संरक्षण मंत्रालय

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते संरक्षण पीएसयू आणि ओएफबीच्या आधुनिकीकरण/अद्यतन आणि नवीन पायाभूत सुविधांचा शुभारंभ

Posted On: 10 AUG 2020 9:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2020

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज आत्मनिर्भर भारत सप्ताहांतर्गत संरक्षण पीएसयू आणि ओएफबीचे(दारुगोळा फॅक्टरी)  आधुनिकीकरण आणि नवीन पायाभूत सुविधांचा डिजीटल माध्यमातून शुभारंभ केला. संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून यात सहभागी झाले. याप्रसंगी संबोधित करताना राजनाथ सिंग म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचे आवाहन केले आहे आणि त्यांचे 5-I चे सूत्र हेतू (Intent), समावेश (Inclusion), गुंतवणूक (Investment), पायाभूत सुविधा (Infrastructure) आणि नवोन्मेष (Innovation)’ अर्थव्यवस्थेला उच्च विकास मार्गावर आणतील. ते म्हणाले, सरकारने कोविड-19 काळात वेळीच आणि विचारपूर्वक निर्णय घेतले, जसे आयातीसंबंधी नकारात्मक यादी, थेट परकीय गुंतवणूक मर्यादा वाढवणे, देशांतर्गत भांडवली खरेदीसाठी स्वतंत्र निधी आणि स्वदेशीकरणावर भर.

आधुनिकीकरण उपक्रमांतर्गत, ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथील पिनाक रॉकेट कॉम्प्लेक्स येथे पिनाक आणि इतर रॉकेटसाठी लागणाऱ्या विस्तारीत गरजांच्या पूर्ततेसाठी अत्याधुनिकीकरण करण्यात आले आहे.

तसेच ओएलएफ डेहराडूनच्या अत्याधुनिकीकरणामुळे टी-90 रणगाड्यांच्या  अत्याधुनिक ऑप्टोइलेक्ट्रॉनिक घटकांची निर्मिती होईल.

बीईएलने उत्पादनासाठी पूर्णपणे स्वदेशी मरीच एकात्मिक सुविधा सुरु केली आहे, डीआरडीओने विकसित केलेल्या मरीच अँटी टॉर्पेडो संरक्षण प्रणालीचे एकत्रीकरण आणि चाचणी केली आहे.

एचएएलने 500 वे एएल-31एफपी ओव्हरहाल्ड इंजिन भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केले आहे, जे आघाडीवरील सर्वात प्राणघातक लढाऊ विमान एसयू-30एमकेआयला बसवण्यात येणार आहे. हे कोरापुट विभागाने तयार केले आहे. 

बीईएमएलने बेंगळुरु येथे नवीन पायाभूत सुविधानिर्माण अंतर्गत औद्योगिक डिझाईन सेंटर उभे केले आहे. भारतातील अशाप्रकारचे हे पहिलेच केंद्र आहे.

आधुनिक सुविधांतर्गत, जीआरएसईने सध्या सुरु असलेल्या पी17ए प्रकल्पाच्या उत्पादन गरजा पूर्ण करण्यासाठी राजा बागान डॉकयार्ड येथे सुविधा विस्तार केला. 

कोंकरस-एम, इनवार, आकाश, अस्त्र क्षेपणास्त्रांसाठी आवश्यक असलेल्या स्वदेशी विकसित वॉरहेड्सचे उत्पादन व चाचणी करण्यासाठी संरक्षण क्षेत्रात नवीन पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. ही सुविधा मॉड्यूलर असल्याने वाढीव सुधारणांसह भविष्यातील सर्व क्षेपणास्त्र आयुधांना पुरवली जाईल. संरक्षणमंत्र्यांनी रिमोटचे बटन दाबून या सर्व सुविधांचा शुभारंभ केला. 

 

 

 

 

M.Chopade/S.Thakur/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644957) Visitor Counter : 194