांच्या संयुक्त बैठकीला केले संबोधित


"सुधारित महामारी सज्जतेसाठी प्रभावी आरोग्य यंत्रणा तयार करण्यावर भर देण्याची गरज": हर्ष वर्धन

Posted On: 17 SEP 2020 11:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 सप्‍टेंबर 2020 

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज येथे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जी -20 वित्त आणि आरोग्य मंत्र्यांच्या संयुक्त बैठकीला उपस्थित राहिले.  सौदी अरेबियाने जी -20 चे अध्यक्षपद भूषवले.

डॉ. हर्ष वर्धन यांनी सार्वजनिक आरोग्यामध्ये गुंतवणूकीचे लाभ , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात यापूर्वीच सुरू असलेल्या दृष्टिकोनाची प्रशंसा केली. 

त्यांच्या भाषणाचा मजकूर  खालील प्रमाणे –

माननीय अध्यक्ष आणि मंत्री 

सध्याची महामारी आणि त्यातून उदभवलेले जागतिक संकट राष्ट्रीय आणि जागतिक एकजुटता आवश्यक असल्याचे अधोरेखित करते. 

जागतिक स्तरावर या महामारीचा चढता आलेख खाली आणण्यासाठी , कोविड19 चा सामना करण्यासाठी आणि जगातील असुरक्षित आणि वृद्ध लोकांचे संरक्षण करण्यासाठी जगभरातील आरोग्य प्रणालीत पुरेशी क्षमता  आहे हे सुनिश्चित करण्यासाठी  आंतरराष्ट्रीय , बहुक्षेत्रीय  एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. 

सुधारित महामारी सज्जतेसाठी प्रभावी आरोग्य यंत्रणा निर्माण करण्यावर आपण भर द्यायला हवा. इतर कृती योजना महामारीला प्रतिसाद आहेत तर सुविकसित आरोग्य प्रणाली महामारी रोखण्यात मदत करू शकते.

कोविड -19 निदान , उपचार आणि लस सर्वाना  योग्य व न्याय्य रीतीने उपलब्ध होईल हे सुनिश्चित करण्याची गरज आहे. संरक्षण हे खर्च करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असू नये. 

काटेकोर आणि दर्जेदार निर्मितीचा इतिहास असलेला  भारत आमच्या मेक-इन-इंडिया आणि मेक-फॉर वर्ल्ड प्रयत्नातून आपली भूमिका यापुढेही बजावत राहील आणि वितरण व्यवस्थापनासाठी  संशोधन आणि डिजिटल क्षमतांच्या पूर्ण विकासाला  समर्थन देईल.

आपल्या सर्वांनी कोविड -19  टूल्स एक्सेलरेटर (एसीटी-ए) सारख्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याची आणि आरोग्य यंत्रणेला बळकटी देताना निदान, उपचार  आणि लसींमध्ये न्याय्य जागतिक प्रवेश सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

एकजुटता आवश्यक आहे. नेतृत्व आणि सहकार्याची  उदाहरणे पालन करण्यासारखी उदाहरणे म्हणून साजरी केली पाहिजेत. महामारीचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या जागतिक प्रयत्नात रोगाच्या उत्क्रांतीवर देखरेख  ठेवण्यासाठी मुक्त संवाद आणि पारदर्शकता महत्त्वपूर्ण आहे.

भारत सार्वत्रिक आरोग्यसेवेसाठी कटिबद्ध आहे आणि या तणावाच्या  काळात, जगातील लोकांचे जीव वाचवण्यासाठी आणि लोकांचे आरोग्य जपण्यासाठी एकत्रित मोहिमेची जाणीव होण्यासाठी आणि लवकरात लवकर जागतिक अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी भारत जगाबरोबर ठामपणे उभा आहे.

निर्णायक सार्वत्रिक आरोग्य नेतृत्त्वासाठी आणि भविष्यासाठी आणि कोविड नंतरच्या काळासाठी सज्ज होण्याची ही वेळ आहे

सार्वजनिक आरोग्य नेत्यांनी सीमेच्या पलीकडे पाहणे आवश्यक आहे.  कोणत्याही सीमेचा आदर न करणाऱ्या  विषाणूविरूद्धच्या लढाईतील जागतिक अनुभवावरून धडा घेऊन आपण  आधीच गमावलेल्या जीवांचा सन्मान करू शकतो आणि वर्तमान आणि भविष्यातील रुग्णांसाठी जीवितहानी टाळणाऱ्या  उपायांची अंमलबजावणी करू शकतो.”

 

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1655999) Visitor Counter : 192