मनुष्यबळ विकास मंत्रालय

शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली विकसित झालेल्या दुसऱ्या स्तरातील एनसीईआरटी आठ-सप्ताह पर्यायी कॅलेंडरचे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Posted On: 15 SEP 2020 3:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  15 सप्टेंबर  2020

कोविड-19 च्या काळात, री राहावे लागणाऱ्या  विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागावा, यादृष्टीने त्यांना घरच्या घरी शैक्षणिक बाबींची सुविधा आणि वेळापत्रकयुक्त कार्यक्रम-जो विद्यार्थी, शिक्षक आणि पालक सर्वांसाठी उपयुक्त आहे-असे पहिली ते बारावीपर्यंतचे कॅलेंडर, एनसीईआरटीने शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली विकसित केले आहे.

चार आठवड्यांच्या या पर्यायी शैक्षणिक कॅलेंडरचे आणि प्राथमिक तसेच माध्यमिक स्तरावरील वर्गांसाठीचे कॅलेंडर याआधीच प्रकाशित करण्यात आले होते. तसेच, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरातील विद्यार्थ्यांसाठीचे चार आठवड्यांचे या पर्यायी शैक्षणिक कॅलेंडर देखील शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते प्रकशित करण्यात आले होते. आता माध्यमिक स्तरासाठी, पुढच्या आठ महिन्यांचे या पर्यायी शैक्षणिक कॅलेंडर AAC  चे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखारीयाल निःशंक यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

यावेळी बोलतांना, पोखरियाल म्हणाले, की या कॅलेंडरमुळे शिक्षकांना विविध तंत्रज्ञान-आधारित साधने आणि समाजमाध्यमांवरील अभिनव तंत्रज्ञाना चा वापर करुन, शिक्षण देण्याचे मार्गदर्शन मिळेल.हसत-खेळत, रंजक पद्धतीने शिक्षण देण्याचे प्रशिक्षण यातून मिळू शकेल. मात्र, हा शैक्षणिक कार्यक्रम तयार करतांना वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल फोन, रेडीओ, टीव्ही, एसएमएस आणि सोशल मिडीया अशा सर्वच उपलब्ध साधनांची शक्ती आणि मर्यादा दोन्हीचा विचार करण्यात आला आहे.

आपल्यापैकी अनेकांकडे मोबाईलवर इंटरनेट सुविधा नसते, किंवा कधी इतर सोशल मिडीया साधने –जसे की Whatsapp, फेसबुक, ट्वीटर, गुगल इत्यादी साधनांचा वापर करु शकत नाही. अशा वेळी, हे कॅलेंडर शिक्षकांना मार्गदर्शन करते की अशा वेळी एसएमएस किंवा विडीओ कॉल अशा माध्यमातून संपर्क साधू शकतो. या कॅलेंडरची अंमलबजावणी करण्यासाठी अगदी लहान मुलांना त्यांच्या पालकांनी  मदत करणे अपेक्षित आहे.

या कॅलेंडरमुळे सर्व- अगदी दिव्यांग मुलांच्याही गरजा पूर्ण होऊ शकतील- त्यांच्यासाठी ऑडीओ बुक्स,रेडीओ, यांचा समावेश केला जाईल, असेही पोखारीयाल यांनी सांगितले.

या कॅलेंडर मध्ये एक आठवड्याची योजना असून त्यात अनेक रंजक आणि आव्हानात्मक शालेय उपक्रम आहेत, जे मुलांना खिळवून ठेवतील. अभ्यासक्रमात असलेल्या संकल्पना रंजक पद्धतीने समजावून सांगत त्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमांमध्ये शैक्षणिक  ज्ञानाला महत्व देण्यात आले आहे.

त्याशिवाय,कला क्षेत्र, शारीरिक व्यायाम, योग, व्यावसाय करण्याआधीची कौशल्ये या सर्वांबाबतच्या अनुभवात्मक शिक्षणावर भर देण्यात आला आहे. या कॅलेंडरमध्ये वर्गवार आणि विषयवार उपक्रम तक्ते देण्यात आले आहे. त्याशिवाय, हिंदी,इंग्रजी, उर्दू आणि संस्कृत या भाषांशी सबंधित अनेक उपक्रमांचाही समावेश आहे.

तसेच शिक्षक विद्यार्थ्यांमधील तणाव आणि अस्वस्थता दूर करण्यासाठीच्या उपाययोजनाही आहेत.

दुसऱ्या स्तरातील एनसीईआरटी आठ-सप्ताह पर्यायी इंग्रजी कॅलेंडरसाठी येथे क्लिक करा

दुसऱ्या स्तरातील एनसीईआरटी आठ-सप्ताह पर्यायी हिंदी कॅलेंडरसाठी येथे क्लिक करा ‍

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1654483) Visitor Counter : 12