• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
पंचायती राज मंत्रालय

ग्रामीण भागामध्ये कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी देशातल्या सर्व ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग


जिल्हा आणि गाव स्तरावर दररोज सार्वजनिक स्थानांच्या स्वच्छतेचे कार्य; निराधार, स्थलांतरित लोकांसाठी आश्रयाची व्यवस्था तसेच आवश्यकतेनुसार विलगीकरणाची सोय, गरजूंना संरक्षणाच्या सामुग्रीचा पुरवठा, आर्थिक मदत तसेच अन्न, धान्य यांचा पुरवठा करणे, कोरोना आजाराविषयी जागरुकता निर्माण करण्याचे काम सुरू

Posted On: 16 APR 2020 3:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 एप्रिल 2020

 

देशभरामध्ये पसरलेल्या कोविड-19 महामारीला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशातल्या जिल्ह्यांचे प्रशासन आणि ग्रामपंचायतीही सक्रिय बनल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व स्तरावर विविध उपाय योजना केल्या जात आहेत. त्याचबरोबर लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केले जावू नये, यासाठी आणि सामाजिक अंतराच्या निकषांचे काटेकोर पालन केले जावे, याची दक्षता घेतली जात आहे. देशभरामध्ये कोरोना रोखण्यासाठी व्यवस्थित उपाय करण्यासाठी राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन आणि ग्राम पंचायती यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाच्यावतीने केले जात आहे. 

कोरोना विषाणू प्रसार रोखण्यासाठी पंचायत स्तरावर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या उपक्रमांचा इतरांनाही उपयोग होवू शकतो, म्हणून इथे काही उदाहरणे देण्यात आली आहेत. 

 

उत्तर प्रदेश - 

  • सिद्धार्थनगर जिल्ह्यामध्ये ग्राम पंचायतीमधल्या गावकरी वर्गाला रोकड मिळणे सोईचे जावे, म्हणून ‘मायक्रो एटीएम’च्या माध्यमातून पोस्टमनमार्फत रक्कम काढून दिली जात आहे. 

  • मीरत क्षेत्रामध्ये सहा जिल्ह्यांमध्ये सुमारे 20 हजार स्थलांतरित असल्याचे दिसून आले आहे. यापैकी सुमारे 600 लोक परदेशातून आल्याचे स्पष्ट झाले आहे. 
  • या भागामध्ये 700 विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून त्यामध्ये 6600 लोकांना अलग ठेवण्यात आले आहे. 
  • विलगीकरण केंद्रातल्या सर्व लोकांना गरजेच्या सुविधा आणि अन्न पुरवण्याची जबाबदारी ग्राम प्रधान, सचिव यांनी घेतली आहे. 
  • सध्याचा संकटाचा काळ लक्षात घेवून निराधार व्यक्तींना दरमहा एक हजार रुपयांची मदत करण्यात येत आहे. 
  • सर्व स्थलांतरितांना रोज अन्नधान्य तसेच तयार अन्न यांचे वितरण करण्यात येत आहे. 
  • गाव पातळीवर सफाई कामगार म्हणून काम करत असलेल्या 2,820 श्रमिकांना मास्क, हात धुण्यासाठी साबण, ग्लोव्हज देण्यात आले आहेत. 
  • ज्या भागात दुर्गंधी आहे, तिथं सोडियम हायपोक्लोराईट आणि ब्लिचिंग पावडरचा शिडकावा नियमित करण्यात येत आहे.  

 

 

 

केरळ - 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने पंचायत आणि नगरपालिकांमध्ये 1304 ठिकाणी सामुदायिक स्वयंपाकघर चालवण्यात येत आहेत. यापैकी 110 सामुदायिक स्वयंपाकघरे ही राज्य महिला सशक्तीकरण कार्यक्रमाअंतर्गत ‘कुडुंबश्री’ योजनेनुसार चालविली जातात तर उर्वरित स्थानिक स्व-शासन संस्थांच्यावतीने सुरू करण्यात आली आहेत. 

  • ‘कुडुंबश्री’ समुहाच्या वतीने आत्तापर्यंत 18लाख मास्क तयार करून वितरित केली आहेत. 300 शिलाई केंद्रामधल्या महिलांनी मास्क बनवण्याचे काम केले. 
  • तसेच 21 लघू उद्योजकांनी 2700 लीटर्स सॅनिटायझर बनवले आहेत. 
  • सध्याच्या काळात अनेकांचे मानसिक स्वाथ्यही बिघडत आहे, असे लक्षात आल्यामुळे ‘कुडंबश्री’ च्या वतीने 360 समुदाय समुपदेशकांमार्फत विविध मानसिक समस्यांविषयी गरजूंना समुपदेशनांचे काम करीत आहेत. 15मार्च ते 5 एप्रिल या काळामध्ये समुपदेशनाच्या सुविधेचा 49,488 जणांनी लाभ घेतला आहे.
  • कुडुंबश्रीच्या मदतीने स्थानिक स्व-शासन संस्थेने लॉकडाउनच्या काळात कोविड-19 विषयी माहिती देणे, सरकारकडून येत असलेल्या सूचनांची माहिती पुरवणे यासाठी 1.9 लाख व्हॉटस अप समूह तयार केले आहेत. यासाठी ‘नेबरहूड‘ समुहांतल्या 22 लाख मदत घेतली. या समुहांच्या माध्यमातून सर्व माहिती पाठवली जात आहे. 

 

दादरा आणि नगर हवेली - 

  • कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी काय केलं पाहिजे आणि काय करणे टाळले पाहिजे यासाठी स्वच्छता कशी ठेवायची याची माहिती पंचायत क्षेत्रामध्ये दररोज पोहोचवली जाते. 
  • ग्रामीण भागामध्ये 1.32 लाख सॅनिटायझर्स आणि 17,400 मास्क यांचे मोफत वितरण करण्यात आले आहे. 
  • आवश्यक वस्तूंची दुकाने ठराविक वेळेत उघडण्यात येत असून ग्राहकांकडून  सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन केले जावे, यासाठी रेषा आखण्यात आल्या आहेत. 
  • अक्षय पात्र प्रतिष्ठानच्यावतीने रोज शिजवलेलल्या अन्नाचे वितरण गरजू व्यक्तींना करण्यात येत आहे. तसेच पक्षी, जनावरे यांच्याही खाण्याची सोय करण्यात आली आहे. 
  • कोविड-19 विषयी जनजागृती करण्यासाठी 3 आयईसी वाहने कार्यरत आहेत. परिसरातल्या 20 ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात ही वाहने फिरून सर्वसामान्य लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे, हे सांगतात. 
  • 20 ग्रामपंचायतीमंध्ये सुमारे 10हजार हँडबिले, प्रचार पत्रके वाटण्यात आली आहेत. 
  • उंच इमारतींमधल्या सर्व लिफ्ट सॅनिटाइज करण्यात आल्या आहेत. तसेच या इमारतींमध्ये वास्तव्य करणारे आणि लिफ्टचा वापर करणारे लोक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गर्भवती आणि दिव्यांग यांनी कशी काळजी घ्यावी, याची माहिती दिली आहे. 

Description: C:\Users\ravi gupta\Documents\SHUBHA RD\DN Haveli best practce.jpg

 

आंध्र प्रदेश - 

घरोघरी जावून सर्व्हेक्षण आणि मास्कचे वितरण - कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी मदत म्हणून शासनाने 16 कोटींपेक्षा जास्त मास्क नागरिकांना वितरित केले. तसेच राज्य सरकारच्या वतीने तीन टप्पात घरोधरी जावून सर्व्हेक्षण केले आहे. 

  • कोविडचे रुग्ण शोधण्यासाठी 1.47 कोटींपैकी 1.43 घरांची पाहणी करण्यात आली आहे. 
  • या पाहणीतून 32,349 जणांना वैद्यकीय अधिका-यांकडे पाठवण्यात आले. तर त्यातील 9,107 जणांची कोविड चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  

 

आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या शिफारसींनुार हे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. 

 

 

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane



(Release ID: 1614988) Visitor Counter : 268


Link mygov.in