रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
नवीन वाहनांची नोंदणी, वाहन चालक परवाना आणि जुन्या गाड्या रद्दबातल करण्यासंदर्भात मोटार वाहन नियमावलीत सुधारणा करण्यासाठी नागरिकांकडून मागविल्या सूचना
प्रविष्टि तिथि:
03 JUN 2020 7:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 03 जून
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन वाहनांची नोंदणी, वाहन चालक परवाने आणि जुनी वाहने रद्दबातल करण्यासंबंधी मोटार वाहन नियमांतील प्रस्तावित दुरुस्तीबद्दल सामान्य जनतेसह सर्व भागधारकांच्या सूचना आणि अभिप्राय पुन्हा-मागविल्या आहेत. या अधिसूचना याआधी यावर्षी 18 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तथापी, असे लक्षात आले की, भागधारकांना अधिसुचनांचे परीक्षण करण्याची आणि त्यावर सूचना आणि अभिप्राय देण्याची पुरेशी संधी मिळणे आवश्यक आहे. याआधी लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे यावर परिणाम झाला होता.
या संदर्भातील दोन अधिसूचना 29 मे 2020 रोजी जारी करण्यात आल्या असून त्या www.morth.gov.in या संकेतस्थळावर पाहता येतील.
मसुदा अधिसूचना क्र. 336 (ई) मध्ये मोटार परिवहन कायद्याचे कलम 4-28 समाविष्ट आहेत. यात खालील महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे:
• इलेक्ट्रॉनिक फॉर्म आणि कागदपत्रांचा वापर (वैद्यकीय प्रमाणपत्र, शिकाऊ परवाना, चालक परवान्याचे समर्पण, चालक परवान्याचे नूतनीकरण)
• ऑनलाईन शिकाऊ परवाना
• राष्ट्रीय नोंदणी
• विक्रेता (डीलर) नोंदणी
• 60 दिवस आधी नोंदणीचे नुतनीकरण
• 30 दिवसांच्या मुदत वाढीसह 06 महिन्यांसाठी तात्पुरती नोंदणी
• व्यापार प्रमाणपत्र - इलेक्ट्रॉनिक
• वाहने आणि अनुकुलीत वाहनांसाठी बदल, रेट्रो फिटमेंट
• बदल केलेल्या वाहनांच्या बाबतीत विमा
इतर मसुदा अधिसूचना क्र. 337 (ई) मध्ये एमव्हीएएच्या कलम 39-40 चा समावेश आहे. यात पुढील बाबींचा समावेश आहेः
• सदोष वाहनांचे धोरण रद्द करणे
i. रद्द करण्याची प्रक्रिया
ii. चौकशी अधिकाऱ्यासाठी सविस्तर तपशील
iii. चौकशी प्रक्रिया – निश्चित कालावधी (6 महिने)
iv. चाचणी संस्थेची भूमिका
• उत्पादक, आयातदार आणि रेट्रोफिटर ची जबाबदारी.
• चाचणी संस्थांची मान्यता
आपल्या सूचना आणि अभिप्राय या अधिसूचनांच्या प्रसिद्धी तारखेपासून 8 दिवसांच्या आता सहसचिव (वाहतूक), रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, वाहतूक भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली- 110001 (email: jspb-morth[at]gov[dot]in) येथे पाठवाव्यात. यापूर्वी पाठविलेले अभिप्राय पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही.
***
S.Thakur/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1629125)
आगंतुक पटल : 418