• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड-19 संदर्भात क्षेत्र निहाय धोरण आणि निर्णय घेण्यासाठी मदत करण्यासाठी एकीकृत भू-स्थानाधारित मंच


हे मोबाईल अप्लिकेशन आरोग्य सेतू मोबाईल अप्लिकेशनसाठी पूरक ठरणार

Posted On: 15 APR 2020 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2020

 

केंद्र सरकारच्या  विज्ञान आणि  तंत्रज्ञान  विभागाने, एकीकृत भू-स्थानाधारित मंच निर्माण केला आहे.  उपलब्ध भौगोलिक डाटा सेट,विश्लेषणात्मक साधने यातून याची निर्मिती करण्यात आली आहे. कोविड-19 प्रादुर्भावाच्या काळात निर्णय घेण्यासाठी आणि विभाग  केन्द्री धोरण ठरवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

सुरवातीला या मंचा द्वारे  राज्य आणि केंद्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य सेवा यंत्रणा बळकट करणे अपेक्षित आहे. त्यानंतर नागरिक आणि आरोग्य, सामाजिक-आर्थिक आणि उपजीविकेसंदर्भातली आव्हाने या संदर्भात मदत करणाऱ्या संस्थाना उपयुक्त  भू-स्थानाधारित माहिती हा मंच परवु शकेल.

SAHYOG हे मोबाईल अप्लिकेशन आणि (https://indiamaps.gov.in/soiapp/) हे वेब पोर्टल कोविड-19 विषयी भौगोलिक डाटासेट गोळा करण्याचे काम करत आहे. कोविड संदर्भात केंद्र सरकारच्या उपाय योजनात भर घालण्यासाठी समुदाय संपर्काच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे. 

स्व मूल्यमापन,जन जागृती, यासंदर्भात केंद्र सरकारच्या आरोग्य सेतू या मोबाईल अप्लिकेशनला हे अप्लिकेशन पूरक आहे. ते मध्य प्रदेश, ओदिशा, पंजाब, जम्मू काश्मीर मधे एसएसडीआय, आपआपल्या राज्यात, राज्य आणि जिल्हा स्तरीय प्रशासनाला कोविड-19 शी लढा देण्यासाठी आरोग्यविषयक  माहिती आणि आकडेवारी एकीकृत करण्यासाठी अनुषंगिक भू-स्थानाधारित डाटा सेवा पुरवत आहे.

हा एकीकृत मंच कोविड-19 संदर्भात देशाचे आरोग्य आपत्कालीन व्यवस्थापन बळकट करेल.मनुष्यबळ, आरोग्य, तंत्रज्ञान ,पायाभूत आणि नैसर्गिक संसाधने यांची सांगड घालण्यासाठी हा  मंच उपयुक्त ठरणार आहे.

 भू-स्थानिक डाटासह लोकसंख्याविषयक माहितीचे एकत्रीकरण हे निर्णय घेणाऱ्या ,प्रशासन आणि विकास यंत्रणासाठी आवश्यक असते.कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर हा प्रयत्न  आरोग्य सेतू  सारख्या  मंचाला  विशेष डिजिटल सक्षमीकरण प्रदान करेल असे डीएसटी चे सचिव प्राध्यापकआशुतोष शर्मा यांनी सांगितले.

 भू-स्थानाधारित माहिती एकीकृत करण्याचा  डीएसटीचा हा प्रयत्न या महामारीमुळे निर्माण झालेल्या बहुस्तरीय आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी तसेच जलद स्थानाधारित माहितीवर आधारित निर्णय घेण्यासाठी देशाला उपयुक्त ठरणार आहे.

  (अधिक माहितीसाठी, पंकज मिश्रा, डेप्युटी सर्व्हेयर जनरल (तंत्र) सर्व्हेयर जनरल कार्यालय,सर्व्हे ऑफ इंडिया,डेहराडून-248001. 0135-2746805.     

 pankaj.mishra.soi@gov.in.विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग यांच्याशी संपर्क साधावा.)  

G.Chippalkatti/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1614869) Visitor Counter : 225


Link mygov.in