गृह मंत्रालय

विशिष्ट श्रेणीतल्या विदेशी नागरिकांना भारतात येण्याची परवानगी देण्यासाठी व्हिसा आणि प्रवासविषयक निर्बंध शिथील

Posted On: 03 JUN 2020 7:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2020


भारतात येण्याची आवश्यकता असणाऱ्या विशिष्ट श्रेणीतल्या विदेशी नागरिकांसाठी व्हिसा आणि प्रवास निर्बंध शिथील करण्याबाबतचा मुद्दा  भारत सरकारने विचारात घेतला आहे. खाली दिलेल्या वर्गाअंतर्गत  विदेशी नागरिकांना भारतात येण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे-

व्यापार व्हिझावर (क्रीडा विषयक बी-3 व्हिसा व्यतिरिक्त) नॉन शेड्यूल वाणिज्यिक/चार्टर विमानाने भारतात येणारे विदेशी व्यापारी

भारतीय आरोग्य क्षेत्राशी संबंधित प्रयोगशाळा आणि कारखाना यासह संबंधित बाबीच्या तांत्रिक कामासाठी ,परदेशी आरोग्य व्यावसायिक,आरोग्य क्षेत्रातले संशोधक, अभियंते आणि तंत्रज्ञ. भारतातल्या मान्यताप्राप्त आणि नोंदणीकृत आरोग्य सुविधा किंवा अधिस्वीकृत 

विद्यापीठाच्या संबंधित व्यक्तीला आमंत्रण देणाऱ्या पत्राच्या अधीन ही परवानगी राहील.

भारतात असलेल्या विदेशी व्यापार आस्थापनाच्या वतीने भारतात प्रवास करणारे विदेशी अभियंते, व्यवस्थापकीय, आरेखन आणि इतर तज्ञ. यामध्ये सर्व उत्पादन युनिट,आरेखन युनिट, सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञान तसेच वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्याचा  ( बँकिंग आणि बिगर बँकिंग क्षेत्रातल्या कंपन्या ) समावेश आहे.

भारतातल्या विदेशी यंत्रसामग्री आणि साधने बसवण्यासाठी, दुरुस्ती आणि देखभालीसाठी,नोंदणीकृत भारतीय व्यापारी आस्थापनेच्या निमंत्रणावरून भारतात येणारे विदेशी तांत्रिक तज्ञ आणि अभियंते. वाणिज्यिक अटीनुसार,साधने स्थापित करण्यासाठी किंवा हमी अंतर्गत,किंवा विक्री पश्चात सेवा किंवा दुरुस्तीचा यात समावेश आहे. 

या श्रेणीतल्या विदेशी नागरिकांना नव्याने  व्यापार व्हिसा किंवा रोजगार व्हिसा यापैकी जो लागू असेल तो व्हिसा भारतीय दूतावासामधून घ्यावा लागेल. ज्या विदेशी नागरिकांकडे दिर्घ मुदतीचा बहु प्रवेश व्यापार व्हिसा आहे त्यांनी भारतीय दूतावासामधून त्याचे पुन्हा प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे. याआधी प्राप्त केलेल्या इलेक्ट्रोनिक व्हिसाच्या आधारावर अशा विदेशी नागरिकांना भारतात येण्याची परवानगी दिली जाणार नाही. 

Click here to see the Official Document


* * *

U.Ujgare/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1629107) Visitor Counter : 283