रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेने देशभरात 1 मे 2020 पासून 4197 “श्रमिक स्पेशल” गाड्या चालवून दि. 3 जून 2020 सकाळी 9 वाजेपर्यत 58 लाख प्रवाशांना आपापल्या राज्यात पोचवले
केवळ मे महिन्यात केली 50 लाख प्रवाशांची ने-आण
श्रमिक स्पेशल गाड्यांबरोबरच 12 मे पासून 15 ये -जा करणाऱ्या विशेष राजधानी गाड्या आणि 100 येजा करणाऱ्या विशेष मे आणि एक्स्प्रेस गाड्या ही 1 जून 2020 पासून सुरू
Posted On:
03 JUN 2020 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जून 2020
गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार ,ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत कामगार,यात्रेकरी,पर्यटक विद्यार्थी आणि इतरांना आपापल्या ठिकाणी पोचते करण्यासाठी दि 1 मे 2020 पासून भारतीय रेल्वेने या श्रमिक स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला .
आज दि 3 जून 2020 पर्यंत देशातल्या विविध राज्यांत एकूण 4197 गाड्या चालवल्या गेल्या. आज सकाळी 9 वाजेपर्यंत अशा 81 गाड्या रुळावरून धावल्या. "श्रमिक स्पेशल "गाड्यातून आत्तापर्यंत 58 लाखांपेक्षा जास्त प्रवासी 34 दिवसात आपापल्या राज्यात पोचले आहेत.
या 4197 गाड्या देशातील विविध राज्यांतून सुरू झाल्या. जास्तीत जास्त गाड्या सुरू करणारी पहिल्या पाच क्रमांकाची राज्ये आहेत , गुजरात (1026 गाड्या ), महाराष्ट्र (802 गाड्या) , पंजाब ( 416 गाड्या) , उत्तरप्रदेश (294 गाड्या ) , बिहार(294 गाड्या) तसेच या श्रमिक स्पेशल गाड्या ज्या राज्यांत परतल्या ,त्यातील पहिल्या पाच क्रमांकाची राज्ये आहेत उत्तरप्रदेश( 1682 गाड्या ),बिहार (1495 गाड्या), झारखंड (197) ओदिशा(187 गाड्या) आणि पश्चिम बंगाल ( 156 गाड्या.
विशेष महत्वाची बाब म्हणजे या गाड्यात आता गर्दी होत नाही.
श्रमिक स्पेशल गाड्यांबरोबरच,नवी दिल्लीला जोडणाऱ्या आणि ये जा करणाऱ्या 15 विशेष राजधानी सारख्या गाड्या आणि 200 वेळापत्रकाप्रमाणे धावणाऱ्या गाड्या ही 1 जून 2020पासून सुरू झाल्या आहेत.
M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1629187)