PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
15 SEP 2020 7:54PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई,15 सप्टेंबर 2020


(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये 'नमामि गंगे' योजना आणि 'अमृत' योजनेंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. आज उद्घाटन झालेल्या चार योजनांमध्ये पाटणा शहरातील बेऊर आणि करम-लीचक येथील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प तसेच सिवान आणि छपरा येथील 'अमृत'' योजनेंतर्गत पाण्याशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज बिहारमध्ये दरभंगा येथे एक नवीन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था( एम्स) उभारण्यास मान्यता देण्यात आली. या संस्थेच्या उभारणीसाठी एकूण 1264 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून भारत सरकारच्या मान्यतेनंतर सुमारे 48 महिन्यांमध्ये तिचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वित्तीय व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत, हरयाणा चक्रीय रेल्वे मार्गिका प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. पलवल ते सोनीपत असा हा रेल्वेमार्ग, सोहना-मानेसर-खारखुन्दा या गावांमधून जाईल.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
भारतात कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचा दरातही, सातत्याने वाढ होत असून आता हा दर 78.28%इतका झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 79,292 रुग्ण बरे झाले आहेत.
आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 38,59,399 इतकी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या आणि सक्रीय रुग्णांची संख्या यातील तफावत वाढून आता 28 लाख पेक्षा अधिक झाली आहे. (28,69,338).
देशातील सक्रीय रुग्णांची संख्या आता 9,90,061 इतकी आहे.
उपचारांखालील सक्रीय रुग्णांपैकी जवळपास अर्धे रुग्ण(48.8%) केवळ तीन राज्यांत आहेत- महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश . तर, उत्तरप्रदेश, तमिळनाडू, छत्तीसगढ, ओडिशा, केरल आणि तेलंगणा या राज्यांमध्ये एकून एक चतुर्थांश (24.4%) टक्के सक्रीय रुग्ण आहेत.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये एकूण रूग्णांपैकी 60.35% टक्के रुग्ण आहेत, तसेच या राज्यांत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही साधारण 60% (59.42%) च्या जवळपास आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोविडमुळे 1,054 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्युंपैकी सुमारे 69% टक्के रुग्ण पाच राज्य/केंद्रशासित प्रदेशात आहेत- यात महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे.
देशातल्या एकूण मृत्यूंपैकी 37% पेक्षा जास्त मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. (29,894 मृत्यू). गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 34.44% मूत्यू झाले आहेत (363 मृत्यू).
इतर अपडेट्स:
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्र सरकारने वैद्यकीय ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनांना एक वर्षासाठी ‘रुग्णवाहिका दर्जा’ दिला आहे. यासंदर्भात सोमवारी अधिसूचना जारी करण्यात आली. कोविड - 19 महामारीचा झालेला प्रसार आणि राज्यातील विविध रुग्णालयांना अखंडित ऑक्सिजन पुरवठा करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील कोविड रूग्णांपैकी सुमारे 11 टक्के रुग्णांना सुमारे 500 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात सध्या 1000 मे.टन पेक्षा जास्त ऑक्सिजन उत्पादन होत असले तरी अनेक ठिकाणाहून कमतरता आल्याच्या तक्रारी आल्या आहेत.


RT/ST/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1654690)
Visitor Counter : 247