आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ
गेल्या 24 तासात 79,000 पेक्षा अधिक रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी
भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 78% हून अधिक
एकूण रूग्णांपैकी पाच राज्यांत 60% रुग्णसंख्या
Posted On:
15 SEP 2020 1:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2020
भारतात कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचा दरातही, सातत्याने वाढ होत असून आता हा दर 78.28%इतका झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 79,292 रुग्ण बरे झाले आहेत.
आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 38,59,399 इतकी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या आणि सक्रीय रुग्णांची संख्या यातील तफावत वाढून आता 28 लाख पेक्षा अधिक झाली आहे. (28,69,338).
देशातील सक्रीय रुग्णांची संख्या आता 9,90,061 इतकी आहे .
उपचारांखालील सक्रीय रुग्णांपैकी जवळपास अर्धे रुग्ण(48.8%) केवळ तीन राज्यांत आहेत- महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश . तर, उत्तरप्रदेश, तमिळनाडू, छत्तीसगढ, ओडिशा, केरल आणि तेलंगणा या राज्यांमध्ये एकून एक चतुर्थांश (24.4%) टक्के सक्रीय रुग्ण आहेत.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये एकूण रूग्णांपैकी 60.35% टक्के रुग्ण आहेत, तसेच या राज्यांत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही साधारण 60% (59.42%) च्या जवळपास आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोविडमुळे 1,054 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्युंपैकी सुमारे 69% टक्के रुग्ण पाच राज्य/केंद्रशासित प्रदेशात आहेत- यात महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे.
देशातल्या एकूण मृत्यूंपैकी 37% पेक्षा जास्त मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. (29,894 मृत्यू). गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 34.44% मूत्यू झाले आहेत (363 मृत्यू).
U.Ujgare/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1654415)
Visitor Counter : 170