वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

परस्परहित लक्षात घेऊन भारतीय उत्पादनांनाही इतर देशांच्या बाजारपेठेत प्रवेश दिला जावा


भारतालाही जगात समतुल्य संधी मिळावी यासाठी भारतीय उद्योगजगताने एकजुटीने उभे राहणे आवश्यक-पीयूष गोयल

Posted On: 10 AUG 2020 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2020

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री यांच्या हस्ते आज, पाच दिवसीय आभासी जलद विक्री होणाऱ्या दैनंदिन वापरातील वस्तूंच्या (FMCG) पुरवठा साखळी एक्स्पो 2020 चे उद्‌घाटन झाले.

यावेळी बोलतांना गोयल यांनी सांगितले की, कोविड-19 च्या नंतरच्या जगातली वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल. जग आता बदलले आहे. या  कोविडच्या अनुभवातून  संपूर्ण जग आता काही नव्या गोष्टी शिकणार आहे आणि काही जुन्या गोष्टी विसरणारही आहे. आपण आता स्वच्छता नियमांचे पालन करत जगायला शिकू, तंत्रज्ञानाचा वापर करु. आता आपण आपल्या व्यवसायातही अधिक अचूकता, दक्षता आणि सजगता वाढवायला शिकू, असे गोयल यांनी सांगितले.

देशांतर्गत उद्योगांना पाठींबा देणे आणि त्यासाठी आयातीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर काही लोकांनी केलेल्या टीकेला उत्तर देतांना ते म्हणाले की आम्हाला आमच्या उद्योगांना यासाठी संरक्षण द्यायचे आहे की त्यातून आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांना न्याय्य प्रवेश मिळेल आणि स्पर्धेला सामोरे जाता येईल. भारताला जगात, समान, योग्य आणि परस्परहित लक्षात घेणारा व्यापार हवा आहे, असे गोयल म्हणाले. आम्ही अनेक देशांसोबत समतोल व्यापार करण्याकडे वाटचाल करतो आहे. त्यामुळेच, भारताने RCEP मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला कारण त्यातील सगळ्या अटीशर्ती पूर्णपणेअसमान होत्या. इतर देशांनी टप्याटप्याने, भारताकडून कच्चा मला घेणे, त्यांची उत्पादने भारतात विकसित करणे हे करावे आणि 130 कोटी भारतीय देत असलेल्या व्यापक व्यवसाय संधींचा लाभ घ्यायला हवा, असे त्यांनी सांगितले. जे लोक भारतात गुंतवणूक करत आहेत, त्यांनी केवळ इथे अर्धवट बनवलेल्या वस्तू जोडणे याचा विचार करायला नको किंवा आयात करात सवलत मिळवण्याकडेही लक्ष द्यायला नको, तर त्यांनी भारतात नवे तंत्रज्ञान, नव्या पद्धती आणाव्यात आणि मूल्यवर्धन करावे, अशी अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली. 

भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेण्याच्या मार्गावर असून त्याचे अनेक निदर्शक आपल्याला दिसत आहेत. रेल्वे माल वाहतूक आणि वीजवापर गेल्या वर्षीइतकाच झाला आहे. गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेत  या जुलै महिन्यात देशाची निर्यात 91 टक्के इतकी झाली. आयात देखील  79% टक्के आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644942) Visitor Counter : 166