PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 04 JUN 2020 8:27PM by PIB Mumbai

 

दिल्ली-मुंबई, 4 जून 2020

Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक, गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने आज संयुक्तरीत्या, ‘ट्युलिप’- म्हणजे नागरी शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम पोर्टलचा शुभारंभ केला. या कार्यक्रमान्वये, पदवीधर युवक-युवतींना, देशभरातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये शिकावू उमेदवार म्हणून काम करण्याची संधी मिळेल.  मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अमित खरे, गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा आणि AICTE चे अध्यक्ष देखील यावेळी उपस्थित होते.ट्युलीपकार्यक्रमाअंतर्गत, नव-पदवीधरांना नागरी क्षेत्रात काम करण्याचा अनुभव मिळू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते, युवाशक्ती केवळ आपल्या देशात परिवर्तन आणणार नाही, तर संपूर्ण जगात बदल घडवून आणण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यांच्या  या दृष्टीकोनाला अनुसरून हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 3,804 रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत कोविड-19 चे एकूण 1,04,107 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोविड -19 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 47.99% वर पोहोचले आहे. आजमितीस 1,06,737 सक्रिय रुग्ण असून ते वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने संक्रमित व्यक्तींमध्ये नोवेल कोरोना विषाणू शोधण्यासाठी चाचणी क्षमता वाढविली आहे. सरकारी प्रयोशाळांची संख्या 498 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 212 पर्यंत वाढविण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 1,39,485 नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 42,42,718 आहे.

 

इतर अपडेट्स:

दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय, दरवर्षी, पर्यावरण दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) संस्थेने जाहीर केलेल्या संकल्पनेला अनुसरून विविध कार्यक्रम साजरे करत असते. यावर्षीची संकल्पना आहे- जैवविविधता’. सध्या कोविडमुळे देशभरात निर्माण झालेली परिस्थिती बघता, केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने ‘नगर वन’ संकल्पनेवर आधारित कार्यक्रम, आभासी माध्यमातून (virtual) साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण https://www.youtube.com/watch?v=IzMQuhmheoo या लिंकवर उद्या सकाळी 9  वाजतापासून बघता येईल.

भारतात येण्याची आवश्यकता असणाऱ्या विशिष्ट श्रेणीतल्या विदेशी नागरिकांसाठी व्हिसा आणि प्रवास निर्बंध शिथील करण्याबाबतचा मुद्दा  भारत सरकारने विचारात घेतला आहे. ज्या विदेशी नागरिकांकडे दिर्घ मुदतीचा बहु प्रवेश व्यापार व्हिसा आहे त्यांनी भारतीय दूतावासामधून त्याचे पुन्हा प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे. याआधी प्राप्त केलेल्या इलेक्ट्रोनिक व्हिसाच्या आधारावर अशा विदेशी नागरिकांना भारतात येण्याची परवानगी दिली जाणार नाही.

3 जून 2020 पर्यंत देशातल्या विविध राज्यांत एकूण 4197 गाड्या चालवल्या गेल्या. आज सकाळी 9 वाजेपर्यंत  अशा 81 गाड्या  रुळावरून धावल्या. "श्रमिक स्पेशल" गाड्यातून आत्तापर्यंत  58 लाखांपेक्षा जास्त प्रवासी 34 दिवसात आपापल्या राज्यात पोचले आहेत. या 4197 गाड्या  देशातील विविध राज्यांतून सुरू झाल्या. जास्तीत जास्त गाड्या सुरू करणारी पहिल्या पाच  क्रमांकाची राज्ये आहेत , गुजरात (1026 गाड्या ), महाराष्ट्र (802 गाड्या) , पंजाब ( 416 गाड्या), उत्तरप्रदेश (294 गाड्या)बिहार(294 गाड्या) तसेच या श्रमिक स्पेशल गाड्या  ज्या  राज्यांत परतल्या, त्यातील पहिल्या पाच क्रमांकाची राज्ये आहेत उत्तरप्रदेश (1682 गाड्या), बिहार (1495 गाड्या), झारखंड (197) ओदिशा(187 गाड्या) आणि पश्चिम बंगाल ( 156 गाड्या).

कोविड-19 चा प्रसार वाढत असताना दुसरीकडे, दुर्गपूरमधील CMERI म्हणजेच केंद्रीय यंत्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील संशोधकांनी पूर्ण देशी बनावटीचा व्हेंटिलेटर विकसित केला आहे. CMERI ही CSIR अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे. CSIR-CMERI चे संचालक प्रा डॉ हरीश हिरानी यांच्या उपस्थितीत व्हेंटीलेटरचे अनावरण करण्यात आले. दुर्गापूरमधील एका खासगी रुग्णालयाचे अध्यक्षही यावेळी उपस्थित होते.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून OPEC म्हणजेच तेल निर्यातक राष्ट्र संघटनेचे महासचिव डॉ. मोहम्मद बार्किंडो यांच्याशी संवाद साधला. ऊर्जेच्या जागतिक बाजारपेठेतील सध्याच्या घडामोडी आणि कोविड-19 संकटकाळातील कच्च्या तेलाच्या किमतींविषयी यावेळी प्रामुख्याने चर्चा झाली. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या OPEC बैठकांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा करण्यात आली.

विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाने (एसईआरबी) हरियाणामधील हिसार येथील नॅशनल सेंटर फॉर वेटरनरी टाइप कल्चर (एनसीव्हीटीसी), आयसीएआर-एनआरसी अर्थात राष्ट्रीय पशुवैद्यकीय प्रकार संवर्धन केंद्राच्या अभ्यासाला पाठिंबा मंजूर केला आहे ज्यात कोरोना विषाणू विरोधात अँटीव्हायरल्स अर्थात प्रतिजैविकांसाठी त्यांच्या संग्रहात असलेल्या 94 लहान रासायनिक अवरोधक रेणूंची चाचणी केली जाणार आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि जॉर्जियाच्या राष्ट्रपती सालोमी जरूबिचविली यांच्यात दूरध्वनीवरून  संभाषण झाले. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधाबाबत चर्चा केली. कोविड-19 मुळे जगासमोर ठाकलेल्या आव्हानांची आणि जगभरातल्या लोकांच्या जीवनात निर्माण झालेल्या अडथळ्याची  दखल घेत, कोविड-19 चा प्रसार रोखण्यात जॉर्जियाचे प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी भारताने जोमदार प्रयत्न केले असून त्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोझाम्बिकचे राष्ट्रपती फिलीपे जासिंटो न्युसी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सध्या सुरु असलेल्या कोविड-19 महामारीमुळे दोन्ही देशात निर्माण झालेल्या आव्हानांची चर्चा उभय नेत्यांनी केली. आवश्यक औषधे आणि उपकरणाच्या तरतुदीसह या आरोग्य संकटात मोझाम्बिकच्या प्रयत्नांना सहकार्य करण्यासाठी  भारत तत्पर असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. आरोग्य आणि औषधनिर्मिती क्षेत्रातला पुरवठा यामध्ये दोन्ही देशात असलेल्या घनिष्ट  सहकार्याची  राष्ट्रपती न्युसी यांनी प्रशंसा केली.

सध्या सुरू असलेल्या साथीच्या आजारामुळे आपले कुशल कार्यबल देशात परत येण्याचे उद्दीष्ट ठेवून, वंदे भारत मिशन अंतर्गत परत आलेल्या नागरिकांच्या कौशल्य मापनाचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारने स्वदेश (स्कील्ड वर्कर्स अरायव्हल डाटाबेस फॉर एम्प्लॉयमेंट सपोर्ट) हा नवा उपक्रम सुरू केला आहे. हा कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, नागरी उड्डाण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांचा एक संयुक्त उपक्रम आहे. नागरिकांच्या कौशल्यानुसार त्यांना पात्र ठरवून त्यांची माहिती गोळा करून आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेणे आणि भारतीय आणि परदेशी कंपन्यांच्या मागण्या पूर्ण करणे हा उद्देश आहे. देशभरात नागरिकांच्या योग्यतेनुसार काम मिळण्यासाठी आणि रोजगाराच्या योग्य संधी मिळण्यासाठी गोळा केलेली माहिती विविध कंपन्यांना दिली जाईल. परदेशातून परत येणाऱ्या नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने स्वदेश स्कील्स कार्ड भरणे आवश्यक आहे. हे कार्ड परत आलेल्या नागरिकांना चर्चेच्या माध्यमातून योग्य रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक उत्तम संधी आहे. राज्य सरकारे, उद्योग संघटना आणि नियोक्ते यासह मुख्य भागधारकांसह कौशल्य विकास मंत्रालयाची शाखा राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) प्रकल्पाच्या अंमलबजावणीला पाठबळ देत आहे.

केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय जल जीवन अभियाना’अंतर्गत पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचा आर्थिक वर्ष 2020-21 साठीचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला. पुदुचेरीमधील ज्या घरांना नळाद्वारे पाणी मिळण्यासाठी अजूनही जलजोडण्या मिळालेल्या नाहीत अशा सर्व घरांना त्या पुरवण्याची योजना या आराखड्यात आखण्यात आली आहे. या भागात सध्या कोविड-19 विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाची भीती कायम असली तरी स्थानिक समुदायांना सहभागी करून घेऊन गाव पातळीवर या कामासाठीचे नियोजन सुरु आहे. गावातील लोकांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतर राखण्याची काळजी घेऊन ग्रामसभा घेतल्या जात आहेत. दीर्घकालीन शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी गावातील पाणीपुरवठा यंत्रणेचे नियोजन, अंमलबजावणी, व्यवस्थापन, कार्यान्वयन आणि देखभाल या सर्व कामांमध्ये स्थानिक समुदायांची महत्त्वाची भूमिका असेल.

केंद्रिय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोविड प्रतिबंधात्मक उपायांबाबात जम्मू आणि काश्मिर महापालिका समित्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत या घटकेचा महत्त्वाचा मंत्र, ‘चिंता नाही जनजागृती’, पाळण्याची गरज आहे. यासाठी, महापालिका समित्यांवर निवडून आलेले प्रतिनिधी, जे तळागाळापर्यंत पोहोचू शकणारे नेते आहेत त्यांनी, लोकांना घाबरून न जाता खबरदारी घेण्याचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन वाहनांची नोंदणी, वाहन चालक परवाने आणि जुनी वाहने रद्दबातल करण्यासंबंधी मोटार वाहन नियमांतील प्रस्तावित दुरुस्तीबद्दल सामान्य जनतेसह सर्व भागधारकांच्या सूचना आणि अभिप्राय पुन्हा-मागविल्या आहेत. या अधिसूचना याआधी यावर्षी 18 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तथापी, असे लक्षात आले की, भागधारकांना अधिसुचनांचे परीक्षण करण्याची आणि त्यावर सूचना आणि अभिप्राय देण्याची पुरेशी संधी मिळणे आवश्यक आहे. याआधी लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे यावर परिणाम झाला होता.

 

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्रात कोविड 19 च्या 2560 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात एकूण रुग्णसंख्या 74,860 इतकी झाली असून यापैकी 39,935 सक्रिय रुग्ण आहेत. हॉटस्पॉट मुंबईत 1,276 नवीन रुग्ण आढळले असून यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या 43,492 इतकी झाली आहे. राज्यात बुधवारी या आजारामुळे 122 मृत्यू झाले असून यापैकी 49 मृत्यू मुंबईतील आहेत.

महाराष्ट्र आणि मुंबईतील कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात हलवण्यात आलेल्या नागरिकांचे कोविड स्क्रिनिंग करून त्यांना 2 दिवस निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात यावी असे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिले आहेत. सखल भागात तसेच किनारपट्टी लगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेकडून जवळच्या शाळांमध्ये हलवण्यात आले होते.

 

PIB FACT CHECK

 

******

R.Tidke/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1629445) Visitor Counter : 72