PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 11 AUG 2020 7:53PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

Text Box: •	With about 16 lakh Recoveries, India’s Recovery rate nearly 70%.•	Case Fatality Rate falls below 2%•	Active cases (6,39,929) are only 28.21% of the total positive cases.•	PM interacts with CMs to discuss the current situation and plan ahead for tackling the pandemic

Image

दिल्ली-मुंबई, 11 ऑगस्ट 2020

 

पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत सद्यस्थितीवर आणि साथीच्या आजारावर उपाययोजना आखण्यासाठी चर्चा केली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या दहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रतिनिधींशी सद्य परिस्थिती आणि कोविड-19 साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी उपाययोजना आखण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

 

पूर्वीप्रमाणेच ठरविल्या प्रमाणे आणि माहिती दिल्याप्रमाणे, नियमित प्रवासी आणि उपनगरी रेल्वे सेवा पुढील सूचना येईपर्यंत स्थगित राहतील ही बाब सर्व संबंधित लोकांच्या निदर्शनाला आणून द्यावयाचे आहे. सध्या सुरु असलेल्या 230 विशेष गाड्या सुरूच राहतील याची नोंद घेतली जावी. सध्या राज्य सरकारच्या मागणीनुसार मर्यादित संख्येने चालविल्या जाणार्‍या मुंबईतील लोकल गाड्याही सुरू ठेवण्यात येणार आहेत.विशेष गाड्यांच्या वापरावर नियमितपणे लक्ष ठेवले जात आहे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष गाड्या चालविल्या जाऊ शकतात. लॉकडाऊनपूर्वी सुरु असलेल्या सर्व नियमित आणि उपनगरीय गाड्या सध्या रद्द करण्यात आल्या आहेत.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

प्रतिबंधक धोरणांची यशस्वी अंमलबजावणी, आक्रमक पावलं उचलत केलेल्या व्यापक चाचण्या आणि कोविडच्या गंभीर रुग्णांवर उपचारांवेळी केलेले प्रमाणित वैद्यकीय व्यवस्थापन, या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्याने वाढ होऊन तो सुमारे 70 टक्क्यांवर पोहोचला आहे.  

कोरोनाचे अधिकाधिक रुग्ण बरे होत असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडले जात आहे. तसेच लक्षणविरहीत किंवा कमी लक्षणे असलेले रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. यामुळे आतापर्यंत देशात 15,83,489 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत 47,746 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

सध्या देशभरात 6,39,929 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. हे प्रमाण एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत केवळ 28.21% एवढे आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत असल्यामुळे, बरे होणारे रुग्ण आणि सक्रीय रुग्णांमधील तफावत आणखी वाढून सुमारे 9.5 लाख इतकी झाली आहे. भारताच्या टेस्ट, ट्रॅक, ट्रीट या धोरणाचे अपेक्षित सकारात्मक परिणाम दिसत असून त्यामुळेच ही तफावत वाढलेली दिसत आहे. 

रुग्णालयातील सुधारित आणि परिणामकारक वैद्यकीय उपचारपद्धती, रुग्णालयात रूग्णांना आणण्यासाठीची रुग्णवाहिका सेवा सुधारुन अधिक समन्वय आणणे आणि कोविडच्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळतील, अशी व्यवस्था करणे, अशा उपाययोजना सातत्याने केल्या गेल्या. परिणामी, कोविडचा मृत्यूदर, जागतिक मृत्यूदराच्या तुलनेत सातत्याने कमी राहिला आहे. आज हा दर 2 % पेक्षा खाली जात 1.99% पोहोचला आहे.

 

इतर अपडेट्स:

 

महाराष्ट्र अपडेट्स :

कोविड 19 च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सिरो- सर्वेक्षण अभ्यासाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात आरटी-पीसीआर चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईत गेट वे ऑफ इंडिया ते रायगड जिल्ह्यातील मांडवा ते सागरी रुग्‍णवाहिका सेवा राज्य सरकार वेगवान करणार आहे. या सेवेमुळे या दोन्ही जिल्ह्यादरम्यानचा साडे तीन तासांचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार आहे. राज्यात 9,181 नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या 5,24,513 इतकी झाली आहे. राज्यात 1,47,735 सक्रिय रुग्ण असून एकूण 3,58,421 रुग्ण बरे झाले आहेत. कोविडमुळे राज्यात 18050 मृत्यू झाले आहेत.

 

FACT CHECK

 

Image Image

 

* * *

B.Gokhale/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645131) Visitor Counter : 226