रेल्वे मंत्रालय
सध्या स्थगित असलेल्या प्रवासी रेल्वे सेवेबाबतची माहिती
पूर्वीप्रमाणेच ठरविल्या प्रमाणे आणि माहिती प्रमाणे, नियमित प्रवासी आणि उपनगरी रेल्वे सेवा पुढील सूचना येईपर्यंत स्थगित राहतील
प्रविष्टि तिथि:
11 AUG 2020 6:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2020
पूर्वीप्रमाणेच ठरविल्या प्रमाणे आणि माहिती दिल्याप्रमाणे, नियमित प्रवासी आणि उपनगरी रेल्वे सेवा पुढील सूचना येईपर्यंत स्थगित राहतील ही बाब सर्व संबंधित लोकांच्या निदर्शनाला आणून द्यावयाचे आहे.
सध्या सुरु असलेल्या 230 विशेष गाड्या सुरूच राहतील याची नोंद घेतली जावी. सध्या राज्य सरकारच्या मागणीनुसार मर्यादित संख्येने चालविल्या जाणार्या मुंबईतील लोकल गाड्याही सुरू ठेवण्यात येणार आहेत.
विशेष गाड्यांच्या वापरावर नियमितपणे लक्ष ठेवले जात आहे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष गाड्या चालविल्या जाऊ शकतात.
लॉकडाऊनपूर्वी सुरु असलेल्या सर्व नियमित आणि उपनगरीय गाड्या सध्या रद्द करण्यात आल्या आहेत.
* * *
B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1645109)
आगंतुक पटल : 294