आयुष मंत्रालय
कोविड-19 मधून बऱ्या झालेल्या व्यक्तींसाठी आयुष पद्धतींचा व्यवस्थापन मार्गदर्शक तत्वात समावेश
Posted On:
14 SEP 2020 9:12PM by PIB Mumbai
कोविड पश्चात व्यवस्थापनासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 13 सप्टेंबर 2020 ला मार्गदर्शक तत्वे जारी केली. या व्यक्तींची घरी काळजी घेण्यासाठी एकीकृत समावेशक दृष्टीकोनाचा अवलंब यात करण्यात आला असून उपचारात्मक किंवा प्रतिबंधात्मक पद्धती म्हणून वापरण्यासाठी ही पद्धती नाही असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
कोविड -19 मधून बऱ्या झालेल्या काही व्यक्तीना खोकला,घसा कोरडा होणे यासारखी लक्षणे जाणवत आहेत. कोविड-19 मधून बरे झाल्यानंतरही मास्कचा वापर, हातांची वारंवार स्वच्छता, शारीरिक अंतर यांचे पालन आवश्यक असून पुरेसे गरम पाणी आणि रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आयुष चिकित्सकाकडून औषधे, हलकी योगासने,प्राणायाम,सुचवण्यात आले आहेत. याशिवाय संतुलित आणि ताजा आहार घ्यावा असेही सांगण्यात आले आहे. गृह विलगीकरणात राहिलेल्या रुग्णाने, लक्षणे कायम राहिल्याची तक्रार असल्यास जवळच्या आरोग्य केंद्राला भेट द्यावी.
वैयक्तिक स्तरावर आयुष मंत्रालयाने याआधी सुचवलेली प्रतिकार क्षमता वाढवणारी औषधे घेण्याचेही सुचवण्यात आले आहे. यामध्ये आयुष काढा, गुळवेल, अश्वगंधा,आणि हळद घातलेले दुध यांचा समावेश आहे.
M.Chopade/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1654233)
Visitor Counter : 230