आयुष मंत्रालय

वैद्यकीय शिक्षण पद्धतीत औषधोपचाराची भारतीय पद्धती आणि होमिओपॅथी यांना नवीन क्रांतिकारी दिशा मिळणार

Posted On: 15 SEP 2020 1:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  15 सप्टेंबर  2020

आयुष मंत्रालयाशी संबंधित दोन विधेयके मंजूर झाल्यावर भारतातील वैद्यकीय शिक्षण पद्धतीला भारतीय उपचार पद्धती आणि होमिओपॅथी यांद्वारे नवीन दिशा देण्यासाठी देश सज्ज झाला आहे.

भारतीय उपचार पद्धती राष्ट्रीय आयोग विधेयक 2020 आणि होमिओपथी राष्ट्रीय  आयोग   विधेयक 2020  ही दोन विधेयके 14 सप्टेंबर 2020 ला लोकसभेत मंजूर झाली.

ही दोन एकसमान विधेयके. कायद्यात रुपांतरीत झाल्यावर, इंडियन मेडिसीन  सेंट्रल कौन्सिल कायदा 1970 आणि  होमिओपॅथी  सेंट्रल कौन्सिल कायदा 1973 या कायद्यांची जागा घेतील.

राज्यसभेने दोन्ही विधेयके 18 मार्च 2020 रोजी मंजूर केली आहेत. संसदेकडून दोन्ही विधेयके मंजूर होणे हे आयुष मंत्रालयाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे.  भारतीय उपचार पद्धती केंद्रीय आयोग आणि होमिओपॅथी उपचार पद्धती केंद्रीय आयोग यात मोठे फेरबदल या कायद्यांमुळे घडून येतील.

भारतीय उपचार पद्धती राष्ट्रीय आयोग, आणि होमिओपॅथी राष्ट्रीय आयोग, हे  अनुक्रमे भारतीय उपचारपद्धती शिक्षण आणि होमिओपॅथी शिक्षण या दोहोंमध्ये मोठे बदल घडवून आणेल.

भारतीय वैद्यक उपचार पद्धती राष्ट्रीय आयोग विधेयक 2019, आणि होमिओपॅथी उपचार पद्धतीसाठी राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग विधेयक 2019 ही दोन्ही विधेयके 7 जानेवारी 2019 ला राज्यसभेत मांडली गेली. अधिक विचार विनिमयासाठी  आरोग्य आणि कुटुंब कल्याण यांच्याशी संबंधित संसदीय समितीकडे ती पाठवण्यात आली. समितीने विधेयकांचे परीक्षण करून राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक 2019 मध्ये काही सुधारणा सुचवल्या. त्यानुसार मंत्रालयाने काही महत्त्वाच्या सुधारणा विधेयकांमध्ये केल्या, त्यानंतर 18 मार्च 2020 ला ही विधेयके   भारतीय वैद्यक पद्धती राष्ट्रीय आयोग विधेयक 2020 आणि होमिओपॅथी राष्ट्रीय आयोग विधेयक 2020  या नावाने राज्यसभेत मंजूर झाली.

U.Ujgare/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1654418) Visitor Counter : 336