नागरी उड्डाण मंत्रालय

परदेशातून आलेल्या नागरिकांचे सरकार कौशल्य मापन करणार

‘स्वदेश’ कौशल्य विकास आणि उद्योजकता, नागरी उड्डाण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम

वंदे भारत मोहिमेचा एक भाग म्हणून, परतलेल्या नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे

जमा माहिती सामायिक करण्यासाठी आणि राज्य सरकारे, उद्योग संघटना आणि नियोक्ते यासह मुख्य भागधारकांसह चर्चा मजबूत करण्याची कल्पना

Posted On: 03 JUN 2020 7:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2020

 

सध्या सुरू असलेल्या साथीच्या आजारामुळे आपले कुशल कार्यबल देशात परत येण्याचे उद्दीष्ट ठेवून, वंदे भारत मिशन अंतर्गत परत आलेल्या नागरिकांच्या कौशल्य मापनाचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारने स्वदेश (स्कील्ड वर्कर्स अरायव्हल डाटाबेस फॉर एम्प्लॉयमेंट सपोर्ट) हा नवा उपक्रम सुरू केला आहे. हा कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, नागरी उड्डाण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांचा एक संयुक्त उपक्रम आहे. नागरिकांच्या कौशल्यानुसार त्यांना पात्र ठरवून त्यांची माहिती गोळा करून आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेणे आणि भारतीय आणि परदेशी कंपन्यांच्या मागण्या पूर्ण करणे हा उद्देश.

देशभरात नागरिकांच्या योग्यतेनुसार काम मिळण्यासाठी आणि रोजगाराच्या योग्य संधी मिळण्यासाठी गोळा केलेली माहिती विविध कंपन्यांना दिली जाईल. परदेशातून परत येणाऱ्या नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने स्वदेश स्कील्स कार्ड भरणे आवश्यक आहे. हे कार्ड परत आलेल्या नागरिकांना चर्चेच्या माध्यमातून योग्य रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक उत्तम संधी आहे. राज्य सरकारे, उद्योग संघटना आणि नियोक्ते यासह मुख्य भागधारकांसह कौशल्य विकास मंत्रालयाची शाखा राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) प्रकल्पाच्या अंमलबजावणीला पाठबळ देत आहे.

संयुक्त उपक्रमाबाबत केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री श्री महेंद्र नाथ पांडेय यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, ``हा काळ परीक्षा घेणारा आहे आणि याकाळात सर्वांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे आणि कोविड – 19 च्या साथीच्या आजाराच्या काळात उद्भवणाऱ्या आर्थिक मंदीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरे जाणाच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना बळ  द्यायचा आहे. वंदे भारत मोहिमेअंतर्गत परदेशातून परत आलेल्या नागरिकांचे कौशल्य मापन करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी भागीदारी केल्याने आम्हाला आनंद झाला आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘सुरक्षा आणि सर्वांचा विकास याप्रतीची दृष्टी’ मोहिमेमुळे प्रभावित झालो आहोत, स्वदेश स्कील कार्डच्या माध्यमातून गोळा केलेली माहिती नागरिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मदत करेल आणि मागणी आणि पुरवठा यातील दरी कमी करण्यासाठी एक समन्वय साधला जाईल.``

जगभरात कोविड – 19 च्या प्रसारामुळे आर्थिक परिणाम झाला आहे ज्यामुळे हजारो कामगारांना त्यांचे कामाला मुकावे लागले आहे आणि जागतिक स्तरावर शेकडो कंपन्या बंद पडल्या आहेत. भारत सरकारच्या वंदे भारत मोहिमेअंतर्गत अनेक नागरिक विविध देशांमधून भारतात परत येत आहेत, त्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधींविषयी अनिश्चिततेला सामोरे जावे लागणार आहे. लाखो नागरिकांनी भारताच्या वेगवेगळ्या मोहिमांच्या माध्यमातून नोंदणी करून देशात परत येण्याची विनंती केली असून आतापर्यंत 57,000 हून अधिक लोक यापूर्वीच देशात परत आले आहेत.

या उपक्रमाबाबत केंद्रीय विमान वाहतूक खात्याचे मंत्री श्री हरदिप सिंग पुरी यांनी मत व्यक्त केले की, ``जेव्हा आम्ही वंदे भारत मोहीमेला प्रारंभ केला, तेंव्हा आमच्या असे लक्षात आले की, नोकरी गमावल्यामुळे अनेक कामगार परदेशांमधून भारतात परत येत आहेत, आंतरराष्ट्रीय कौशल्य आणि तेथील कामाचा अनुभव हा स्थानिक पातळीवर खूप मोठा ठरू शकतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात याचा फायदा होऊ शकतो. आम्ही एमएसडीई कडे संपर्क साधून ऑनलाइन पोर्टलवर कामगारांची माहिती गोळा करण्यास प्रारंभ केला. स्वदेश कार्डावरील माहितीचा प्रसार करण्यासाठी विमानांमध्ये केल्या जाणाऱ्या उद्घोषणांच्या वेळी संबंधित विमान उड्डाणे ही वंदे भारत मोहिमेअंतर्गत असल्याची माहिती एअर इंडिया आणि एअर इंडियन एक्स्प्रेसमध्ये दिली जात होती. भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि अन्य खासगी विमानतळांवर देखील बॅनर / फलक लावण्यात आले होते आणि डिजिटल चिन्हांच्या माध्यमातून स्थलांतरितांना परत येताना या उपक्रमाची माहिती मिळू शकेल. ``

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. सुब्रमण्यम जयशंकर म्हणाले की, ``नोवेल कोरोना विषाणूच्या अभूतपूर्व प्रसारामुळे उद्भवलेली जागतिक आणीबाणी लक्षात घेता आम्ही परदेशात अडकलेले आपले नागरिक आणि नोकरी गमावल्यामुळे त्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांना शक्य ते पूर्ण सहकार्य देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही वेगवेगळ्या देशांमधील आमचे दूतावास / उच्चायोग / वाणिज्य दूतावास मार्गे स्वदेश स्कील कार्ड उपक्रमास सक्रीयपणे प्रोत्साहन देऊ. या उपक्रमामुळे परत येणाऱ्या भारतीय कामगारांना त्यांच्या कौशल्य विकासासही मदत मिळणार आहे.``

परत येणाऱ्या नागरिकांची सविस्तर माहिती सामायिक करण्यासाठी www.nsdcindia.org/swdes  या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज उपलब्ध आहेत. नागरिकांचे काम करण्याचे क्षेत्र, कामाचा प्रकार, नोकरी, कामाचा अनुभव किती वर्षांचा आहे ही सर्व सविस्तर माहिती अर्जामध्ये भरावयाची आहे. नागरिकांना अर्ज भरताना काही शंका असल्यास टोल फ्री क्रमांकाचा कॉल सेंटर सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

स्वदेश कौशल्य फॉर्म (ऑनलाइन) 30 मे 2020 रोजी उपलब्ध करण्यात आले आणि 3 जून 2020 रोजी (दुपारी 2 पर्यंत)  साधारणपणे 7000 नोंदणी झाल्या आहेत. यापूर्वीच गोळा झालेल्या माहितीमधून संयुक्त अरब अमिरात, ओमान, कतार, कुवेत आणि सौदी अरब या देशांमधून नागरिक देशात परत आले आहेत, असे समजते. कौशल्य मापनानुसार, हे नागरीक तेल आणि वायू, बांधकाम, पर्यटन आणि आदरातिथ्य, वाहनउद्योग आणि विमान वाहतूक क्षेत्रांमधील प्राथमिक स्तरावर नोकरी करत होते. शिवाय या माहितीवरून असे दिसते की केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमधून अधिकाधिक लोक परदेशांमधून परतले आहेत.

***

S.Thakur/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1629126) Visitor Counter : 395