शिक्षण मंत्रालय
कोविड-19 संक्रमण परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी शिक्षण मंत्रालयाकडून विविध उपाययोजना- शिक्षण मंत्री
प्रविष्टि तिथि:
17 SEP 2020 9:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2020
कोविड-19 संक्रमण परिस्थितीत शिक्षण मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसमवेत अनेकवेळा सल्लामसलत करुन शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यास मागे पडू नये यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या, यात:
पीएम ईविद्या:
पीएम ईविद्या उपक्रमांतर्गत डिजीटल/ऑनलाईन/ऑन-एअर शिक्षणासाठी बहुविध पद्धती राबवण्यात आल्या. या उपक्रमांतर्गत पुढील बाबींचा समावेश आहे:
· दीक्षा (माहितीच्या देवाणघेवाणीसाठी डिजीटल पायाभूत सुविधा)
- राष्ट्रीय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इयत्ता 1 ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शालेय शिक्षणासाठीचा हा ‘एक राष्ट्र, एक डिजीटल’ प्लॅटफॉर्म आहे.
एप्रिल 2020 मध्ये विद्यादान ची सुरुवात करण्यात आली. शैक्षणिक संस्था, खासगी संस्था आणि तज्ज्ञांकडून ई-लर्निंग स्रोतांमध्ये योगदान देण्यासाठीचा प्लॅटफॉर्म.
दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या माध्यमातून शिक्षण- स्वयंप्रभा टीव्ही चॅनेल्स
स्वयंप्रभा डिटीएच वाहिन्यांच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. 32 वाहिन्यांच्या माध्यमातून उच्च गुणवत्तेचे शिक्षण प्रदान केले जाते.
· खुल्या शाळा आणि सेवा-पूर्व शिक्षणासाठी स्वयम एमओओसी:
ऑनलाईन एमओओसी अभ्यासक्रम, एनआयओएसच्या (इयत्ता 9 ते 12 वी च्या खुल्या शाळांसाठी) स्वयम् पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. 92 अभ्यासक्रमांसाठी 1.5 कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे
रेडिओ, कम्युनिटी रेडिओ आणि पॉडकास्टचा वापर
ऑनलाईन सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी रेडिओ प्रसारणाचा वापर करण्यात आला. तसेच एनआयओएसच्या इयत्ता 9 ते1 2 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 289 कम्युनिटी रेडिओचा वापर करण्यात आला.
· दिव्यांगांसाठी
ऐकता न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांकेतिक भाषेचा वापर करुन एक डिटीएच वाहिनी सुरु करण्यात आली. तसेच दृष्टीहीन आणि ऐकता न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांकेतिक भाषेत डिजीटल रुपातील माहिती (DAISY) एनआयओएसच्या संकेतस्थळ आणि युट्यूबवर उपलब्ध करुन देण्यात आली.
· ई-पाठ्यपुस्तके
- वेब आणि मोबाइल अॅपचा वापर करुन ई-पाठ्यपुस्तकांचे वाचन केले जाऊ शकते. 600 डिजीटल पुस्तके, यात 377 ई-पाठ्यपुस्तके इयत्ता 1 ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ आणि व्हिडीओ स्वरुपात हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि उर्दु भाषेत उपलब्ध आहेत.
· मुक्त शैक्षणिक संसाधनांचे राष्ट्रीय भांडार (NROER)
या माध्यमातून सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवरील 17,500 प्रकरणे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
· सारांश परीक्षांसाठी सुधारीत अभ्यासक्रम
सीबीएसईने अभ्यासक्रमात तीस टक्क्यांची कपात केली आहे.
पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका
एनसीईआरटीने आठवड्यानुसार इयत्ता 1 ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तीन भाषांमध्ये नियोजन केले आहे. यात ज्यांच्याकडे इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे, त्यांना ई-स्रोत पुरवण्यात आले आहेत.
प्रग्याता-डिजीटल शिक्षणासंदर्भातील नियमावली
शाळा बंद असल्यामुळे सध्या घरी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन/ मिश्रित / डिजिटल शिक्षणावर लक्ष केंद्रित करुन ही मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यात आली आहेत. https://mhrd.gov.in/sites/upload_files/mhrd/files/pragyata-guidelines_0.pdf या संकेतस्थळावर नियमावली उपलब्ध आहे.
मानसिक आधारासाठी मनोदर्पण
‘मनोदर्पण’ मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि कुटुंबांना कोविड परिस्थिती आणि त्यानंतरच्या काळातही मानसिक आरोग्य आणि भावनिक कल्याणासाठी विविध उपक्रमांचा समावेश.
निरंतर शिकण्यासाठी वर्धित मार्गदर्शक सूचना:
19 ऑगस्ट 2020 रोजी सरकारने प्रत्येक श्रेणीतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी पुढील सूचना जारी केल्या:
· कोविड-19 काळात विद्यार्थ्यांना डिजीटल साधनांशिवाय शिक्षण.
· कोविड-19 काळात विद्यार्थ्यांना मर्यादीत डिजीटल साधनांसह अभ्यास.
· कोविड-19 काळात विद्यार्थ्यांना डिजीटल साधनांच्या सहाय्याने शिक्षण.
शिक्षण मंत्रालयाच्या
https://www.mhrd.gov.in/sites/upload_filehs/mhrd/files/Learning_Enhancement_0.pdf या संकेतस्थळावर सूचना उपलब्ध आहेत.
- 19 चा प्रभाव कमी करण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने 818.17 कोटी रुपये डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रदान केले आहेत, ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षणासाठी 267.86 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
भारत नेट योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हिटी प्रदान करण्यात आली आणि सुधारण्यात आली. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या सीएससी ई-गव्हर्नन्स सव्हिर्सेस लिमिटेडला शाळांसह शासकीय संस्थांना फायबर टू द होम (FTTH) जोडणीचे काम देण्यात आले. या प्रकल्पांतर्गत शाळांमध्ये इंटरनेट जोडणी पुरवण्यात येत आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
*****
B.Gokhale/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1655860)
आगंतुक पटल : 727