PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

लक्षणे असलेल्या 24 रुग्णांपैकी केवळ 1 जण पॉझिटिव्ह आढळतो आहे: आरोग्य मंत्रालय

रॅपिड अँटीबॉडी टेस्ट निरीक्षणावर देखरेख ठेवण्यासाठी आहेत, आजाराच्या निदानासाठी नाहीत. त्यामुळे, या चाचण्यांच्या किट्स दोषपूर्ण असण्याची चिंता नाही : आरोग्य मंत्रालय

Posted On: 16 APR 2020 7:46PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download 

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours and Fact checks undertaken by PIB)

नवी दिल्‍ली-मुंबई, 16 एप्रिल 2020

 

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात करण्यात येणाऱ्या उपाय योजनाबाबत, जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ अधिकारी आणि क्षेत्र अधिकारी तसेच केंद्र आणि राज्य सरकारांच्या आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवादात्मक सत्र घेतले. आपण या विषाणूवर विजय मिळवू शकतो आणि आपण नक्कीच विजयी ठरू असा विश्वास हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवर पत्रकार परिषद 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या श्रीमती पुण्य सलिला श्रीवास्तव आणि ICMR चे प्रवक्ते श्री रमन गंगाखेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत खालील माहिती दिली.

 • लॉकडाऊन च्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न सर्व राज्य सरकारांनी अधिक कठोर केले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठयाबाबतची स्थिती समाधानकारक आहे. स्थानिक पातळीवर लॉकडाऊनचे कठोर पालन करण्याचे निर्देश केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.- गृह मंत्रालय
 • सर्व कामे करतांना आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. मोठे समारंभ टाळा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका,  दारू किंवा तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन करु नका, कार्यालयीन ठिकाणी सॅनिटायझरचा वापर आणि तापाची तपासणी सुरुच ठेवावी
 • केंद्रीय आरोग्यमंत्री आणि राज्यमंत्र्यांनी जागतिक आरोग्य संस्थेच्या अधिकाऱ्यांशी आणि फिल्ड ऑफिसरशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काल चर्चा केली, यामध्ये जिल्हा पातळीवर कोविड-19 च्या फैलावाला प्रतिबंध आणि क्लस्टरसाठी मायक्रोप्लॅन बाबत चर्चा करण्यात आली. – आरोग्य मंत्रालय  
 • या आजाराबाबतच्या सर्वेक्षणाला अधिक व्यापक आणि मजबूत करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या राष्ट्रीय पोलिओ सर्वेक्षण नेटवर्क टीमचा वापर करुन कृती आराखडा बनवण्यात आला आहे
 • आरोग्य मंत्र्यांनी उद्योगजगतातील प्रतिनिधींशी चर्चा केली, पीएमकेअर्सफंड मध्ये योगदान दिल्याबद्दल मंत्र्यांनी उद्योजकांचे आभार मानले, उद्योगजगताने उपस्थित केलेल्या चिंताचे निराकरण केले जाईल अशी ग्वाही देत , त्यांनी आरोग्यक्षेत्रात मेकइनइंडिया अंतर्गत संधींचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
 • लॉकडाऊनच्या काळात पिण्याच्या सुरक्षित पाण्यासंदर्भात मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाला निवारा शिबिरे आणि समाजातील आपत्तीप्रवण स्तरांना विचारात घेऊन पाण्याचा पुरवठा वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 • सध्या कोविड19 चा सामना करत असताना आरोग्यसेवांची अभूतपूर्व मागणी लक्षात घेऊन, आवश्यक त्या आरोग्यसेवा उपलब्ध होण्याबाबत आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विस्तृत मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत.
 • पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण प्रभाव मूल्यमापन अधिसूचना 2006 मध्ये सुधारणा केली आहे, जेणेकरुन, व्यापक प्रमाणावर औषधनिर्मिती होऊ शकेल. व्यापक औषधनिर्मितीशी संबंधित सर्व प्रकल्प आणि कार्यवाहीचे पुनर्वर्गीकरण केले असून त्यामुळे या निर्मितीला वेग येऊ शकेल.
 • आतापर्यंत 1489 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. एकूण रुग्णसंख्या -12,380
 • एकूण मृत्यूसंख्या - 414 गेल्या 24 तासात - 183 रुग्ण कोरोनामुक्त झाले, 37 जणांचा मृत्यू झाला, कोविड19 चे 941 नवे रुग्ण आढळले. अद्याप 325 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
 • पुदुच्चेरीमधील माहे हा एक असा जिल्हा आहे जिथे गेल्या 28 दिवसात एकही रुग्ण आढळलेला नाही. देशात  इतर 27 जिल्हे  असे आहेत जिथे गेल्या 14 दिवसात एकही रुग्ण आढळलेला नाही.
 • आतापर्यंत 2,90,401 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. काल 30,043 नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 26,331 चाचण्या ICMR नेटवर्कमध्ये करण्यात आल्या.
 • एका शिफ्टमध्ये काम करुन, आपण दररोज 42,400 नमुन्यांची चाचणी करु शकतो. जर आपण डबल शिफ्टमध्ये काम केलं, तर एका दिवसांत आपण कोविड-19 च्या 78,200 पेक्षा जास्त नमुन्यांची चाचणी करु शकतो.
 • दोन प्रकारचे जलद  कोविड-19 टेस्टिंग किट्स असून, अशा प्रकारचे एकूण पाच लाख किट आज दाखल झाले आहेत. ही चाचणी तातडीचे निदान करण्यासाठी नसून तिचा वापर देखरेख करण्यासाठी, हॉट स्पॉट्सच्या प्रमाणात वाढ होत आहे की घट, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात येईल.
 • जर एखाद्या व्यक्तीची अँटीबॉडी चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्याचा अर्थ हा नाही, की त्या व्यक्तीला पुन्हा कधी संसर्ग होणार नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झाल्यास, शरीरातील अँटीबॉडीज विषाणूशी लढण्यात प्रभावी ठरतीलच, असे आवश्यक नाही- ICMR
 • Pooled Testing चा वापर देखील करता येईल, यामुळे कमी खर्चात तितकेच परिणाम मिळू शकतील. ज्या भागात पॉझिटिव्हिटीचा दर कमी आहे त्या भागात याचा वापर करता येईल
 • आतापर्यंत, लाईफलाईन उडान योजनेअंतर्गत एयर इंडिया, अलायन्स एयर आणि भारतीय वायू दलाने मालवाहू विमानांच्या 247 फेऱ्यांद्वारे 418 टन अत्यावश्यक वस्तू आणि वैद्यकीय साधने देशाच्या विविध भागापर्यंत पोचवली आहेत.
 • रेल्वेने 16 लाखांहून अधिक मोफत भोजनांचे वाटप केले आहे. देशभरात 8 लाख पेक्षा जास्त वॅगनद्वारे मालाचा पुरवठा करण्यात आला आहे. रेल्वेची 17 समर्पित रुग्णालये आणि रुग्णालय ब्लॉक्स मध्ये 5,000 खाटांची सोय केली आहे.  5,000 पेक्षा जास्त अलगीकरण डबे सज्ज आहेत.
 • जपानमध्ये 11.7 चाचण्यांपैकी एक रुग्ण पॉझिटिव्ह ठरतो,हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. भारतात, 24 चाचण्या केल्यावर त्यातील एक रुग्ण पॉझिटिव्ह ठरतो. सर्वच लोक असुरक्षित गटात मोडत नाही, त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण कमी आहे, असे आपण म्हणू शकत नाही – ICMR
 • कोणताही पॉझिटिव्ह रुग्ण तपासणी प्रक्रियेतून निसटू नये, असा आमचा प्रयत्न आहे. चाचणीसंदर्भात घालून दिलेल्या निकषांनुसार प्रत्येकाची चाचणी होत असल्याची आम्हाला खातरजमा करायची आहे. सर्वात महत्त्वाची आहे ती फलनिष्पत्ती,  लक्षणे असलेल्या 24 रुग्णांपैकी केवळ 1 जण पॉझिटिव्ह आढळतो आहे, आम्ही आधीपासूनच उचललेल्या पावलांचे हे स्पष्ट संकेत आहेत- आरोग्य मंत्रालय
 • रॅपिड अँटीबॉडी टेस्ट निरीक्षणावर देखरेख ठेवण्यासाठी आहेत, आजाराच्या निदानासाठी नाहीत. त्यामुळे, या चाचण्यांच्या किट्स दोषपूर्ण असण्याची चिंता नाही, त्यांचा संबंध रोगप्रतिकारशक्तीशी जोडला गेला होता - चीनहून आलेल्या किट्स संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर आरोग्य मंत्रालयाने वरील स्पष्टीकरण दिले.
 • उन्हाळ्यात कोविड-19 चा संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. - ICMR                                                            

 

वरील पत्रकार परिषदेचे @PIBMumbai ने केलेले लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Other updates:

 

महाराष्ट्र अपडेट्स

तीन हजार रुग्णांचा टप्पा ओलांडणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. 165 नव्या केसेसह राज्याची रुग्णसंख्या 3081 झाली आहे.  यामध्ये 107 मुंबईतील तर पुण्यातील 19 आहेत. राज्य सरकारने कोविड-19 शी लढण्यासाठी पंचसूत्री कृती आराखडा तयार केला आहे ज्यामध्ये आरोग्य, स्थलांतरित नागरिक, अर्थव्यवस्था, कृषी आणि दैनंदिन प्रशासन यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल

Fact Check on #Covid19

  https://pbs.twimg.com/profile_banners/231033118/1584354869/1500x500  

***

 

DJM/RT/MC/SP/DR(Release ID: 1615120) Visitor Counter : 143