आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड - 19 पीडितांसाठी नवीन आरोग्य सेवा योजना
Posted On:
15 SEP 2020 6:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2020
कोविड विरुद्ध लढा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज’ अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे. ही मध्यवर्ती योजना आहे.
या योजने अंतर्गत कोविड रुग्णांशी थेट संपर्कात येणाऱ्या आणि या रोगाची बाधा होण्याची शक्यता असणाऱ्या कम्युनिटी हेल्थ वर्कर सह, आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचे विमा कवच देण्याची तरतूद आहे. याअंतर्गत कोविडमुळे मृत्यू झाल्यास अपघाती विम्याची तरतूदही करण्यात आली आहे.
या योजनेत खाजगी रूग्णालयातील कर्मचारी / सेवानिवृत्त / स्वयंसेवक / स्थानिक शहरी संस्था / करार / दैनंदिन वेतन / ऍडहॉक/ राज्यांनी मागवलेले आउटसोर्स कर्मचारी/ केंद्रीय रुग्णालये / केंद्रीय / राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचे स्वायत्त रुग्णालये, एम्स आणि आयएनआय / केंद्रीय मंत्रालयांची रुग्णालये जी कोविड - 19 संबंधित कामांसाठी तयार करण्यात आली त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
कोविडग्रस्तांच्या उपचाराव्यतिरिक्त, सरकार आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एबी-पीएमजेवाय) राबवित आहे, यासाठी सामाजिक-आर्थिक जात गणना (एसईसीसी) च्या आकडेवारीनुसार सुमारे 10.74 कोटी गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना (साधारण 50 कोटी व्यक्ती) रुग्णालय खर्चासाठी प्रतिवर्षी प्रत्येक कुटुंबासाठी पाच लाख रुपये आरोग्य कवच उपलब्ध करून देत आहे.
राज्यमंत्री (आरोग्य आणि कुटुंब कल्याण), अश्विनीकुमार चौबे यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
B.Gokhale/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1654659)
Visitor Counter : 271